पूर्वी काही मासिकांमध्ये "मुद्राराक्षसाचा विनोद" असा एक विभाग असायचा. त्यात काही वाक्ये, बातम्यांचे मथळे असायचे आणि त्या वाक्यांमध्ये एक किंवा दोन शब्द हे मुद्दाम काना किंवा मात्रा बदलून किंवा वेगळा शब्द टाकून लिहायचे. त्यामुळे वाक्याचा अर्थ असा काही बदलायचा की त्या वाक्याचा अर्थ एकदम विनोदी होवून जायचा. तशीच वाक्ये मी बनवली आहेत. मूळ बातम्यांमधील व्यक्तींचा नाम-उल्लेख मुद्दाम टाळला आहे. (कंसात दिलेले शब्द टाकल्यास मूळ वाक्य तयार होईल)