रोज पडतात मुडदे येथे
सभोवताल माणुसकीचे,
धडा वेगळे शीर येथे
पचवून मान-अपमानाचे.

आटत चालली माणुसकी
खोल तळात मनाच्या,
वाढत चालल्या भिंती येथे
पोकळ अहंकाराच्या...

देवपण सारेच जपतात
माघेच सारे सुखाच्या,
नवरा-बायको दोन मुलं
एव्हढ्याच गरजा संसाराच्या..

सोडून भाव जरा
भिंती मोकळ्या केल्या,
आपलीच माणसं घेऊन गेली
इस्पितळात वेड्याच्या...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel