शरीराच्या चामडीचा कारक बुध असतो. पत्रिकेत बुध जेवढ्या चांगल्या स्थानी असेल, जातकाची त्वचा तेवढीच तजेलदार आणि आरोग्यसंपन्न असेल. पत्रिकेत बुध पाप ग्रह राहू, केतू किंवा शनीशी दृष्टी किंवा युतीत असेल तर चार्म रोग होण्याच्या शक्यता वाढतात. रोगाची तीव्रता ग्रहांच्या प्राबल्यावर अवलंबून असते.
एक ग्रह दुसऱ्या ग्रहाला किती अंशांनी पूर्ण दिप्तांशात पाहतो किंवा नाही. रोग सामान्य देखील असू शकतो आणि गंभीर देखील. ग्रह कोणत्या नक्षत्रात किती प्रभावशाली आहे हे देखील रोगाची भीषणता ठरवते कारण एखादा रोग सामान्य असतो आणि बारा होऊन जातो. दुसरा रोग दीर्घ काल राहतो. ही अवस्था जातकाच्या जीवनात चालू असलेल्या महादशेवर देखील अवलंबून असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.