कोणीएक देवता बुद्धास म्हणाली :-
बहू देवा मनुस्सा च मंगलानि अचिंतयुं।
आकंखमाना सोत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमं।।१।।
अनेक देवांनीं आणि मनुष्यांनीं आपणांस सुख व्हावें म्हणून (अनेक रीतींनी) मंगल काय आहे याची कल्पना केली. हे भगवन्, यांत उत्तम मंगल कोणतें तें सांगा.
यावर भगवान् म्हणाला:-
असेवना च बालानं पंडितानं च सेवना ।
पूजा च पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं।।२।।
मूर्खांच्या संगतीपासून दूर राहणें, पंडितांची संगति करणें आणि पूज्यजनांची पूजा करणें, हीं उत्तम मंगलें होत.
पटिरूपदेसवासो च पुब्बे च कतपुञ्ञता।
अत्तसम्मापणिधि च एतं मंगलमुत्तमं।।३।।
योग्य देशांत वसति करणें, पदरीं पुण्याचा सांठा असणें, आणि मनास सन्मार्गांत दृढ करणें, हीं उत्तम मंगलें होत.
बाहुसच्चं च सिप्पं च विनयो च सुसिक्खितो।
सुभासिता च या वाचा एतं मंगलमुत्तमं।।४।।
पुष्कळशी विद्या शिकणें, कला शिकणें, सद्धर्तनाची संवय लावणें, आणि समयोचित भाषण करणें, हीं उत्तम मंगलें होत.
मातापितु उपट्ठानं पुत्तदारस्स संगहो।
अनाकुला च कम्मन्ता एतं मंगलमुत्तमं।।५।।
आईबापांची सेवा करणें, बायकोमुलांचे योग्य रीतीनें पालन करणें, आणि व्यवस्थितपणें कामें करणें, हीं उत्तम मंगलें होत.
दानं च धम्मचरिया च ञाचतकानं च संगहो।
अनवज्जानि कम्मानि एतं मंगलमुत्तमं।।६।।
दानधर्म करणें, धार्मिक आचरण असणें, नातलगांवर उपकार करणें, व प्रशस्त कर्में आचरणें, हीं उत्तम मंगलें होत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.