जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा प्राथमिक आरसा, ऑप्टिकल टेलिस्कोप, सोन्याचा मुलामा असलेल्या बेरिलियमपासून बनवलेले षटकोनी अठरा आरश्याचे भाग आहेत. हे भाग साडे सहा मीटर (एकवीस फूट चार इंच) व्यास होईल इतक्या भव्यस्वरूपाचा एक आरसा तयार करतात. हा वेब टेलिस्कोप त्यांनी बनवलेल्या हबलच्या अडीच मीटर आरशापेक्षा सुमारे साडेपाच पट मोठा आहे. यामुळे सूर्याच्या किंवा इतर प्रकाशमय ताऱ्यापासून प्रकाश गोळा करून त्या यंत्राला उर्जा देणारे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे या वेब स्पेस टेलिस्कोप कार्यक्षमता वाढते. हबलच्या कक्षेत जे अल्ट्राव्हायोलेट किरण, दृश्यमान आणि जवळचे किरण त्याच्या स्पेक्ट्रामध्ये निरीक्षित होतात. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप कमी वारंवारता श्रेणीमधल्या, मोठ्या तरंगलांबी किंवा दृश्यमान प्रकाश शिवाय मध्य तरंग लांबीचे अवरक्त किरण यासगळ्याचे निरीक्षण करू शकेल. यातून मिळालेली माहिती हबलसाठी उपयोगी ठरू शकेल.

हबलसाठी हा स्पेस टेलिस्कोप खूप जुन्या आणि खूप दूर असलेल्या उच्च-रेडशिफ्ट घटकांचे निरीक्षण करण्यास सक्षम राहील असा दावा आहे. या स्पेस टेलिस्कोपमध्ये इन्फ्रारेड असलेल्या उष्णतेच्या इतर कोणत्याही स्त्रोतांचा हस्तक्षेपाशिवाय अवरक्त सिग्नलचे निरीक्षण करण्यासाठी दुर्बीण पन्नास केल्व्हिन डिग्री तापमानाच्या म्हणजेच -२२३ डिग्री सेल्सियसच्या खाली असायला लागणार आहे म्हणून हा टेलिस्कोप सूर्य व पृथ्वी पासूनच्या एका अश्या ठिकाणी तैनात केला जाणार आहे ज्याला लॅग्रेंज पॉइंट म्हणतात. हा टेलिस्कोप पृथ्वीपासून सुमारे दीड दशलक्ष किलोमीटरवर म्हणजेच जवळपास नऊ लाख तीस हजार मैलांवर असणार आहे. खूप अंतरावरील अंतराळातील एक बिंदू ज्याला आपण लॅग्रेंज पॉइंट म्हटले आहे, तिथे पोहोचून या टेलिस्कोपचे पाच थराचे एखाद्या साध्या पतंगाच्या आकाराचे सनशील्ड एकाच वेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या तापमानवाढीपासून या उपकरणाचे संरक्षण करू शकते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel