फ्लॅशबॅक

आतल्या बाजूस. आॅफीस. प्रसंगाची वेळ 12pm ( दुपारचे.)

( बाहेरून एखाद्या बॅंकेचा नजारा दाखवून अशोक त्या बॅंकेत एन्ट्री करतो.)
( आता अशोक एका बॅक मॅनेजर समोर एका कॅबीन/आॅफीस मधे बसला आहे.)

मॅनेजर बरं अशोकरावं, आता टोकणरावं तुम्ही नाही का? काय घेणार? चहा, काॅफी काही.

अशोक नाही काही नको साहेब.

मॅनेजर तसं मी विचारत नाही कोणाला, पण तुझी ओळख आहे तू चांगला आहेस त्यामुळे तुला विचारलं... नाहीतर ही जालीम दुनिया काय सांगायचं आता...

अशोक हो नं...

मॅनेजर बरं काय, बोल काय काम काढलसं?

अशोक चार, पाच बॅंकात जाऊन आलो लोनचं काम होत नाहीये, म्हटलं बघावं इथ एकदा ट्राय करून त्यात तुमच्या ओळखीनं काही झालं तर.

मॅनेजर माझ्या ओळखीचं काय घेऊन बसलास, इथं माझेच कामगार मला ओळख दाखवत नाही. ( स्वत:च हसतो.)
बरं असू दे, आन् तुझी कागदपत्र दाखवं इकडे.

अशोक हो.
( असं म्हणतं काही कागदपत्र त्यांना दाखवतो.)

मॅनेजर ( कागदपत्र पाहत.) जरा कमीच आहे.

अशोक पगार ना, पण नका काळजी करू, मी करेन सगळं अॅडजस्ट.

मॅनेजर ते खरयं, पण कागदपत्र कमी आहेत; एवढ्यावर लोन देणं जमणार नाही.

अशोक पण बघा ना एकदा, काहीतरी मार्ग असेल.

मॅनेजर मार्ग तो बाहेरचा रस्ता, नाही मी इन्सल्ट नाही करतयं पण मुलाचं शिक्षणाचा खर्च, त्यात तू एकटा कमावता, पगारही कमी, जमणार नाही.

अशोक ठीक आहे, हरकत नाही. निघतो मी.

मॅनेजर हो, ये तू.

( अशोक त्या कॅबीन/आॅफीस मधून बाहेर पडतो आणि रस्त्याने चालायला लागतो. थोडं पुढे चालून एका ठिकाणी चहा पितो.)

            प्रसंग समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel