माझ्या मोठ्या बहिनीच लग्न ठरल होत.... साखरपुडा झाला आणि ऐनवेळी ताईचा सासरा दिर नवरा सासु आमच्या घरी येउन ठेपले... अचानक आल्यामुळे आम्हाला थोडा धक्काच बसला... आम्ही विचारपूस केली अचानक येण्याच कारण विचारल......

            तितक्यात ताईचा नवरा लगेच बोलला की मला तुम्ही देण्या घेण्याची काही भाषा केली नाहीत... तर लगेच माझे पप्पा बोलले की तुम्ही आम्हाला अगोदर काहीच नको फक्त तुमची मुलगी द्या हेच बोलला होतात...... मग आता देण्या घेण्याची भाषा कसली करताय...

ताईची सासु लगेच बोलली त्यावेळी आमच डोक नाही चालल पण आता आम्हाला तुमची फ्क्त मुलगी नको तर हुंडा सुद्धा हवाय...

              आता मात्र माझ्या ताईच डोक फिरल... ती रागाने लालबुंद झाली...  सरळ बोलून टाकले लग्न करायच तर करा नाहीतर माझ्या घरातून चालते व्हा....  पण बापाच काळीज तीला आवरत होत... सर्व तयारी केली होती.. पत्रिका छापून झाली होती.. आता जर का लग्न मोडले तर हजार प्रश्न बापाच्या नी आईच्या पुढे उभे रहातील... आणि चुका फ्क लेकीच्या निघतील म्हणून हा बाप आपल्या लेकीला शांत करत होता... शेवटी इज्जतीचा प्रश्न होता...... 

        शेवटी न राहून माझ्या आईन विचारल काय पाहिजे हुड्यात तुम्हाला... तर दिरान बोलुन दाखवल... एक एनोव्हा कार पाहिजे आणि मुंबईत घर द्या हे तुमच्या जावयासाठी आणि लाडक्या दिराला एक बाईक घेउन द्या... बस्स जास्त काही नको.... हे आमच्यासाठी खुप जास्तच होते... आम्ही स्वतः मुंबईत भाड्याने रहातो आणि ह्याना कुठे आणि कस घर घेऊन द्यायचं.... माझ्या बाबानी मला कधी सायकल घेउन दिली नाही आणि ताईच्या दिराला बाईक नवऱ्याला कार कशी घेउन देणार.....  हे विचार माझ्या मनात आले पण मी काय करणार मी आतासा तिसरीत शिकत होतो...

                                           लग्न तोंडावर आल होत आणि जर का ह्या ईच्छा पूर्ण केल्या नाहीत तर अजुन लग्नात  विघ्न आणतील सासरची मंडळी ह्याची काळजी माझ्या घरच्यांना होती.. म्हणून बांबानी    लग्नाच्या आधी मी कार आणि बाईक चा बंदोबस्त करतो आणि लग्न झाल्यावर मुलगी एकदा सासरी गेली की घराच बघेन असा शब्द दिला.. आणि आता सासरचे आता निघून गेले... 

              त्या दिवशी आम्ही कोणीही रात्रभर झोपलो नाही.. लग्न हा सुखाचा आनंदाचा दिवस असतो पण आमच्यासाठी तो दुखाचा दिवस होता...  ताई तर लग्न करायलाच तयार नव्हती पण आईबाबांच्या आग्रहा खातीर ती तयार झाली... 

                       माझ्या बांबानी आईच मंगळसूत्र विकुन अजुन बाहेरंच्याचे कर्ज काढून कार आणि बाईक कशी बशी घेउन दिली कारण लग्नात काही प्रोब्लेम नको... आता फ्क्त मुंबईत घर द्यायच बाकी होत...... 

                      ताईच लग्न झाल एक वर्ष चांगल गेल.. आता मात्र माझ्या ताईचा छळ होऊ लागला... कारण अजुन आम्ही त्यांना घर घेउन दिल नव्हत ना.... नवरा मात्र रोज दारु पिउन यायचा... ताईला बेदम मारायचा.. ताई पण शेतात काम करयाची परत घरी येउन जेवण करायच... सासु नको नको ते बोलायची .. तुझ्या माहेरच्यानी फसवल अजुन घर नाय दिल...  कधी कधी तर ताईला पैसे आणायला आणि घर कधी देणार हे विचारायला माहेरी पाठवायची.. पण माझी ताई येउन ईकडे काय सांगायची नाही.. उगाच आई बांबाना त्रास... पण एकदा का आईबांबा झोपले की मला मात्र सांगायची आणि खुप रडायची... मी काहीच करु शकत नव्हतो... 

                 आईन विचारल कसा चाललाय संसार की खोटे हसु चेहऱ्यावर वर आणून ताई चांगला चाललाय सांगायची पण फ्क्त मलाच माहित होत की माझी ताई कीती सोसतेय ती....

          ताई एक दिवस रहायची आणि पुन्हा निघून जायची.. पण कशाला आली हे मात्र सांगायची नाही... पुन्हा सासरी जाऊन तोच जाच... तोच छळ.... तेच कष्ट....  माझ्या ताईची होणारी ओढाताण मला एक भाऊ म्हणून अजिबात बघवत नव्हती.... पण मी काय करणार होतो... 

                      एक दिवस तर माझ्या ताईला सासुने दिवसभर उपाशी ठेवले... आणि त्यात रात्री येउन नवऱ्याने बेदम मारले....  दिराने तर माचीस च कांड घेउन ताईच्या हाताला भाजल... आणि उद्याच्या उद्या माहेरी जाऊन घरांचा सोक्षमोक्ष लाऊन ये किवा दोन तीन लाख घेऊन ये... तरच घरी ये हात हलवत आलीस तर आज कमी मारलय उद्या मारुनच टाकू अशी धमकी दिली.... 

        ताई मात्र त्या दिवशी पाच दिवसानी पुन्हा माहेरी आली ताईला बघताच मी समजुन गेलो की ताईचा पैशासाठीच पाठवले असणार.. पण आईला ताईन " सहज आली ग तुमची आठवण आली म्हणून आली बघायला असच बोलली... खर बोलयची ताईची हिंमत होत नव्हती... 

              रात्र झाली आईबांबा गाढ झोपले... मी जागा होतो मला माहित होत ताई तीच मन हलके माझ्याशी करणार... आणि माझी ताई माझ्याजवळ येउन रडु लागली... तिच्या डोळ्यांतुन वाहणाऱ्या अश्रूंनी मला रडायला भाग पाडले....  तितक्यात मी ताईचा हात धरला आणि ताई ओरडली..." हात भाजलाय दिरान...  खुप दुखतोय रे...  मी गप्प उठून मलम आणला ताईच्या हाताला लावला....  आणि ताईन माझ्या डोळ्यांतले अश्रूं पुसले... 

                                 ताई मला बोलली " हे बघ छोटू मी उद्या जाणार आहे पुन्हा तुला बघायका किंवा भेटायला येइन की नाही माझ मलाच माहीत नाही... हे बघ आईबांबाची काळजी घेत जा हा.... मी मात्र मान डोलावत होतो.... ताईन माझा हात हातात घेऊन बोलली मला प्रोमिस कर की तु कुठल्याही मुलीला हुंड्यासाठि छ्ळणार नाहीस.. मी मात्र नाही छ्ळणार बोलून ताईच्या हात हातात दिला... पण ताई हे सर्व का सांगतेय हेच मला कळत नव्हत....   अन ताईच्या कुशीत जाऊन मी झोपलो....

                सकाळी ताई मी उठायच्या आतच सासरी निघून गेली...  आणि संध्याकाळी बांबाना फोन आला की.."  तुमच्या मुलीन स्वतःला जिवंत जाळून घेतली....  आता मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली होती...आईबांबाची काळजी घे हे  काळ ताई  सर्व मला का सांगत होती हे मला समजल होत.... माझ्या डोळ्यांत पाणी आले  पण एक मला कळत नव्हते की माझ्या ताईन स्वतः हुन पेटहुन घेतल की सासरच्यानीच पेटवल...पण माझी ताई एवढी कमकुवत नव्हती की स्वतःच्या जिवाची वाट लाऊन घेइल.... मला पूर्ण खात्री होती की सासरच्या लोंकानीच ताईला जिवंत जाळले असणार....  कारण त्याच लोंकानी ताईला धमकी पण दिली होती.... 

                 पण माझ्या ताईन खुप सोसल होत.. खुप भोगल होत.. पण स्वतः च्या आईवडिलांना अजिबात त्रास दिला नव्हता.....  आजही मला माझ्या ताईची खुप आठवण येते.... चुकी आमची पण होती घर द्यायच कबुल केल होत पण अजुन घर काही दिल नव्हत... ऐपत नव्हती आमची मुंबईत घर द्यायची पण लग्न मोडायला नको म्हणून बांबानी शब्द दिला होता.... शेवटी काय... एका हुंड्यान माझ्या ताईचा जीवच घेतला होता..... 

                        त्याच दिवशी मी ठरवल एका हुंड्यासाठी कोणत्याही मुलिशी लग्न नाही करायचे.... पैसा काय कमवु शकतो पण सुखाचा संसार करणारी मुलगी पाहिजे... पैसा आज आहे उद्या नाही..... 

     माझ्या ताईन जे भोगल ते दुसरी कोणी मुलगी भोगु नये....  आजही ताईचा भिंतीवरचा फोटो बघुन मी मनातुन रडत असतो.... माझ्या आईनंतर माझी दुसरी आई माझी लाडकी ताईच होती.. मला माझ्या ताईची आजही खुप आठवण येते... खुप आठवण येते..... 


                                                         धन्यवाद.... !!!


    मिलिंद विनायक ठिक...

    मु. पोस्ट चिंद्रावळे

     ता. गुहागर जि. रत्नागिरी

          मो. 7558229046

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel