©स्वप्ना मुळे(मायी)

      आई तुम्ही सांगितलेल्या सगळ्या परंपरा मी न कुरकुरता सांभाळते,....काही गोष्टींना वैज्ञानिक महत्त्व आहे म्हणून आणि काही मधुन मुलांवर संस्कार व्हावे म्हणून तर काही निव्वळ तुम्हाला समाधान मिळतं म्हणुन,.... मग काही गोष्टी मला पण करू द्या ना माझ्या समाधानाच्या,...

        त्यांच्या चर्चा ऐकून चहाचा कप ठेवायला आलेले सासरे तिथेच थबकले अरे आज काय चालू आहे सासु सुनात वादावादी,...सासुबाई जरा रागात होत्या त्यांनी सरळ तिच्याकडे बोट केलं विचारा तुमच्या लाडक्या सुनेला,...ऋचा खरंच लाडकी होती सासऱ्यांची,... इतकी सुशिक्षित  चांगल्या पदावर नोकरी करणारी,....पण घरी त्या शिक्षणाचा,...पदाचा अहंकार न दाखवता अगदी साधी आपली प्रत्येक भूमिका योग्य वठवणारी आणि तरी पण स्वतःचे छंद ओळख जपणारी,....."जे आनंद देत ते सगळं स्वीकारायचं आयुष्यात,..."आहे त्या वेळात सगळं नियोजन असायचं तिचं,..   तशी सासुबाईंनी पण आवडायचीच पण कधीतरी,...होत होते वाद,...आजच कारण तसंच होतं,...सासरे म्हणाले काय झालं सुनबाई??,...तेंव्हा डब्यात गोड खीर भरताना ती म्हणाली,"बाबा आईंना 9 दिवस नवरात्रीत कुमारिकेला खीर द्यायची आहे,...म्हणून समोरची मोना रोज येणार आहे खीर प्यायला,...आता तिच्यासाठी त्यांनी केलेली खीर मी जरा घेतली डब्यात कारण माझ्या ऑफिसच्या कॅन्टीनला पोळ्यावालीच्या दोन मुली असतात,...मला वाटत आहे जमेल त्या दिवशी त्यांनाही खीर देऊ आणि अष्टमीला त्यांना,..दप्तर,वॉटर बॅग आणि इतर वाचनाची पुस्तकं यानी त्यांची ओटी भरू,...पण आई म्हणतात,.. काय गरज ??छान आपल्याला माहीत असलेल्या घरातली कुमारिका आहे मोना तिलाच छान फ्रॉक आणू,...खीर पण नको नेऊ म्हणतात,.. आता त्यावरच चर्चा चालू होती आमची,...

      सासऱ्यांनी ऐकून घेतलं बरं आता उशीर झाला तू जा बोलू आल्यावर,...तो खिरीचा डबा ने आठवणीने,...सासुबाई फुगून कधीच्याच हॉल मध्ये गेल्या होत्या,...सकाळीच आटोपलेल्या आरतीच्या कपूरचा मंद सुगधं अजून सगळ्या घरभर होता,...तीच लिंक पकडत सासरे बुवा म्हणाले,...कापुराच्या वासाने कसं छान प्रसन्न वाटतंय ना,...तो  क्षणात जळून जातो तरी त्याच अस्तित्व  जाणवत राहत,... खरंतर आयुष्य सुद्धा असं पाहिजे आपण जे करतो त्याच स्मरण आपण नसलो तरी झालं पाहिजे हो ना,...आता सुनबाई जे करतीये तेच बघ ना,...त्या गरीब मुलींना चांगली काजु, बदाम आणि साजूक तुपाची खीर कधी मिळतही नसेल,...ती खाऊन त्यांचा अंतर आत्मा जेंव्हा तृप्त होईल तेंव्हा नकळत सुनबाईला चांगले आशीर्वाद देईल,... आणि त्यांची शैक्षणिक गोष्टींनी भरली जाणारी ओटी न जाणे उद्या त्यांच उज्जवल भवितव्य घडवतील तेंव्हा तर कायम त्या पोरी सूनबाईला स्मरतील,...खरंतर समोरची मोना आहेच ग कुमारिका पण ती खाऊन पिऊन तृप्त आहे,...त्यामुळे तू केलेल्या गोष्टींचं अप्रूप आणि कौतुक तिला फारसं नसणार,... तू घेशील तसे 100 ड्रेस तिच्या कपाटात असतील दोन दिवस मिरवेल आणि मग जाईल बोहरणीला,...त्यापेक्षा मोनाला तर करच तुला वाटतं तर पण त्याही पेक्षा सूनबाईला ज्या गरजू कुमारिकांना करावं वाटतं आहे तिला अडवू नकोस,...उलट प्रोत्साहन दे,...तेवढ्यात बेल वाजली,...दारात मोनाबाई हजर होत्या खीर प्यायला आलेल्या,...पाठीमागून मोनाची आई पण आली,... काकु उगी दोन चमचे द्या खीर,....तिला मुळीच आवडत नाही आणि तुमच चौथ घर आहे तिला बोलवणार,... आणि रोज तसं तिच येणं मूड वर आहे बरं,... तिला ते चायनीज जास्त आवडत,...किंवा चिप्सचे पुडे,... त्यामुळे खीर नाही झाली तरी चालेल अस काही,...मोना बाईने थेंब चाटला खिरीचा,..आणि आळस देत आई कडे बघितलं  आई म्हणाली बरं नको खाऊस,.. चला आणि काकु अष्टमीला ते ,फ्रॉक परकर पोलक नका हं घेऊ खूप आहेत घालत नाही ती त्यापेक्षा जीन्स,लेगीन असं चालेल चला येतो हं,...उद्या हाक मारा मग येईल ती,..

        सासुबाई हताश होऊन त्या टाकून दिलेल्या खीरी कडे पाहात राहिल्या,...

        संध्याकाळी सुनबाई सांगत होती ,..मुली खीर खाऊन खुश झाल्या,...फार सुंदर झाली खीर असा निरोप आहे आजीला,...सासुबाई हसल्या म्हणाल्या ,...तुझ्या ऑफिसकडे जे अनाथ आश्रम आहे मुलीचं तिथे जरा संख्या विचारून ये ग अष्टमीला मला त्या मुलींची,. ..आवश्यक  वस्तूनी ओटी भरायची आहे ,.. ,...पुस्तक ,पेन,...आणखी तू सुचव जरा,...

       सुनबाईने सासरेबुवा कडे बघितलं त्यांनी डोळे मिचकावले,...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel