मध्वमुनीश्वर कृत गणपतीचीं पदें

१६५० ते १८०० पंडिती काव्य निर्माण झाले, याच काळात मध्वमुनीश्वर होऊन गेले. मध्वमुनीश्वर महाराजांची 300 वर्षांपूर्वीची पदे रचना आजही लोक गातात. मध्वमुनींच्या कवितेत काही स्फुट पदे, चरित्रे , आरत्या ह्यांचा समावेश होतो. त्यांनी काही संस्कृत आणि हिंदी काव्यरचनाही केली आहे. त्यांची काव्यरचना मधुर आणी हरिदासी थाटाची आहे. अनेक ग्रंथांचे व ग्रंथकाराचे उल्लेक त्यांच्या कवितेत आढळतात.

मध्वमुनीश्वर १६५० ते १८०० पंडिती काव्य निर्माण झाले, याच काळात मध्वमुनीश्वर होऊन गेले. मध्वमुनीश्वर महाराजांची 300 वर्षांपूर्वीची पदे रचना आजही लोक गातात. श्रीमध्वमुनीश्वर हे मुळचे नाशिकचे राहणारे. त्यांचे मूळचे नांव त्रिंबक होते. त्रिंबकाचे बालपणीचे स्वच्छंद वर्तन न साहून वैष्णवांनीं मध्वाचार्यास मुद्दाम नाशिक क्षेत्रीं आणविले व त्रिंबकास शिक्षा करण्यासाठी त्यांजसमोर उभे केले. त्यासमयीं झालेल्या प्रश्नोत्तरांवरून त्रिंबकाची योग्यता स्वामीस कळून आली व त्यांनी त्याचा सत्कार करून 'मध्वमुनीश्वर' म्हणून त्यास नमस्कार केला. आणखी एका कथे नुसार हे कुटूंब वैष्णव असूनही नारायणाचार्यानी आपल्या पुत्राचे नाव त्र्यंबक असे ठेवावे, ह्यांचा वैष्णवांना राग आलेला होता. त्यामुळे त्यांनी मध्यवाचार्याच्या समोर त्र्यंबकाला उभे केले .त्र्यंबकाच्या बोलण्यातून त्याची पात्रता मोठी असल्याचे मध्वाचार्यांच्या लक्षात आले आणि मध्वाचार्यांनी त्याला ‘ मध्वमुनीवर ’असे नाव देऊन गौरविले. भक्तिपर मधुर रचना करणारा प्रसिद्ध मराठी कवी आणि कीर्तनकार अमृतराव ह्याचे मध्वमुनी हे गुरू होते.मध्वमुनींच्या कवितेत काही स्फुट पदे, चरित्रे , आरत्या ह्यांचा समावेश होतो. त्यांनी काही संस्कृत आणि हिंदी काव्यरचनाही केली आहे. त्यांची काव्यरचना मधुर आणी हरिदासी थाटाची आहे. अनेक ग्रंथांचे व ग्रंथकाराचे उल्लेक त्यांच्या कवितेत आढळतात.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel