राजा विक्रमादित्य उज्जैन नगरीत राज्य करीत असे. राज्यात एक पन्नालाल नावाचा सावकार होता. तो फार दयाळू होता. तो नेहमी मदत करीत असे. त्याला हिरालाल नावाचा मुलगा होता. तो फार हुशार होता. तो उपवर झाल्यानंतर त्याच्यासाठी पन्नालाल योग्य वधुच्या शोधात होता. एके दिवशी त्याला एका ब्राह्मणाने सांगितले की समुद्राच्या पलीकडे एक व्यापारी आहे. त्याची कन्या सुशील व गुणवती आहे.

पन्नालालने त्याला जाण्या येण्याचा खर्च देऊन मुलाचे लग्न पक्के करून येण्यासाठी पाठविले. व्यापारी लग्नास तयार झाला. विवाहाची तारीख जवळ येताच मुसळधार पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर येऊन द्वीपपर्यंत जाण्यासाठी कोणताचा मार्ग खुला नव्हता. एक लांबचा मार्ग होता परंतू विवाह मुहूर्तावर पोहचणे अशक्य होते. पन्नालालला चिंता होऊ लागली.

ब्राह्मणाच्या सल्ल्यावरून पन्नालालने राजा विक्रमादित्यला आपली समस्या सांगितली. त्यांनी पन्नालालला हवेच्या वेगाने उडणार्‍या घोड्यांसह रथ देऊन टाकला. मात्र राजाला पुन्हा चिंता होऊ लागली. त्याने प्रदत्त दोन वेताळांचे स्मरण करून रथासह वर पक्षातील मंडळींना विवाहस्थळी सुखरूप पोहचवून येण्याची आज्ञा केली. वरात निघाली. ते दोन वेताळ रथासोबतच होते.

नियोजित मुहूर्तावर पन्नालालच्या मुलाचा विवाह मोठ्या थाडात संपन्न झाला. नव वर- वधुला घेऊन पन्नालाल सरळ राजदरबार दाखल झाला. विक्रमादित्यने वर-वधुला आशीर्वाद दिला. राजाने त्यांना घोडे व उडणारा रथ विवाहनिमित्त भेट दिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel