काही जागांची स्पंदनं चांगली नसतात. स्मशान, मद्यालये, किंवा तत्सम इतर वाईट कृत्ये होत असणाऱ्या जागा. या ठिकाणी आपले तेजोवलय पटकन संक्रमित किंवा दुषित होऊ शकते. याउलट काही जागा अतिशय पवित्र आणि उच्च स्पंदने असलेल्या असतात. पृथ्वीच्या पाठीवर अशी 7 मुख्य ठिकाणे (power spots) आहेत ज्याना पृथ्वीची सप्तचक्रे म्हणतात. भारतात हिमालयात कैलास पर्वत हे असे ठिकाण आहे की जिथे उच्चतम सकारात्मक स्पंदने आहेत आणि त्याला पृथ्वीचे सहस्त्रार चक्र म्हणतात. जागांची स्पंदने विचारात घेऊन पूर्वजांनी मंदिरांची स्थापना केली. प्राचीन काळी तीर्थयात्रेला जायची प्रथा याचसाठी होती की आपले तेजोवलय शुध्द व्हावे. तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरात जाण्याचा नेम ठेवा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.