कौमुदी कथा सांगू लागली...
एके दिवशी रात्री राजा विक्रमादित्य आपल्या शयन-कक्षात झोपला होता. अचानक एका स्त्रीच्या रडण्याच्या आवाजाने राजाची झोपमोड झाली. राजा तलवार घेवून आवाजाच्या दिशेने चालू लागला. क्षिप्रा नदीच्या काठावर आल्यानंतर राजाला कळले की, तो आवाज नदी पलिकडच्या जंगलातून येत आहे. राजाने नदीपार करून पलिकडच्या किनार्‍यावर पोहचला. एका झाडाखाली एक स्त्री रडत असल्याचे राजाने पाहिले.

राजाने तिला रडण्याचे कारण विचारले. अनेकांना त‍िने आपली व्यथा सांगितली होती परंतु आजपर्यंत तिची कोणीच मदत केली नसल्याचे तिने राजाला सांगितले. राजाने तिला विश्वासाने सांग‍ितले की, तिला हर संभव मदत करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा ती स्त्री म्हणाली, ती एका चोराची पत्नी आहे. त्याला नगरकोतवालने पकडले असून एका झाडाला उलटे लटकवले आहे. आपल्या पतीला ती उपाशी लटकताना पाहू शकत नाही. त्याला तिची पाणी व जेवण देण्याची इच्छा आहे.

ती ‍स्त्री एक पिशाचिनी होती व झाडाला उलटा लटकलेला व्यक्ती तिचा पती नव्हता. राजा तिच्यासोबत त्या झाडाजवळ जाताच ती राजाच्या खांद्यावर चढली व तिने त्या व्यक्तीला खाऊन टाकले. तृप्त झाल्यानंतर ती राजा विक्रमावर खूष झाली. तिने राजाला वर मागितला. राजाने तिला अन्नपूर्णा मागितली. ती पिशाचिनी विक्रम राजाला नदी काठी घेवून गेली. तेथे एक झोपडी होती. पिशाचिनीने आपल्या बहिणीला बोलावले. तिच्या बहिनीने राजाला अन्नपूर्णा प्रदान केले.

अन्नपूर्णा घेऊन राजा राजधानीकडे निघाला. वाटेत त्याला एक ब्राह्मण भेटला. तो भुकेने व्याकूळ झाला होता. राजा विक्रमने अन्नपूर्णा पात्राला विनंती करू ब्राह्मणास पोटभर जेऊ घातले. भोजन पश्चात राजाने ब्राह्मणास दक्षिणा देण्याचे ठरविले. मात्र ब्राम्हणाने दक्षिणेत अन्नपूर्णा पात्र मा‍गितले. राजा विक्रमने कोणताचा विचार न करता ते पात्र ब्राह्मणास देऊन टाकले. ब्राह्मणाने राजाला आशिर्वाद दिला व त्याच्या मार्गाने निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel