महाराज शांतनू आणि सत्यवती यांना दोन पुत्र झाले चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगद कमी वयातच युद्धात मारला गेला. यानंतर भीष्मांनी विचित्रवीर्य याचा विवाह काशिराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी करून दिला. विवाहानंतर काही काळातच विचित्रवीर्य याचा देखील आजाराने मृत्यू झाला. अंबिका आणि अंबालिका अजूनही निःसंतान होत्या, त्यामुळे सत्यवतीच्या समोर हे संकट उभे राहिले की कौरवांचा वंश पुढे कसा चालवायचा? वंश पुढे वाढवण्यासाठी सत्यावातीने महर्षी वेदव्यास यांना उपाय विचारला. तेव्हा वेदव्यासांनी आपल्या दिव्य शक्तीने अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून अपत्य उत्पन्न केले होते. अम्बिकाने महर्षींच्या भयाने डोळे मिटून घेतले होते, तेव्हा तिच्या पोटी अंध संतान धृतराष्ट्र जन्माला आला. अंबालिका देखील महर्षींना घाबरली होती आणि तिचे शरीर पिवळे पडले. तेव्हा तिच्या पोटी पंडूरोगाने ग्रस्त पुत्र पंडू जन्माला आला. या दोघींनंतर एका दासीवर देखील महर्षींनी प्रयोग केला होता, तेव्हा तिच्या पोटी महात्मा विदुर जन्माला आले.