जेव्हा हिरण्यवर्माच्या कन्येला हे समजले की माझा विवाह एका स्त्रीशी झाला आहे, तेव्हा तिने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. हे ऐकून राजा दशार्णराज हिरण्यवर्मा याला प्रचंड राग आला आणि त्याने राजा द्रुपदाला संदेश पाठवला की जर ही गोष्ट सत्य असेल तर मी तुझ्या कुटुंबासकट तुझे राज्य नष्ट करीन. राजा द्रुपदाने राजा दशार्णराज हिरण्यवर्माला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो ऐकला नाही. त्याने आपले सहकारी राजे घेऊन पांचालदेशावर आक्रमण केले. राजा हिरण्यवर्मा आणि इतर राजांनी निश्चय केला की जर शिखंडी खरोखरच स्त्री असेल तर आपण राजा द्रुपदाला कैद करून त्याच्या राज्यावर कबजा करायचा आणि नंतर द्रुपद आणि शिखंडी यांना ठार करायचे. राजा हिराण्यावार्मा याच्या आक्रमणाची गोष्ट जेव्हा स्त्री रुपी शिखंडीला समजली तेव्हा ती प्रचंड घाबरली आणि आपल्या प्राणांचा त्याग करण्याच्या इच्छेने जंगलात निघून गेली.