दीपका ! मांडिले तुला, सोनियाचे ताट जडविला घडविला चंदनाचा पाट घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ दारी आलेल्यांची करू सोपी पायवाट घातली ताईने तुला रंगांची रांगोळीपित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळीघाशिली समई मीही केली तेलवात दह्यात कालविला हा जिरेसाळ भातगा रे राघू, गा ग मैने बाळाच्या या ओळीमुखी तुमच्याही घालू दुधातली पोळीकुतु काऊ चिऊ माऊ या रे सारे या रेसांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रेगुणी माझा बाळ कसा मटामटा जेवीआयुष्याते थोर करी माये ! कुलदेवी !
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel