वास्तूत धूप किंवा सात्त्विक उदबत्ती लावावी किंवा कडुनिंबाच्या पानांची धुरी दाखवावी. काही चांगल्या शक्ती या वायुरूप आणि सुगंधाने आकर्षित होणार्या असतात. धूप केल्याने या चांगल्या शक्ती वास्तूत आकर्षित होतात अन् त्यामुळे वास्तू सात्त्विक बनते. तसेच धूप केल्याने काही वाईट शक्ती वास्तूतून दूर जातात. धुपातून प्रक्षेपित होणार्या रजोगुणी, तसेच पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित लहरींमुळे वास्तूतील कनिष्ठ देवतांच्या लहरी कार्यरत होण्यास साहाय्य होते. प्रथम कनिष्ठ देवतांना संतुष्ट केल्यामुळे वास्तूतील वाईट शक्तींच्या संचारावर नियंत्रण येण्यास साहाय्य होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.