प्रकरण ७

दुसऱ्या दिवशी दुपारच्या आधी थोडा वेळ कनक ओजस ने पाणिनी च्या ऑफिस च्या दारावर विशिष्ट प्रकारे टकटक केली.सौम्या ने दार उघडून त्याला आत घेतले.

“ मला दोन-तीन गोष्टी सांगायच्या होत्या, म्हंटलं स्वतःच जाऊन सांगाव्यात.”-कनक

“ बोल ना.काय आहे?”पाणिनी नं विचारलं

“ पाहिली गोष्ट म्हणजे, मधुरा खरं बोलते आहे. तिने खरंच जनसत्ता बँकेतून तिच्या खात्यातून हजर रुपये काढले आहेत.ती त्या खात्यात अधून मधून थोडे थोडे पैसे भरत असते.पैसे काढताना तिने करकरीत पाचशे च्या नोटांची मागणी केलीहोती असं कळलंय.”

पाणिनी च्या कपाळावर आठ्या पडल्या.

“ पाणिनी याचा अर्थ चोरीचा कांगावा करायचा असा तिचा आधी पासूनच विचार होता.आणि चोरीची राकामाही तिच्या डोक्यात पक्की होती.हजार रुपये.”

“ खुलासा म्हणून तुझा मुद्दा पटला मला. दुसरी काय माहिती आहे?” पाणिनी नं विचारलं

“ आता मी जे काही सांगणारे ते तुला कदाचित उपयोगी नसेल किंवा मी पूर्व गृह दूषित मत देतो आहे असे वाटेल.”

“ नाही वाटणार.बोल तू.”पाणिनी म्हणाला.

“  डेक्कन वरच्या ग्लॉसी कंपनीच्या रिसेप्शानिस्ट शी बोललो. ती चुकीचं सांगत नसावी अस मत माझ्या माणसाने दिलंय. म्हणजे त्याने दुजोरा दिलाय.”

“ काय ”

“ कंपनीच्या आवारात  रोज पेन्सिल, गॉगल वगैरे  विकणारी बाई रोज एकच नसते. ” कनक

“ काय !! ” पाणिनी आपल्या खुर्चीतून अर्धवट उठत उद्गारला.

“ तेच सांगतोय.  तिचं म्हणणं आहे की त्या वेगळ्या वेगळ्या बायका आहेत. कधी एक असते तर कधी दुसरी. त्या गडद रंगाचा गॉगल घालतात, काठी वापरून  अंध असल्या सारखा अविर्भाव करतात. कपडे सारखेच असतात.हुबेहूब दिसतात. पण त्या दोघीताला एक फरक तिला जाणवला म्हणजे त्या दोन बायकांपैकी एकीच्या उजव्या पायातला बूट हा वेगळा करून घेतल्या सारखा वाटतो.त्या बुटाला अंगठ्याच्या जागी एक फुगवटा आहे, तो बाहेरून जाणवतो. दुसऱ्या बाईचे बूट मात्र नेहेमी सारखे साधेच आहेत. आमचा माणूस त्या रिसेप्शनिस्ट बाई एवढे निरीक्षण नाही करू शकला, त्याने दोन-तीन वेळा त्या बाईला पाहिलं पण बुटाचा मुद्दा त्याच्या लक्षात नाही आला.” कनक म्हणाला.

“ ठीक आहे. रिसेप्शनिस्ट रोजच बघते म्हणून तिला ते लक्षात आलं असेल.” पाणिनी म्हणाला.

“ ओळखण्यासाठी म्हणून तिने त्या बायकांना दोन वेगळी नावं दिली आहेत. फुगीर आणि  सपाट ”

“ तिने हे तिला जे कळलंय ते कोणाला सांगितलेले नाही ना?” पाणिनी नं विचारलं

“ शेजारच्या टेलिफोन ऑपरेटर ला”

“ तू स्वतः ऑपरेटर शी बोलला आहेस?” पाणिनी नं विचारलं

“ नाही रे.ते जमलं नाही कारण त्यांची वार्षिक सभा आहे येत्या काही दिवसात त्यामुळे बरेच सभासद सारखे फोन करताहेत.त्यामुळे फोन ऑपरेटर खूप व्यस्त आहे.”

“ कनक, तुझा माणूस ग्लोसी कंपनीच्या आवारात  पाठवून या दुसऱ्या बाई बद्दल माहिती काढ.एक आपल्याला माहितीच आहे, मधुरा आहे. दुसरी कोण आहे पहा. टॅक्सी ड्रायव्हर कडून नको काढू माहिती, कारण त्यांचे कडून त्या बाईला बातमी जायची शक्यता आहे,कारण प्रत्येकी ला  तिचा वेगळा ड्रायव्हर ने-आण करत असेल. अशीही शक्यता आहे की एकच ड्रायव्हर दोघींना ने आण करत असेल.तुझ्या माणसाला टॅक्सी ड्रायव्हर चा पाठलाग करून घरी सोडताना तो ड्रायव्हर कुठे सोडतो ते शोधून काढायचंय.जर दोन बायका असतील तर दुसरी कुठे राहते ते समजलं पाहिजे. कनक हसतोयस का तू?”

“ कारण तुझ्या मनात आहे ते मी आधीच केलंय.” कनक म्हणाला.

“ कधी?”

“ इथे येण्यापूर्वी अर्धातास.”

“ छान काम केलसं कनक.”

“ माझ्या माणसाने एकीचा पाठलाग केला, म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर चा. मला सांग, पाणिनी, क्षिती अलूरकर बरोबर रहात असलेली मधुरा महाजन तुझी अशील आहे?”

“ मधुरा महाजन बरोबर रहात असलेली क्षिती अलूरकर ही मदालसा हॉटेल मधे वेट्रेस म्हणून काम करते.ती माझी अशील आहे.”

“ छान आहे?”

“ एकदम.” पाणिनी ने उत्तर द्यायच्या आधी सौम्या उद्गारली.

“ याला नेहेमी चिकण्या अशील कशा मिळतात सौम्या?”-कनक

“ तुलाही मिळतील. कधीतरी.” पाणिनी म्हणाला.

“ कधीतरी नाही अत्ताच मला तिच्याशी बोलायला लागणारे पाणिनी.वरकरणी दिसतंय तसं हे साधं नाहीये प्रकरण.” कनक म्हणाला.

“ बोल. पुढे काही विशेष घडलं तर.” पाणिनी म्हणाला.

कनक ओजस ऑफिसातून बाहेर पडला.

“ सौम्या. मदालसा मधे फोन लाव आणि क्षिती आहे का बघ.असेल तर मला जोडून दे फोन, नसेल तर तिला आपल्या ऑफिसात फोन करण्या बाबत निरोप देऊन ठेव.”

सौम्या ने ने लगेच फोन लावला. बरंच वेळ फोन वर बोलली.पाणिनी तिचं बोलणं ऐकत होता.पण पलीकडून काय बोललं जातंय याचा अंदाज येत नव्हता.

“ सर, ती आहे हॉटेलात पण कामावर असतांना ते फोन घेऊ देत नाहीत आणि निरोपाची व्यवस्था ही नाही. फारच कडक नियम आहेत.”-सौम्या

“ सौम्या आपण आज पुन्हा त्या हॉटेलात जेवायला जाऊ पुन्हा. आणि हेड वेट्रेस ला सांगू क्षिती ला आमचं टेबल दे. म्हणजे आपल्याला जरा बोलता येईल. आणखी एक काम कर,  जुन्या कार ची विक्री करणाऱ्या आणि कार भाडयाने देणाऱ्या  चक्रधर नावाच्या शो रूम ला फोन लाव. त्यांना म्हणावे आमच्या एका अशिलाला, या महिन्यात एक जुन्या गाडीची गरज आहे.पण ती घेण्यापूर्वी पाच सहा दिवसांसाठी  भाडयाने कार हव्ये. क्षिती ला त्या हॉटेलातून रात्री अपरात्री बस साठी थांबायला लावणे धोकादायक आहे.”

“ आपण कनक ला पण न्यायचे का मदालसा  हॉटेलात जेवायला.?”-सौम्या

“ नको.” पाणिनी म्हणाला.

“ का हो ? त्यांची नेहेमी तक्रार असते ना पाणिनी फक्त सौम्या ला फिरवतो आणि खाऊ पिऊ घालतो ऑफिस च्या खर्चाने म्हणून ?” –सौम्या

“ माझ्याशी पैज लावतेस सौम्या, क्षिती ला बघण्या साठी तो आपण बोलावण्याची वाट न बघता एव्हाना मदालसा वर पोचला असेल. ” पाणिनी म्हणाला.

“ पैज नाही लावत, त्या ऐवजी मी चक्रधर ला फोन लावते सर ! ” सौम्या म्हणाली.

( प्रकरण ७ समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel