त्रवेन्कोर चा राजा हा असा पहिला आशियाई राजा होता ज्याने युद्धात एका
युरोपियन सैन्याला पराभूत केले. १७४१ मध्ये कोलाचेल च्या युद्धात त्यांनी
डच सेनेचा पराभव केला. ते अशासाठी एक महान योद्धा आहेत, कारण
किशोरावस्थेपासूनच त्यांना केवळ १ किंवा २ सैनिकांसोबत महालाबाहेर जाण्याची
परवानगी होती. आणि तेव्हापासूनच त्यांनी आपल्यावर झालेले २० हल्ले परतवून
लावले आणि एका वेळी अक्षरशः ६ ते ७ जणांबरोबर युद्ध केले. ते एक कुशल
योद्धा होते आणि शूरवीर देखील. म्हणूनच त्यांना मेंढ्यांच्या मधला वाघ असे
म्हटले जाई.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.