सुरुवातीला सर्व महाद्वीप एकमेकांशी जोडलेले होते. या जुडलेल्या धरतीला प्राचीन काळी ७ द्विपांमध्ये वाटण्यात आले - जम्बू द्वीप, प्लक्ष द्वीप, शाल्मली द्वीप, कुश द्वीप, क्रौंच द्वीप, शाक द्वीप आणि पुष्कर द्वीप. यांपैकी जम्बू द्वीप सर्वांच्या मधोमध स्थित आहे.
जम्बू द्विपाचे ९ खंड होते - इलावृत, भद्राश्व, किंपुरुष, भारत, हरिवर्ष, केतुमाल, रम्यक, कुरु आणि हिरण्यमय. याच क्षेत्रात सूर आणि असुरांचे साम्राज्य होते.
काही लोक मानतात की ब्रम्हा आणि त्यांच्या कुळाचे लोक धरतीवरचे नव्हते. त्यांनी धरतीवर आक्रमण करून मधु आणि कैटभ नावाच्या दैत्यांचा वध करून धरतीवर आपल्या कुळाचा विस्तार केला होता. इथूनच धरतीवारचे दैत्य अन स्वर्गातील देवता यांच्यात लढाई सुरु झाली.
देवता आणि असुर यांची ही लढाई सुरूच राहिली. जम्बू द्विपाच्या इलावर्त (रशिया) क्षेत्रात १२ वेळा देवासुर संग्राम झाला. अंतिम वेळी हिरण्यकश्यपू याचा पुत्र प्रल्हादचा पौत्र विरोचन याचा पुत्र राजा बळीसोबत इंद्राचे युद्ध झाले आणि देवता पराभुत झाले तेव्हा संपूर्ण जम्बू द्वीपावर असुरांचे राज्य पसरले. या जम्बू द्विपाच्या मध्य भागात इलावर्त राज्य होते. अर्थात काही लोक मानतात की अंतिम युद्ध शम्बासूर याच्याशी झाले होते ज्यात राजा दशरथाने देखील भाग घेतला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.