नरेंद्र मोदी यांच्या अभिनव कल्पनेतून सुरु झालेली हि योजना आहे जिचे उद्दिष्ट आहे सर्व सामान्य जनतेला बँकांची सुविधा उपलब्ध करून देणे आणि बँकेत खाते उघडणे. या योजनेची घोषणा नमो यांनी १५ ऑगस्ट २०१४ ला केली आणि शुभारंभ २८ ऑगस्ट २०१४ ला नमो यांच्या द्वारे केला गेला. या योजनेची औपचारिक पूर्तता व्हावी म्हणून नमो यांनी प्रत्येक बँकेला स्वत: इमेल केला होता ज्यामध्ये त्यांनी 'प्रत्येक परिवारासाठी बँक खाते' हि राष्ट्रीय प्राथमिकता असल्याचे नमूद केले होते. या योजनेत 7 करोड लोकांना प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे आणि उद्घाटनाच्या दिवशीच १.५ करोड लोकांनी बँकेची खाती उघडली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.