अभिषेक बोलत होता आणि सर्वजण ऐकत होते.
“अभिषेक, तुझ्याकडून या गोष्टी ऐकणे खूप मनोरंजक आहे आणि तू त्या खूप चांगल्या प्रकारे सांगतोस. या गोष्टी माझ्या ज्ञानात आणखी भर घालत आहेत आणि कदाचित चौकशीसाठीही उपयोगी पडतील.” डॉ. मेहता कृतज्ञतापूर्वक म्हणाले.
"आभार! पण हे तर माझे काम आहे." अभिषेकने नम्रपणे उत्तर दिले.
"बरं आता मला अश्वत्थाम्याबद्दल आणखी सांग." डॉ.मेहता म्हणाले.
“द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे राजगुरु होते. दैवी शस्त्रांसह प्रगत लष्करी कलांमध्ये ते पारंगत होते. अर्जुन त्यांचा आवडता शिष्य होता. परशुराम आपली संपत्ती ब्राह्मणांना देत असल्याचे समजल्यावर द्रोण त्याच्याकडे गेले. दुर्दैवाने परशुरामाकडे फक्त शस्त्रे शिल्लक राहिली. त्याने द्रोणांना शस्त्रे देण्याची आणि ती कशी वापरायची याचे ज्ञान देण्याची तयारी दर्शवली. द्रोणांनी सर्व शस्त्रे आणि ‘आचार्य’ ही पदवी मिळवली आणि तो द्रोणाचार्य म्हणून ओळखला जाऊ लागला.” अभिषेक
"अभिषेक, मी तुला अश्वत्थाम्याबद्दल विचारलं, द्रोणाचार्याबद्दल नाही." डॉ. मेहता
अभिषेक म्हणाला, “ सर, अश्वत्थामा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी द्रोणाचार्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तर मी कुठे होतो? हां द्रोणाचार्य....भगवान शिवासारखा पराक्रमी पुत्र मिळावा म्हणून द्रोणाचार्यांनी अनेक वर्षे भगवान शिवाची तपश्चर्या केली, त्यामुळे त्यांना 'द्रोणी' म्हणजेच अश्वत्थामा प्राप्त झाला.
अश्वत्थाम्यामध्ये भगवान शिवासारखे शौर्य होते. अश्वत्थामा हा एक शक्तिशाली योद्धा होता जो कौरवांच्या वतीने पांडवांच्या विरोधात लढला होता. युद्धात फक्त अश्वत्थामा आणि त्याचे मामा कृपाचार्य हेच वाचले. अश्वत्थामा हा एक अजिंक्य योद्धा होता, ज्याला शस्त्रास्त्रांच्या विज्ञानाचा गुरु मानला जातो. तो १८ विद्या आणि ६४ कलांमध्ये पूर्णपणे पारंगत होता. धार्मिक ग्रंथ सांगतात की तो पुढील व्यास आणि सप्त ऋषींपैकी एक असेल. अश्वत्थामा हा सात चिरंजीवांपैकी एक आहे.
अश्वत्थामा त्याच्या कपाळावर एक रत्न घेऊन जन्माला आला होता, ज्याने त्याला मनुष्यापेक्षा खालच्या सजीवांवर नियंत्रण करण्याची विशेष शक्ती प्राप्त होती. तो एखाद्या अचल पर्वताप्रमाणे होता आणि त्याच्याकडे अग्नीची ऊर्जा होती. त्याची तीव्रता तो सागरासारखी होती आणि त्याचा क्रोध सापाच्या विषासारखा होता. त्याच्या कपाळावरील रत्नामुळे त्याचे भूत, पिशाच्च, विषारी कीटक आणि हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण होत असे. द्रोणाचार्यांचे आपल्या मुलावर खूप प्रेम होते.
द्रोणाचार्य आणि अश्वत्थामा हस्तिनापुराच्या राज्याशी एकनिष्ठ होते. अश्वत्थामाचे वडील द्रोणाचार्य सर्व योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ होते. द्रोणाचार्यांच्या हातात धनुष्यबाण असताना त्यांचा पराभव करणे अशक्य होते हे भगवान श्रीकृष्णाला माहीत होते. श्रीकृष्णाला हे देखील माहित होते की द्रोणाचार्य आपल्या पुत्रावर अश्वत्थाम्यावर खूप प्रेम करतात, म्हणून त्यांनी युधिष्ठिर आणि इतर पांडवांना सुचवले की जर त्यांनी द्रोणाचार्यांना विश्वास दिला की त्यांचा मुलगा युद्धभूमीत मरण पावला, तर द्रोणाचार्य दुःखी होतील आणि स्वत:ला नि:शस्त्र करतील.
पुढे भगवान श्रीकृष्णाने सुचवले की भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारावे आणि द्रोणाचार्य यांना अभिमानाने सांगावे की त्याने द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा मारला आहे. हत्तीला मारल्यानंतर भीमाने मोठ्याने घोषणा केली की
“मी अश्वत्थाम्याचा वध केला आहे.”
पण द्रोणाचार्यांनी भीमाच्या विधानावर विश्वास ठेवला नाही आणि ते ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर याच्याकडे पोहोचले. द्रोणाचार्य युधिष्ठिराचा सत्याप्रती दृढनिश्चय जाणून होते आणि तो कधीही खोटं बोलणार नाही हे त्यांना माहीत होते. द्रोणाचार्य युधिष्ठिराकडे पोहोचले आणि त्यांनी विचारले की त्यांचा मुलगा मेला आहे का? उत्तरा दाखल युधिष्ठिर म्हणाला,
“अश्वत्थामा मरण पावला; पण तो तुमचा मुलगा नसून हत्ती होता.”
युधिष्ठिराला खोटं बोलणं अशक्य आहे हे कृष्णालाही माहीत होतं. त्याचक्षणी श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून इतर योद्ध्यांनी रणशिंग आणि शंख फुंकून असा आनंदाचा गजर केला की द्रोणाचार्यांना 'अश्वत्थामा मेला' एवढेच ऐकू आले; युधिष्ठिराच्या उत्तराचा दुसरा भाग त्याला ऐकू आला नाही.
शोकाकूल द्रोणाचार्य आपला मुलगा मेला असे मानून रथातून खाली उतरले, शस्त्रे सोडून समाधीस्थ बसले. डोळे बंद करून, त्यांचा आत्मा अश्वत्थाम्याच्या आत्म्याच्या शोधात स्वर्गात रवाना झाला. द्रोणाचार्य नि:शस्त्र असताना त्यांची हत्या करण्यात आली आणि अशाप्रकारे युद्धाच्या अठराव्या दिवशी गुरू द्रोणाचार्य भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांनी वापरलेल्या अन्यायकारक मार्गाने मारले गेले. या घटनेने अश्वत्थाम्याला मोठा धक्का बसला आणि त्याने पांडवांचा अध्याय कोणत्याही परिस्थितीत संपवण्याचा निर्णय घेतला.
कौरवांच्या पराभवानंतर, युद्धाच्या शेवटच्या रात्री, अश्वत्थामा एका झाडाखाली अत्यंत अस्वस्थ आणि व्यथित होऊन बसला होता. कावळ्यांच्या समूहाशी लढणाऱ्या एका घुबडाने त्याचे लक्ष वेधून घेतले. यावरून त्याला रात्री पांडवांच्या छावणीवर हल्ला करण्याची कल्पना सुचली. युद्धात वाचलेल्या काही योद्ध्यांसह त्याने रात्री छावणीवर हल्ला केला. अश्वत्थाम्याने संपूर्ण पांडव छावणी जाळून राख केली. काहीच शिल्लक राहिले नाही. त्याने पुढे जाऊन पांडव सैन्यातील अनेक प्रमुख योद्ध्यांनाही ठार केले.
पांडवांचे पाचही पुत्र झोपेत असताना, ते पांडवांचे भाऊ आहोत, असे मानून त्याने त्यांची हत्या केली. कथेच्या काही आवृत्त्यांमध्ये, त्याला माहित होते की ते पांडव नाहीत, परंतु तरीही त्याला त्यांचे वडील सापडले नाहीत म्हणून मारले. अश्वत्थाम्याचा असा विश्वास होता की पांडवांवर अचानक हल्ला करणे योग्य आहे, कारण त्याच्या वडिलांचीही अन्यायाने हत्या झाली होती. त्याचा सूड न्याय्य आहे असा त्याचा विश्वास होता.अश्वत्थामाच्या या कृत्याने रागावून जेव्हा पांडव भगवान श्रीकृष्णासोबत छावणीत परतले, तेव्हा श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याला कलियुगाच्या शेवटपर्यंत अमरत्व आणि मृतवत जीवनाचा शाप दिला आणि अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील रत्न काढून घेऊन म्हटले, 'ही जखम कधीही बरी होणार नाही.
.. आणि ही अश्वत्थाम्याची कथा होती."
"ही कथा अविश्वसनीय वाटते, परंतु तरीही हिंदू धर्माचे लोक अश्वत्थामाच्या कथेवर विश्वास ठेवतात. भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील काही मंदिरांमध्ये ५००० वर्षांचा एक माणूस राहत असल्याचे सांगितले जाते. झी-न्यूज टीमने लिलोती नाथ मंदिर, शिवराजपूर मंदिर आणि खैरेश्वर मंदिर या मंदिरांना भेटी दिल्या असून सर्वत्र अश्वत्थाम्याची कथा उपस्थित होती. वृत्तवाहिनीचे लोकं रात्रभर त्यांच्या कॅमेऱ्यांसह मंदिराच्या बंद दरवाज्याबाहेर थांबले आणि दरवाजा उघडण्यापूर्वी आत कोण येते आणि मूर्तींना फुले व पाणी अर्पण करते हे शोधून काढले. कोणीही आले नाही; पण पहाटे दरवाजे उघडले असता, बंद गाभाऱ्यात आधीच पूजन केल्याचे दिसून आले, कारण तेथे पाणी आणि फुले विखुरलेली होती.
स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की हा ५००० वर्षांचा माणूस खरोखरच महाभारतातील अश्वत्थामा आहे. प्रत्येक मंदिरात तो रोज सकाळी पूजा करतो आणि देवांना आणि त्यांच्या मूर्तींना पाणी अर्पण करतो. मंदिराचे दरवाजे बंद असताना हे दररोज घडते. या बातमीची पडताळणी करण्यासाठी पत्रकाराने काही डॉक्टर, पुजारी आणि स्थानिक रहिवाशांशी देखील बोलले.
एक दशकापूर्वी एका वर्तमानपत्रातील लेखात एका रेल्वे कर्मचाऱ्याबद्दल छापून आले होते जे रजेवर गेले होते. गुजरातच्या नवसारी जवळच्या जंगलात भटकत असताना, त्याने सुमारे १२ फूट उंचीचा माणूस पाहिला होता, ज्याच्या कपाळावर पण जखम होती. त्याने दावा केला की त्या अधिकाऱ्याने त्याच्याशी संभाषण केले आणि त्याला कळले की भीम त्याच्यापेक्षा खूप उंच आणि बलवान आहे.” अभिषेक म्हणाला.
“या कथा आहेत. तथ्य नाही. पण तू एकसारखा द्रोणाचार्याचा उल्लेख केलास. असं का? ” डॉ मेहता यांनी विचारले.
“होय, कारण अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा होता आणि परशुराम हा द्रोणाचार्यांचा गुरु होता. हे दोघेही हजारो वर्षांच्या फरकाने वेगवेगळ्या युगात राहिले असे मानले जाते. वास्तविक, एका पौराणिक कथेनुसार, भारतातील बुरहानपूरजवळ एक गाव आहे, जिथे असीरगड नावाचा किल्ला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अश्वत्थामा आजही तेथे येतो आणि दररोज सकाळी किल्ल्यातील शिवलिंगाला फुले अर्पण करतो. आणि अश्वत्थामाला हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासींमध्ये राहताना आणि फिरताना पाहिल्याचा दावा इतर काहींनी केला आहे." अभिषेकने उत्तर दिले.
"बरं.. that's it for today.. आता मला झोप येत्ये " केजीबी म्हणाली
सर्वजण इतकं सगळं एकदम डाउनलोड करून थकले होते. ते आपापल्या खोलीत जाऊन झोपी गेले.
क्रमश: