महाभारतातली महान गुरु. कौरव आणि पांडव यांना ज्यांनी युद्धकला , वेदविद्या, हे शिकवले ते द्रोणाचार्य. गुरु द्रोणाचार्य हे जगातील पहिले टेस्ट ट्युब बेबी (परिक्षानळी बालक) होते. हा दावा चुकीचा ठरणार नाही. ऋषी भारद्वाज हे द्रोणाचार्यांचे पिता. ते नेहमीप्रमाणे आश्रामाजवळच्या गंगा नदीत संध्येसाठी गेले होते. त्यांनी नदीच्या पाण्यामध्ये बुडी मारली. काही क्षण ते पाण्यातच थांबले.नंतर वर आले. सूर्याकडे एकटक पाहत त्यांनी उगवत्या सुर्यानारायणाचं तेज आपल्या शरीरात चार्मचक्शुंच्या मार्फत सामावून घेतल. 

“आदित्यांस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने 

जन्मांतर सहस्त्रेषु दारिद्र्याम न उपजायते” 

असे म्हणत त्यांनी ओंजळीत पाणी घेतले आणि ते सुर्याला आर्ध्य देऊ लागले. 

“अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशानाम 

सुर्यापादिदाकाम तीर्थं जठरे धर्याम्यःम”

 असे म्हणून अखेरचा घोट त्यांनी प्राशन केला. समोर कमनीय बांध्याची आणि शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक यौवना होती. तिच  अंग अंग जणु साजूक तुपात न्हाऊन काढल्याप्रमाणे चकाकत होत. त्यांची नजरा नजर झाली स्त्रीसुलभ लज्जेप्रमाणे तिची नजर खाली झुकली. ऋषी भारद्वाज एकटक तिच्याकडे पाहत होते.तर तिची नजर अधून मधून त्यांचे सुर्यानारायानाप्रमाणे असलेले  तेजस्वी रूप न्याहाळत होती. दोघांसाठी क्षण जणूकाही थिजले होते. काही क्षणात ती भानावर आली आणि वस्त्र सावरत ती माघारी जाऊ लागली. तेंव्हा ऋषी भारद्वाज म्हणाल, “ आजवर माझ्या सुर्यासाधनेत कधीही मी विचलित झालो नव्हतो. माझे चित्त विचलित करणाऱ्या हे देवी. आपण आहात तरी कोण..??” ती म्हणाली, “घ्रुतार्ची”. वस्त्र सांभाळत ती निघून केंव्हा गेली हे ऋषी भारद्वाज यांना कळलेच नाही.काही क्षणात ऋषी भारद्वाज भानावर आले. तिचे सौंदर्य पाहून ऋषी भारद्वाज यांचे वीर्यस्खलन झाले होते. त्यांनी वीर्य एका द्रोणात जमा केले. ते त्यांनी आपल्या आश्रमात एका थंड ठिकाणी जपून ठेवले. त्याच द्रोणातून काही महिन्यातच लहान बाळाचे रडू ऐकू आले. द्रोणातून जन्मले म्हणून त्यांचे नाव द्रोण असे ठेवण्यात आले. 

वरील कथा वाचून हि भाकड आहे असे वाटेल. परंतु आपल्या वेद पुराणांचा विपर्ह्यास करून या कथांचे अर्थ लावले गेले. आपण जर सारासार विचार केला तर कळेल की कदाचित ऋुषी भारद्वाज यांनी त्याकाळी स्त्रीगर्भाबाहेर भ्रुण वाढवण्याची पद्धत विकसित केली असेल. कदाचित त्यासाठी तुप वापरले गेले असेल. आता जसे टेस्ट ट्युब बेबीची परिक्षानळी थंड ठिकाणी ठेवतात. तसेच त्याकाळी ऋुषी भारद्वाज यांनी ते अापल्या कुटीत ठेवले असेल. भारतीय सनातन साहित्याचे इंग्रजीत पुनर्लिखाण केले गेले होते. शब्दरचनेतील बदलामुळे या कथांचे अर्थ वेगळे लावले गेले.पण या कथांचा असाही विचार करायला हवा...!

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel