आपला एक मित्र आपल्या बरोबर एक अनुभव share करतोय .


"ही घटना नांदेड मध्ये २ वर्षा पूर्वी मी १२ वीत असताना घडली.

exam च्या २ महिने आधी मी आणि माझे ३ मित्र माझ्या घरी बसून अभ्यास करत होतो. एके दिवशी रात्री ३ वाजता मला cigarette ओढावीशी वाटली म्हणून मी आणि माझे मित्र निघालो. घर जवळ एक दुकान आहे ते २४ तास चालू असत.म्हणून मी त्या दुकानात गेलो आणि १० मिनटात cigarette ओढून निघालो.
रस्त्याला एक hall आहे. फार जुना आहे. त्या hall जवळून आम्ही चौघे जण मस्ती करून येत होतो.

मला वाटल कि कोणीतरी स्त्री मागून चालून येत आहे. मी वळून मागे बघितल तर मला एक बंजारा समाजाची स्त्री दिसली. मी तिला बघितल आणि पुढे चालत निघालो.
त्या बाई ने मला Time विचारला.
मी तिला सांगितल "३:१५."

मी मित्रांबरोबर चालतच होतो . थोड आणखी पुढे गेल्यावर तिने परत विचारल "Time काय ?"

अस तिने मला ३-४ वेळा विचारल. मी तिला पालटून रागवणार होतो. आणि पलटलो तर मागे कोणीच नव्हत .

परत थोडा पुढे गेलो तेव्हा परत तसाच आवाज आला. " Time काय झाला ? ".
मी आणि माझ्या मित्रांनी पलटून बघितल तर १ बंजारा समाजाची बाई त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत होती . मुख्य म्हणजे या वेळी तिचे डोके उलटे होते. पूर्णपणे पाठीमागे तोंड फिरले होते . आम्ही तिच्या कडे बघितल आणि घाबरून धूम ठोकून पळालो ; ते सरळ घरी देवघरात जाउन बसलो .

सकाळी उठून आजू बाजूच्या जुन्या लोकांना विचारल तर त्यांनी सांगितल, "की त्या hall मध्ये बंजारा समाजाच्या मुलीच लग्न होत. तिच लग्न मोडल म्हणून तिने तिथे आत्महत्या केली होती ."

त्या दिवसापासून मी cigarette सोडून दिली . आणि आम्ही त्या रस्त्यानी नंतर कधी गेलोच नाही . आणि नंतर पण कधी जाणार नाही."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel