टीप : आधीच्या भागांत लिहिले होते इथे पुन्हा लिहीत आहे. ह्या लेखमालेला अभ्यासपूर्ण लेख म्हणून पाहू नये पण ओपिनियन पीस ह्या दृष्टिकोनातून वाचावे. चीन ह्या विषयांवरील माझा अभ्यास हल्लीच सुरु झाला असल्याने मला त्यातील जास्त ज्ञान नाही.

चीन चा इतिहास अत्यंत जुना आहे. जगांतील सर्वांत जुन्या संस्कृतींपैकी हि एक. जुनीच नाही पण प्रत्येक काळांत ह्या लोकांनी जगावर आपला काही ना काही ठसा उमटवला आहे. गणित, विज्ञान इत्यादी अनेक क्षेत्रांत ह्या लोकांनी नेहमीच मोठे योगदान दिले आहे. पण त्याच वेळी हे राष्ट्र् इतरांसाठी थोडे "गूढ" स्वरूपाचे आहे. चीन देशाचा संपूर्ण इतिहास इथे लिहू शकत नाही. पण सध्याचा चीन हा निःसंशय पाने प्रेसिडेंट Xi  (ची) ह्यांचा आहे. आणि ची ह्यांना समजल्याशिवाय चीन समजणे कठीण आहे.

माओ चा चीन हा साम्यवादी होता. साम्यवादाचे एक विशष्ट लक्षण म्हणजे शेवटी हा त्या समाजाला पूर्णपणे बुडवतो. गरिबी, भ्रष्टाचार हिंसा हि साम्यवादाची अखेरची पायरी आहे. माओ च्या चीन मध्ये सुद्धा तेच घडले. लोक विजिगिषु असल्याने प्रतिकूल राजकीय परिस्थिती असली तरी देश अगदीच रसातळाला गेला नाही. त्याबाबतीत भारतीय आणि चिनी लोक एक समान आहेत. योग्य प्रकारची राजकीय व्यवस्था आणि समाज निर्माण करण्यात ह्यांना अपयश आले तरी इतरांनी निर्माण केलेल्या समाजांत हि मंडळी भरपूर भरभराट करते. तुलनेने आफ्रिकन साम्यवादी देशांची पुरती वाट लागून गेली. पण चीन ने योग्य वेळी आपले आर्थिक धोरण बदलले .

साम्यवादी अर्थकारण देशाला बुडवणार हे लक्षांत येऊन चीन ला 1979 मध्ये आपले आर्थिक धोरण बदलावे लागले आणि त्यांनी देशांत "मार्केट" पद्धती म्हणजे किमान आर्थिक क्षेत्रापुरते का होईना पण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. तेंव्हा पासून आता पर्यंत चीन ने अत्यंत नेत्रदीपक प्रगती केली. विश्वाच्या संपूर्ण इतिहासांत अमेरिका आणि चीन ह्यांची प्रगती हि एका चमत्कारा पेक्षा कमी नाही.  अमेरिकन राष्ट्र हे शून्यातून देशांतील सर्वांत बलाढ्य राष्ट्र बनले. साधारण १९३० पर्यंत अमेरिकन अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने वाढत गेली आणि त्या काली अमेरिकन सरकार हे अत्यंत छोटे होते. म्हणजे एकूण GDP च्या फक्त ३% (सध्या साधारण ४०% आहे).

अमेरिकन मॉडेल त्यानंतर अनेक देशांनी आत्मसात केला. जपान, दक्षिण कोरिया हि चांगली उदाहरणे आहेत. १९४७ मध्ये भारताला संधी होती पण भारताने सोविएत मॉडेल चे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला.

बहुतेक पाश्चात्य राष्ट्रांची प्रगती हि शिरेवती मुक्त अर्थव्यवस्था ह्यामुळे झाली. पाश्चात्य राजकीय व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था ह्यांचा मूळ पाया शेवटी पाश्चात्य विचारवंत जसे जॉन स्टुअर्ट मिल, ऍडम स्मिथ, बास्तियात, ह्यूम इत्यादींनी घातला तरी त्यांच्या मागे प्रेरणा अनेक ऐतिहासिक घटनांची होती. चर्च ने केलेला संहार, विविध राजानी केलेला संहार, जन्मजात वर्ण (aristrocracy) ,  मॅग्ना कार्टा इत्यादी अनेक गोष्टीचा प्रभाव ह्या लोकांवर होता आणि त्यातून पाश्चात्य राष्ट्राच्या आधुनिक व्यवस्थेची निर्मिती झाली. मार्क्स आणि अंगेल्स ह्यांच्या विचारसरणीचा संपूर्ण पराभव पश्चिम युरोप आणि अमेरिकेत झाला असे आपण म्हणून शकतो. पाश्चात्य संस्कृती आणि राजकीय आर्थिक व्यवस्था हि शेवटी अत्यंत खोल आणि मजबूत अश्या वैचारिक आधारावर निर्माण झाली. सामाजिक ध्येय हे व्यक्तिगत स्वातंत्र्य हे असून स्वातंत्र्याला सर्वांत मोठा धोका हा सरकारकडून असतो आणि त्यामुळे सरकारपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रणा ज्यातील "घटना" हे एक सर्वांत महत्वाचे साधन आहे.

पाश्चात्य समाजात तीन प्रकारच्या स्वातंत्र्याना महत्व आले. आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्य. काही अर्थाने वैयक्तिक स्वातंत्र्य हा इतर दोन स्वातंत्र्यांचा पाया आहे. आधुनिक आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करायचे असेल तर ह्या तिन्ही स्वातंत्र्याची गरज आहे. स्वातंत्र्याला सर्वांत मोठा धोका हा सरकार कडून असतो त्यामुळे सरकारला कमीत कमी शक्ती द्यायची, आणि सरकार म्हणजे लोकांच्या हातातील एक टूल अश्या स्वरूपांत त्याला वापरायचे आणि त्यासाठी लोकशाही हा मार्ग पत्करायचा असा हा मॉडेल होता.

चीन ने मार्केट पद्धती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य वाढवायचे ठरवले तर चीन समृद्ध बनू शकतो का ? ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित १९७९ कुणाकडेच नव्हते. राजकीय स्वातंत्र्य नसताना आर्थिक स्वातंत्र्य चालू शकते का ? ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा कुणाकडेच नव्हते.

चीन ने प्रचंड वेगाने आर्थिक प्रगती केली तेंव्हा अमेरिकन आणि पाश्चात्य विचारवंत आपले अंदाज लावत होते. आर्थिक प्रगतीसोबत चीन मधील लोक जास्त वैयक्तिक आणि राजकीय स्वातंत्र्याची मागणी करतील असा त्यांचा कयास होता. चीन मधील राजकीय नेतृत्व हे साम्यवादी नसून साम्यवाद फक्त तोंडी लावायला वापरत आहे असा त्यांचा कयास होता. चीन ची संपूर्ण प्रगती शेवटी भांडवलवादी आणि खाजगी मालमत्तेमुळे झाली आहे आणि त्यामुळे अर्धा शेर अक्कल असलेला माणूस सुद्धा हे साम्यवादाचा पराभव म्हणून सहज पाहू शकतो असे विविध पाश्चात्य मंडळी लिहीत होती. त्यामुळे साधारण २०१५ मध्ये चीन लोकशाही स्वीकारेल असे काही विचारवंतांनी खूप आधी लिहिले होते. पण ह्यांतील काहीही घडले नाही. उलट चिनी साम्यवादी पार्टी अधिक शक्तिशाली बनली आणि त्यांची महत्वाकांक्षा सुद्धा वाढत गेली.

आता थोडे अवांतर घेऊया.

साम्यवाद हि शून्य किंवा १००% प्रकारची सिस्टम आहे.  १०% साम्यवादी असे काही नसते. साम्यवादी म्हणजे १००% अनिर्बंध सत्ता. ती ९९% असली तर ज्याच्याकडे १% आहे तो सुद्धा तुम्हाला चॅलेंज करू शकतो. राजा नागडा आहे हे गर्दीतील एका व्यक्तीने जरी मोठ्याने ओरडून सांगितले तर मग राजाच्या सत्तेला ते आव्हान बनते. लेनिन ने हे समजले होते आणि स्टालिन ने खूप चांगल्या पद्धतीने अमलांत आणले होते. ह्याला आपण लेनिन ची सत्तापध्दती म्हणू शकतो.

साम्यवादांत तुम्हाला मीडिया पासून शिक्षण आणि उद्योग पासून दळण वळण प्रत्येक गोष्टीवर ताबा ठेवावा लागतो. कुठेही ढील ठेवून उपयोगी नाही. कुठेही असंतोष व्यक्त करायला देणे नाही. त्यामुळे साम्यवादी देश बाहेरून कसे अगदी आल बेल आहेत असे वाटतात.

> The Soviet Union was transformed from a predominantly rural society in the 1930's to one in which, by the 70's, the urban population outnumbered the rural one by almost two to one. Millions of people were acquiring television sets, where Western programs gave a glimpse of material life in the capitalist world. Well-dressed Western tourists appeared in growing numbers on Moscow's streets. And technologies like shortwave radios and tape recorders made it harder for the K.G.B. to seal off the Soviet population from capitalist culture and the ideas of the West. People were becoming increasingly aware that the Soviet Union was lagging far behind the living standards of the West. The regime's propaganda was a lie.

> Reformists like Yuri V. Andropov, the K.G.B. chief who became party leader, and then Gorbachev, his protégé, toned down their anti-Western rhetoric and began to call for the adoption of more advanced and technocratic (Western) methods to rescue the Soviet economy.

गोर्बाचेव्ह हे थोडे रिफॉर्मिस्ट प्रकारचे होते. कम्युनिस्ट पार्टीत रिफॉर्म येऊ शकेल अशी भोळी आशा त्यांना वाटली असावी. पण कधी कधी लोकरीच्या स्वेटरचे सूत सुटावे आणि आपण ते ओढावे आणि अख्खा स्वेटर त्यातून उस्कटुन यावा असे काहीसे झाले.

सोविएत रशिया का नष्ट झाली हा भला मोठा विषय आहे. ह्या विषयावर अनेकांनी खोल चिंतन केले आहे, पण चिनी राष्ट्राध्यक्ष ची ह्यांनी ह्या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. रशिया चा ऱ्हास म्हणूनच त्यांनी चिनी साम्यवादी पार्टीत अनिवार्य वाचनाचा भाग केला. त्यातून धडा घेऊन आपण तीच मिस्टेक करायची नाही हे ची ह्यांचे धोरण आधीपासून होते.

** चीन आणि सुधारणा **

मुक्त अर्थव्यवस्थेपासून चीन ला फायदा झाला तर तिथे राजकीय सुधारणा आपोआप होतील असे पाश्चात्य मंडळींना वाटले होते त्याला ची ह्यांनी चुकीचे ठरवले. चीन ची आधीची प्रगती हि फक्त स्वस्त कामगार स्वरूपांत निर्माण झाली. हळू हळू चीन मधील सुबत्ता वाढत गेली. पाश्चात्य मंडळींना हे एक कोडेच वाटत होते. गुरुवर्य श्री मिल्टन फ्रीडमन ह्यांनी सुद्धा चीन च्या उदाहरणावरून आर्थिक स्वातंत्र्य नेहमीच राजकीय स्वातंत्र्य घेऊन येत नाही असे मान्य केले.

चीन मध्ये राजकीय सुधारणा विशेष झाल्या नाहीत. आणि त्या झाल्या नाहीत म्हणून पाश्चात्य जगाला चीन विषयी संशय वाटू लागणे साहजिक होते.

चिनी नेत्यांना खरोखरच साम्यवाद महत्वाचा वाटतो का ? ते खरेखुरे साम्यवादी आहेत का ? ह्या प्रश्नाचे उत्तर चि ह्यांनी २०१३ साली स्वतः दिले.

There's a quotation from Xi Jinping that has been made a lot of over the last couple of years, although it dates from 2013, he gives a behind closed doors speech to new members of the central committee. And then the speech is, of course, we have no idea what he said behind closed doors, but the speech appears in one of the party's most important journals. And here's what Xi Jinping says in 2013, ***"There are people who believe that communism is an unattainable hope. But facts have repeatedly told us that Marx and Engel's analysis is not outdated. Capitalism is bound to die out."***

चिन आणि रशियन अभ्यासक स्टीफन कोटकिन ह्यांच्या मते ह्या एका वाक्यात ची ह्यांचे राजकीय तत्वज्ञान स्पष्ट होते. मार्केट पद्धतीने कितीही सुब्बत्ता अली तरी साम्यवादी नेत्यांना ते एक साधन वाटते जे वापरून ते आपली राजकीय पकड जास्त घट्ट करू शकतात. त्यामुळे चिनी साम्यवादी पार्टी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारच्या राजकीय सुधारणा करणार नाही.

पण अर्थी सुबत्ता येते तशी खाजगी मालमत्ता वाढते. चिनी कंपन्या ह्या आंतराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू पाहतात आणि अमेरिकन किंवा युरोप च्या मार्केट मध्ये स्पर्ध करू पाहतात. एकदा जॅक मा सारखया व्यक्ती श्रीमंत झाल्या कि त्यांची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता वाढते. आणि ह्या व्यक्ती आपण स्वतः एक "सत्ता केंद्र" बनतात. अश्या व्यक्ती मग तो मुलगा बनू शकतात जो ओरडून राजा नागडा आहे असे सांगू शकतात.

चिनी साम्यवादी पार्टी आणि चि ह्यांना त्याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे अनेक चिनी कंपन्या मोठ्या झाल्या तरी वेळोवेळी सरकारी दंडुका वापरून त्यांना ताब्यांत ठेवण्याची तारेवरची कसरत पार्टी करत आहे. चिनी सुबत्ता हि शेवटी खाजगी चिनी व्यक्तींनी निर्माण केली आहे आणि त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य असणे महत्वाचे आहे. पण हे स्वातंत्र्य म्हणजे चिनी साम्यवादी पार्टीची सत्ता कमी करणे होय. आपली राजकीय पकड घट्ट करायची असेल तर आर्थिक सुबत्तेला तिलांजली देण्याचा निर्णय शेवटी चि ह्यांना घ्यावा लागणार आहे आणि त्यांनी तो घेतला सुद्धा आहे. म्हणूनच चिनी अर्थव्यवस्था आधीपेक्षा मंद झाली आहे आणि हि मंदी वाढणार सुद्धा आहे.

भारतीय चीन तज्ञ् अरुण शॉरी ह्यांनी २०१२ मध्ये लिहिलेल्या पुस्तकांत त्यांनी लिहिले आहे साम्यवादी पार्टीची लोकप्रियता कमी झाली कि पार्टी "चिनी राष्ट्रवाद" ह्यावर भर देईल आणि विनाकारण भारत किंवा इतर देशांची कुरापत काढेल. ह्यांत भारतावर हल्ला ह्यापेक्षा चिनी साम्यवादी पार्टीचे सत्तेचे केंद्रीकरण हे प्रमुख धोरण असेल.

भारत पासून युगांडा पर्यंत आणि रशिया पासून व्हेनेझुएला पर्यंत साम्यवादी आणि समाजवादी विचारसरणीने शेण खाल्ले आहे. तरी सुद्धा विचारसरणी चुकीची आहे हे त्यामधील कुणीच मान्य करत नाही.  भारतातील समाजवाद हा १००% समाजवाद नव्हता किसून व्हेनेझुएला मधील नेते बरोबर नव्हते अशी करणे दिली हातात. ह्यावेळी आपण योग्य पद्धतीने साम्यवाद किंवा समाजवाद प्रत्यक्षांत आणू असे नवीन नेते सांगतात. चि ह्यांनी सुद्धा तेच केले. बदल आवश्यक आहे असे मेनी करणे साम्यवादी लोकांसाठी धोक्याचे असते कारण त्यामुळे त्याच्या सत्तेवरील पकडीला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच दुसऱ्या बाजूने साम्यवाद हा आज सुद्धा रेलेवंट आहे असे कठोर पानणे सांगण्याची ची ह्यांना गरज भासली. आणि ते खोटे बोलत नव्हते. त्यांना स्वतः तसे वाटत होते.

स्टीफन कोटनिक ह्यांचे विवेचन पाहू :

They think that we can do it better next time, that it wasn't because of the ideology, it was because of leaders, leaders, Stalin made mistakes, or Mao made mistakes. We'll correct those mistakes, we'll have better leaders. And we'll get to socialism with a human face or communist reform. That is very destabilizing for the system because the system produces that, the system produces the reform impulse from within, it also produces the hard line impulse, the Andropovs, or the Xi Jinpings, which is to say, yes, we have a need for more dynamism in the system, but not at the expense of the monopoly power we have. And so that tension between the so-called reformers, who are essentially wearing suicide vests, right? That's auto liquidation if they get to power versus the hard liners who are correct, but don't have, they're correct about the threat to the political stability, but they don't have a growth mechanism because the markets, the private sector, the GDP growth and the job creation, all comes from something that they don't really believe in. So this is the core problem of self-destabilization of communist regimes. Let's give them credit there. They've had a remarkable run of decades and decades of tremendous economic growth, lifting people out of poverty because they liberalized economically and legally permitted a private sector, which did drive that growth, did create those jobs, and has produced an economic miracle of global impact.

You can insert communist parties into the private sector, but you still have private owners. Whereas state-owned enterprises are much easier for them to control, but then you don't get the GDP growth. Then you don't get the dynamism, the job growth. There are other reasons why their growth is slowing, politics, communist monopoly is not the sole reason, but it is the reason everyone ignored, because we thought that quotes like that, one that you read from 2013, were cynicism, but they're not cynicism. And they are a vulnerability, a self-created vulnerability of the system.

चीन ची कमजोर बाजू :

चीन विषयी भारतीय किंवा अनेक वेळा अमेरिकन नेते बोलतात तेंव्हा अश्या पद्धतीने बोलतात कि जणू काही चिनी सरकार आणि राज्यव्यवस्था हि १००% जिनिअस लोकांनी भरलेली आहे. त्यांचं चिलखतांत एकही भोक नाही. चिनी सैनिक हे सर्वोतृकृष्ट आहेत, चिनी हस्तक सगळीकडे आहेत. दक्षिण अमेरिका पासून आफ्रिका पर्यंत सर्वत्र चीन ने आपल्या सामर्थ्याचे जाळे विणले आहे. "व्यापार" ह्या विषयांत चीन ने सर्व राष्ट्रांना शह दिला आहे इत्यादी इत्यादी.

चीन ची कमजोरी काय आहे ह्यावर फारच कमी लिखाण आहे. चीन म्हणजे एक मोठा शत्रू दाखवून आपल्या जनतेला घाबरवणे हे विविध नेत्यांना राजकीय दृष्टया फायद्याचे आहे. ट्रम्प पासून मोदी पर्यंत आणि बोरिस पासून मॉरिसन पर्यंत सर्वानीच ह्या प्रकारे चीन चा मोठा बाऊ केला आहे. मला चुकीचे समजू नका, चीन हि आर्थिक दृष्टया आणि सामरिक दृष्टिकोनातून मोठी शक्ती आहे ह्यांत काहीही संशय नाही. पण त्यांच्या चिलखतांत काहीच भोके नाहीत हि मला तरी अतिशोयोक्ती वाटते.

नाटो, पूर्व आशियायी देश, भारत, इतर छोटी राष्ट्रे सर्वानाच आता चीन एक आंतराष्ट्रीय धोका वाटतो. चीन आणि सोविएत ह्यांच्यातील सर्वांत मोठा फरक म्हणजे चीन ने शत्रुत्वाची भूमिका घेण्याऐवजी पार्टनर ची भूमिका घेतली. चीन मुळें संपूर्ण विश्वाचा प्रचंड फायदा झाला. चीन ने किमान ५०० दशलक्ष आपल्या लोकांना हलाखीच्या गरिबीतून वर काढले असेल पण त्याच वेळी चीन ने भारत, अमेरिका, युरोप आणि आफ्रिका इत्यादी देशांतून किमान १००० दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर येण्यासाठी मदत केली. चीन ची आर्थिक सुबत्ता हि मार्केट पद्धतीने निर्माण झाल्याने सर्वच जगाचा ह्यातून अतोनात फायदा झाला आहे. त्याचमुळे चीन ला निव्वळ शत्रू म्हणून पाहणे कुठल्याही देशाला शक्य नाही. अमेरिका सोडल्यास कुठल्याही राष्ट्राला आज चीन सोबत ट्रेड वॉर शक्य नाही.

त्यामुळे इतर सर्व राष्ट्रांना चीन सोबत आपले संबंध एकेरी दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी विविध पैलूंनी पाहावे लागतील आणि त्याप्रकारे चीन ला शह द्यावा लागेल. ट्रम्प हे अर्धवट आणि संधीसाधू असले तरी चीन वरील त्यांनी जे आरोप केले त्यामुळे चीन विषयावर अमेरिकेत तरी अनेक साहित्य निर्माण झाले. (चीन ह्या विषयावर ट्रम्प ह्यांना सल्ले  देणारा माणूस हा एक वेडपट डेमोक्रॅटिक नेता होता ज्याने हल्लीच पार्टी बदलली होती आणि विविध खोट्या नावानी तो आपले पुस्तके छापत होता. ह्याला ट्रम्प ह्यांच्या जावयाने अक्षरशः गुगल वर सर्च करून शोधले होते. त्यामुळे ट्रम्प ह्यांचा चीन विरोध हा काही तत्वावर आधारित होता असे अजिबात नाही. त्यामुळे ट्रम्प तात्याकडून सुद्धा ह्या विषयावर rhetoric सोडून जास्त काही अपेक्षित नाही).

चिनी लोक अत्यंत कष्टाळू आणि उद्योगशील आहेत ह्यांत अजिबात शंका नाही. योग्य वातावरणात हे लोक खूप प्रगती करतात. उद्या ह्यांनी महासंपन्न आणि महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण केले तर त्यात नवल अजिबात नाही. पण त्याची प्रगती हि इतर राष्ट्रांसाठी धोकादायक ठरणार नाही हे त्या राष्ट्रांना पाहावे लागेल आणि त्यासाठी चीन ची कमजोरी त्यांना ओळखून त्याचा फायदा घ्यावा लागेल.

प्रत्येक क्षेत्रांत चीन ने जी प्रगती केली आहे त्यामुळे संपूर्ण जगाचा फायदा होत आहे. हि चांगली स्पर्धा चांगली गोष्ट आहे. त्याशिवाय चिनी लोक देश सोडून इतरत्र स्थायिक होत आहेत आणि प्रगती करत आहेत हि सुद्धा माझ्या मते चांगली गोष्ट आहे. ह्यांत भारतासारख्या देशांनी सुद्धा जर चीन बरोबर स्पर्धा करण्यासाठी जास्त प्रयत्न केले असते तर अमेरिका किंवा युरोप ह्यां चीन सोडून पर्याय निर्माण झाला असता.

चीन देश प्रत्यक्षांत मांचुरिया, तिबेट, अंतरीचे मंगोलिया, जिनजिआंग इत्यादी भागांचा बनला आहे. सध्या तरी कम्युनिस्ट पार्टीने सर्वत्र हान वांशिक लोकांची बहुसंख्या करून ह्या भागातील मूळ लोकांची पुरातन ओळख नष्ट करण्याचा खटाटोप केला आहे. तैवान वर त्यांची सत्ता नसल्याने तिथे त्यांना ते शक्य नाही. हाँग कोन्ग मध्ये त्यांना प्रचंड विरोध होत आहे. तिबेट मध्ये अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे त्यांना ते शक्य नाही. हिमालयन प्रदेशांत भारतीय सैनिक आणि नेपाळी सैनिक अत्यंत गर्वाने काम करत असले तरी चिनी सैनिकांसाठी ते punishment पोस्टिंग आहे. चीन देश हा नेहमीच एका सत्ता केंद्रा भोवती फिरत असला तरी मोठ्या क्रांत्या आणि रक्तरंजित उलथापालथ त्यांना सामान्य गोष्ट आहे. चिनी लोक परंपरावादी आहेत आणि परंपरागत ज्ञान आणि सिस्टम्स वर भर देत आले आहेत. आधुनिक साम्यवादातांत फक्त सत्ताकेंद्र एक आहे असे नाही तर त्यांनी संपूर्ण सत्ता हि vertically integrated बनवली आहे. ह्यातून भ्रष्टाचार, वांशिक भांडणे वगैरे प्रकार आहेत जे चीन लपवून ठेवत आहे.

चिनी साम्यवादी पक्षाच्या हल्लीच प्रकाशित केलेल्या रिपोर्ट प्रमाणे चीन ला सर्वांत मोठा धोका आहे तो म्हणजे देश सोडून जाणाऱ्या लोकांचा. चीनमधून लक्षावधी लोक देश सोडून कायमचे जात आहेत आणि ह्यांत उच्चशिक्षित आणि श्रीमंत लोकांचा भरणा जास्त आहे. इतर देशांतील लोक चीन मध्ये जाऊन राहण्यास अजिबात उत्सुक नाहीत. विविध चिनी संशोधक आज अमेरिका आणि युरोप मध्ये खूप चांगले काम करत आहेत. ह्यां पुन्हा चीन मधेय आणण्यासाठी चिनी सरकारने अनेक खटाटोप केले काही वेळा त्यांच्या स्वकीयांना किडनॅप सुद्धा चिनी सरकारने केले होते. ट्रम्प सरकारचे धोरण ह्या विषयावर पूर्णपणे चुकले. चिनी वंशाच्या लोकांना अमेरिकेत त्रास करण्याचा ट्रम्प ह्यांनी प्रयत्न केला. चिनी विद्यार्थ्यांना अमेरिकेत येण्यापासून मज्जाव किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच काही अमेरिकन नागरिक पण चिनी वंशाच्या लोकांना खोट्या देशद्रोहच्या आरोपांत गुंतवले. चिनी सरकार आणि चिनी लोक हे एकच नाहीत हे समजण्याची कुवत सध्या तरी अमेरिकन राजकारण्यांच्या दिसत नाही. उच्चशिक्षित आणि श्रीमंत लोकांना चीन सोडून कायमचे इतर देशांत जाण्यास मदत करणे हे चीन ला शह देण्याचे एक धोरण असू शकते. इंग्लंड ने हाँग कोन्ग च्या बाबतीत हेच धोरण राबवले आणि चीन ने त्याला प्रचंड कडाडून विरोध केला होता.

माझ्या वैयक्तिक मते, चीन स्वतःहून चुका करत आहे. अमेरिकेने विविध राष्ट्रांत आपल्या मिलिटरी बेस निर्माण केल्या, अमेरिकन प्रभाव विविध देशांवर आहे. हाच मॉडेल चीन किमान युरेशिया मध्ये राबवू पाहत आहे. दक्षिण चिनी आणि हिंद महासागरांत आपली नाविक शक्तीची मोनोपॉली करणे, NATO ला निष्प्रभावी बनविणे, आशियायी बेटांवर आपला अंकुश ठेवणे आणि युरेशियन खंड म्हणजे इराण पर्यंत आपली राजकीय शक्ती प्रस्थापित करणे हा चिनी सत्तेचा उद्देश किमान मला तरी वाटत आहे. अरुण शॉरी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्यांत त्यांना भारत म्हणजे एक छोटेसे "nuisance" वाटत आहे ज्याला वारंवार थपडा मारून त्याची औकात दाखवायची चीन ला सवय आहे. भारत त्यांच्या खिजगणतीत सुद्धा नाही. कदाचित गाल्वान मध्ये त्यांना जो मार खावा लागला त्यामुळे हे समीकरण आता बदलू शकते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel