श्रीसत्यनारायण -कथा-प्रारंभ
अध्याय पहिला
अथ कथा: । श्रीगणेशाय नम: ॥ एकदा नैमिषारण्ये ऋषय: शौनकादय: ॥ पप्रच्छुर्मुनय: सर्वे सूतं पौराणिकं खलु ॥१॥
ऋषय ऊचु: ॥ व्रतेन तपसा किं वा प्राप्यते वांछितं फलम्। तत्सर्वं श्रोतुमिच्छाम: कथयस्व महामुने ॥२॥
सूत उवाच ॥ नरादेनैव संपृष्टो भगवान्कमलापति: ॥ सुरर्षये यथैवाह तच्छृणुध्वं समाहिता: ॥३॥
एकदा नारदो योगी परानुग्रहकांक्षया ॥ पर्यटन्विविधान्लोकान्मर्त्यलोकमुपागत: ॥४॥
ततो दृषट्‌वा जनान्सर्वान्नानाक्लेशसमन्वितान्नानायोनिसमुत्पन्नान्क्लिश्यमानान्स्वकर्मभि: ॥५॥
केनोपायेन चैतेषां दु:खनाशो भवेद ध्रुवम्॥ इति संचिंत्य मनसा विष्णुलोकं गतस्तदा ॥६॥
तत्र नारायणं देवं शुक्लवर्णं चतुर्भुजम्॥शंखचक्रगदापद्मवनमालाविभूषितम्॥७॥

श्रीगजाननाय नम: आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणार्‍या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणार्‍या सूतांना प्रश्न विचारला ॥१॥ ऋषी विचारतात, "हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा." ॥२॥ सूत सांगतात, "मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. ॥३॥ एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्यलोकांत (भारतात) आले. ॥४॥ आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दु:खे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून ॥५॥ कोणत्या साधनाने त्यांची दु:के नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. ॥६॥ त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला." ॥७॥
दृष्ट्‌वा तं देवदेवेशं स्तोतुं समुपचक्रमे ॥ नारद उवाच ॥ नमो वाङमनसातीतरूपायानंतशक्तये ॥८॥
आदिमध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने ॥ सर्वेषामादिभूताय भक्तानामार्तिनाशिने ॥९॥
श्रुत्वा स्तोत्रं ततो विष्णुर्नारदं प्रत्यभाषत । श्रीभगवाननुवाच ॥
किमर्थमागतोऽसि त्वं किं ते मनसि वर्तते ॥ कथयस्व महाभाग तत्सर्व कथयामि ते ॥१०॥
नारद उवाच ॥ मर्त्यलोके जना: सर्वे नानाक्लेशसमन्विता: । ननायोनिसमुत्पन्ना: पच्यंते पापकर्मभि: ॥११॥
तत्कथं शमयेन्नाथ लघुपायेन तद्वद ॥ श्रोतुमिच्छामि तत्सर्वं कृपाऽस्ति यदि ते मयि ॥१२॥
श्री भगवानुवाच ॥ साधु पुष्टं त्वया वत्स लोकानुग्रहकांक्षया ॥ यत्कृत्वा मुच्यते मोहात्तच्छृणुष्व वदामि ते ॥१३॥
व्रतमास्ति महत्पुण्यं स्वर्गे मर्त्ये च दुलभम्॥ तव स्नेहान्मया वत्स प्रकाश: क्रियते‍धुना ॥१४॥

नारद म्हणाले, "ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दु:खे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो." ॥८॥ ॥९॥ नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान्विष्णु नारदाजवळ बोलले. भगवानम्हणाले, "मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मीत्याचे समर्पक उत्तर देईन." ॥१०॥ नारद म्हणाले, "हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दु:खे भॊगीत आहेत." ॥११॥ नारद म्हणाले, "हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दु:खी लोकांची सर्व दु:खे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऎकण्यची इच्छा आहे."॥१२॥ भगवान्म्हणतात, "हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दु:खे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. ॥१३॥ हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. ॥१४॥
सत्यनारायणस्यैवं व्रतं सम्यग्विधानत: ॥ कृत्वा सद्य: सुखं भुक्त्वा परत्र मोक्षमाप्नुयात्॥१५॥
तच्छुत्वा भगवद्वाक्यं नारदो मुनिरब्रवीत्॥ नारद उवाच ॥ किं फलं किं विधानं च कृतं केनैव तद्‌व्रतम्॥१६॥
तत्सर्वं विस्तराद्‌ब्रुहि कदा कार्यं हि तद्‌व्रतम्‌ ॥ श्रीभगवानुवाच ॥ दु:खशोकादिशमनं धनधान्यप्रवर्धनम्॥१७॥
सौभाग्यसंततिकरं सर्वत्र विजयप्रदम्‌ ॥ यस्मिन्कस्मिन्दिने मर्त्यो भक्तिश्रद्धासमन्वित: ॥१८॥
सत्यनारायणं देवं यजैश्चैव निशामुखे ॥ ब्राह्मणैर्बान्धवैश्चैव सहितो धर्मतत्पर: ॥१९॥
नैवेद्यं भक्तितो दद्यात्सपादम भक्ष्यमुत्तमम्॥ रंभाफलं घृतं क्षीरं गोधुमस्य च चूर्णकम्॥२०॥
अभावे शालिचूर्णं वा शर्करां च गुडं तथा ॥ सपादं सर्वभक्ष्याणि चैकीकृत्य निवेदयेत्॥२१॥

या व्रताला सत्यनारायणव्रत असे म्हणतात. हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो. ॥१५॥ भगवान्‌ विष्णूंचे भाषण ऎकून नारदमुनी विष्णूंना म्हणाले, "हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते, ॥१६॥ ते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा." हे नारदाचे भाषण ऎकून भगवान म्हणाले, "नारदा, हे व्रत दु:ख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. ॥१७॥ तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे, हे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर दोन तासांत) सत्यनारायणाचे पूजन करावे. ॥१८॥ ॥१९॥ केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद (सव्वा पावशेरे, सव्वा अच्छेर, सव्वा शेर इत्यादी प्रमाणे करून) भक्तियुक्त अंत:करणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. ॥२०॥ गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा या प्रमाणाने एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. ॥२१॥
विप्राय दक्षिणां दद्यात्कथां श्रुत्वा जनै: सह ॥ ततश्च बुंधुभि: सार्धं विप्रांश्च प्रतिभोजयेत्‌ ॥२२॥
सपादं भक्षयेद्बक्त्या नृत्यगीतादिकं चरेत्॥ ततश्च स्वगृहं गच्छेत्सत्यनारायणं स्मरन्॥२३॥
एवं कृते मनुष्याणां वांछासिद्धिर्भवेद्‌ध्रुवम्॥ विशेषत: कलियुगे लघूपायोऽस्ति भूतले ॥२४॥
इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायणकथायां प्रथमोऽध्याय: ॥१॥

आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऎकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बांधव सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे. हे पूजानादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरि देवघरात पवित्र ठिकाणि करावे. ॥२३॥ पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दु:खनाशाचा हाच एक सोप उपाय आहे." ॥२४॥ सत्यनारायणकथेतीय प्रथम अध्याय या ठिकाणी पुरा झाला. ॥१॥ हरये नम: ।
॥प्रथमोध्याय: समाप्त: ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel