बाळंतपण ही नैसर्गिक क्रिया असली तरी काही बाळंतपणात आई व जन्मणारे मूल यांना त्रास होऊ शकतो व दर हजार प्रसूतीमागे ३-४ माता मृत्युमुखी पडतात व अनेक आजारी होतात. अवघड बाळंतपणात बाळालाही इजा होण्याची शक्यता असते. म्हणूनच आई व बाळासाठी बाळंतपण निर्धोक करणे हे महत्त्वाचे आहे. बाळंतपण व्यवस्थित पार पडेल याची काळजी गरोदरपणापासूनच घ्यावी लागते.

बाळंतपण कसे होते याची माहिती घेऊ या.

साधारणपणे दिवस पूर्ण भरले की बाळंतपण होते. बाळंतपण सुरु झाल्याचे खालील चिन्हांवरून ओळखता येते.
१. पोटात नियमित कळा येणे :- या कळा बरगड्यांच्या खाली पाठीवरून चालू होतात व ओटीपोटाकडे येतात. ठरावीक वेळाने त्या येतात व ओटीपोटात संपतात. पोटातल्या इतर दुखण्यांपासून त्यावेगळ्या आहेत हे कळते. शंका असेल तर एनिमा देतात. बाळंतपणाच्या खऱ्या एनिमानंतरही चालूच राहतात.
२. अंगावरून पांढरा द्राव (चिकटा) जाणे :- बाळंतपणाच्या सुरुवातीस गर्भाशयाच्या तोंडावरचा चिकट पांढरा भाग (चिकटा) सुटून बाहेर येतो आणि कधीकधी त्यात किंचित रक्ताचा अंश असतो. ही बाळंतपण सुरु झाल्याची महत्त्वाची खुण आहे.
३. गर्भाशयाचे तोंड उघडणे :- आतून तपासणी केली असता गर्भाशयाचे तोंड उघडले आहे किंवा बंद हे कळते. पहिलटकरणीत हे तोंड फक्त बाळंतपणाच्या वेळी उघडते. मात्र पुढच्या खेपेच्या मातांच्या बाबतीत हाताचे एक बोट जाईल इतका सैलपणा नेहमीच असतो. बाळंतपण चालू असेल तर गर्भपिशवीचे तोंड उघडायला लागते

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel