सुसंगति सदा घडो सृजन वाक्य कानी पडो
कट्टी -बट्टी असा खेळ बालपणातील मैत्रीत बघायला मिळतो
म्हणतात बालपणीची मैत्री चिरकाल टिकते ..म्हणून ती सुसंगत असावी ...जसा
पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर पडला तर संपून जातो कमळाच्या पानावर मोत्यासारखा चमकतो तर   शिंपल्यात तो स्वःत मोती बनतो .पाण्याचा थेंब तोच फक्त संगत .महत्त्वाची आपल्या वृत्ती भाषण कृती यावर आहाराप्रमाणेच संगतीचा ही परिणाम होत असतो संगत महत्त्वाची ..

चांगल्या व्यक्ती च्या सहवासाने जीवनाला योग्य दिशा मिळत जाते उत्तमतेचा ध्यास आयुष्य सुंदर बनवते ...आपल्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्ती आपल्या बोलण्यावर वागण्यावर प्रभाव टाकत असतात..

जिंकण्याचे ध्येय सकारात्मक विचारांची संगत मिळणं खूप आवश्यक असतं यातूनच आपलं फुलणं अवलंबून असतं
प्रत्येक टप्प्यावर मिळत जाणारी संगत तुम्हाला घडवत असते.

कारण अशा माणसांची संगत आयुष्यभरासाठी लाभणार असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच..!!
 
कारण अशा माणसांच्या ह्या स्वभाव गुणांमुळे आपणही आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला शिकतो..

त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते..
त्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर राहतो.

उत्तम संगत तुमची जिद्द आणि इच्छाशक्ती वाढवण्यास मदत करतात यश मिळणे न मिळणे हे शेवटी आपल्या प्रयत्नावरच असले तरी अशा सकारात्मक व्यक्ती च्या सहवासाने काही प्रेरणा मिळत राहते आजकाल असे आदर्श मिळणे ही कठीणच ..बदलते जीवनप्रवाह मूल्यविरहित विचारसरणी चा अभाव ...सगळं सहृज उपलब्ध यामुळे नवलाईची जादू ही काय असते हे समजणे अवघड मग एका सारखा दुसरा हवाच मला का नाही असे म्हणत आपण अनुकरण करत जातो ..म्हणून जिद्द टिकवून ठेवणं आवश्यक ठरत.

चांगल्या संगतीमुळे आपली आत्मिक शक्ती वाढत जाते.
 सकारात्मक आणि आयुष्यात काही मिळवायचेच अशी जिद्द असलेली  सतत कार्यरत असलेली संगत आपल्या ला ही आपण काहीतरी करायला हवं असे वाटण्यास भाग पाडतात.. त्यांची ही ऊर्जा सकारात्मक स्पंदनाद्वारे आपल्या ला ही समृद्ध करतात.
त्यांच्या बरोबर राहिल्याने सतत त्यांच्याशी संवाद साधल्याने आपणही स्वतःला उभारी देत राहतो.अशी संगती आपली असेल तर ...शिवाय ते आपल्या
कृतीतून यशाचे धडे देतात...

आपण सर्वसाधारण मित्रांच्या संगतीत असलो तर आपलेही आयुष्य सर्वसाधारणच असते.. त्यांच्या संगतीत राहणे हा गुन्हा नाही.
पण काही जणांना आयुष्याच्या स्पर्धेतून काहीही कमवायचे नसते..
त्यांची कोणतीही स्वप्ने नसतात.. आला दिवस ढकलण्यापालिकडे ते काहीही करत नाही..

काही मिळालेल्या आयुष्यातून खचून जातात आणि नेहमीच रडगाणी गातात…
काही मित्र त्यांच्या आयुष्यात स्वतः धडाडीने काहीही करायला धजत नाहीत आणि आपल्याला मागे खेचणारेही असतात..
अशांची संगती नकारात्मक विघातक प्रवृत्ती कडे वळवू शकते परिणाम ....
तर काही व्यक्तींची संगत
आपल्याला सतत कार्यरत राहण्यास प्रवृत्त करते
उलट
आळशी माणसे तुम्हालाही आळशीच बनवतात.. त्यांच्या कडे अशाच नकारात्मक लहरी असतात . अशा संगतीत
 अडकलो तर पुढचे भविष्य धुसरच...
 
तर उलट उत्तम संगत ही सतत जिंकणारी माणसे तुम्हाला विना कारण वेळ घालवताना दिसणारच नाहीत..
त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो अशी सकारात्मक स्पंदने आपल्या लाही काहीतरी करायलाच हवे हा आशावाद निर्माण करतात.सतत दुसऱ्याचे अनुकरण करणं हा मनुष्य स्वभाव मग अशा संगतीने आपली इच्छाशक्ती स्वपने पूर्णत्वास येण्यास वेळ लागणार नाही.आपल्या वाईट सवयी ही चांगल्या संगतीने सुटतात.

जे अभ्यासपूर्ण गप्पा मारतात, भरपूर वाचन करतात, सतत नवीन काही शिकण्याच्या मागे असतात, जे अपयशामधूनही यश मिळवतात अशांच्या संगतीत राहणे हे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे निश्चितच ठरुच शकते.अगदी शंभर टक्के नाही तरी पंचवीस टक्के तरी आपल्या ला सहवासाने अशा संगृतीची ओढ वाटूच शकेल.ती म्हण आहे. न ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या....पूर्ण करालच...तसेच संगतीचे असते.

जे जग आपण मुलांना दाखवणार तसेच ते बघणार पालकांचे योगदान ही यात पहिले म्हणावे लागेलच ..

जे स्वतःबरोबर इतरांना ही उंचीवर घेवून जातात अशीच संगत मिळावी असा ध्यास हवाच. शेवटी योग्य संगत मिळणं हा ....आपण प्रयत्न करत राहायचं ..

कारण आयुष्य म्हणजे केवळ मजा नव्हे नुसतं जगायचं मग निरोप घ्यायचा योग्य संगतीमुळे मी आयुष्याकडून काय कमावलं हेही सुसंगतिमुळे शिकता येईल.
आयुष्याचा पुरेपूर फायदा करून कसा घ्यायचा . एकाच ध्येयातून खूप काही मिळवता येते ही  उमेद अशी संगत सतत देत राहते.
मग जग किती सुंदर आहे हे आपल्या ला कळेल.
शेवटी नशीब अशांचीच मदत करते हे ही ओघानेच येते.

आपणही शा संगतीने  निश्चयी स्वभावामुळे आयुष्याकडून काय आणि कसे शिकत जातो.

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर संगत महत्वाचीच ठरते त्या त्या वेळची ती गरज म्हणूयात ..आनुभवाने समृद्ध होत जाताना पुढच्यास ठेच मागचा शहाणा ...हेच गृहीतक आजही लागू..!!
अशी सुसंगति
बालवयात निखळता देणारी तरुणपणात ती सकारात्मकता  मध्यमवयात प्रग्लभता देणारी तर वार्धक्यात आत्मचिंतन करत कृतार्थतेची अनुभुति देणारी तर आपणही  कुणाचे तरी आदर्श ठरावी  अशी वाटेल ...!!

शेवटी प्रथम माझी माझ्याशी असलेली संगतच  यासगळया विचारांना फलदायी करेल !! मग संगत आणि सोबत यात फरक आहे कि...??

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel