जी. आय. पी. रेल्वेने मुंबईहून पुण्याला जाते वेळी खंडाळ्याचा सर्व धाट बढून गेल्यावर, सर्व सृष्टिसौंदर्य अवलोकन केल्यावर, परमेश्व राच्या सर्व अगाध लीलांचे प्रत्यंतर पाहून त्याचे कौतुक केल्यानंतर, कर्जत, खंडाळे, इत्यादि स्टेशनें जाऊन लोणावळे हे स्टेशन लागते. येथे घाटाच्या चढावाचा शेवट होतो. घाटांत असलेल्या सृष्टिसौंदर्याचा येथेच शेवट होतो. घाटांतील रमणीय स्थले, व वनश्रीची शोभा यापुढे पाहावयास मिळत नाही व येथेच गाडीच्या इंजिनद्वयांपैकी एक आपल्या जोडीदारास सोडून निघून जाते. अशा या रमणीय ठिकाणी, वाचक हो, आपणास आतां जावयाचे आहे. लोणावळे हे ऐकून तुम्हाला माहित आहेच. तिकडे जर न गेले तर तुम्हाआम्हांस तिकडे होणारी मजा पाहावयास सांपडणार नाही. काय म्हणतां ? तमच्याजवळ पैसे नाहीत? इतकेच ना ? त्याची काळजी तुम्हांला नको. आम्ही तुमच्या साठी एक 'स्पेशल' तयार ठेविली आहे. मग तर तुमची हरकत नाहीं ना ? हं, बसा तर आतां गाडींत. आमची गाडी झटकन् तुम्हांला आपल्या इच्छित स्थळी घेऊन जाईल. मिटा आता डोळे. भर्ररर ! हं उघडा डोळे. हे पाहा लोणावळे आले. उतरा खाली. कशी आहे आमची गाडी ! काय म्हणतां ? घाटांतली शोभा तुम्हांला पाहावयास मिळाली नाही ? ती पुन्हा मुंबईस जाते वेळी पाहूं. चला आतां बाहेर जाऊ या. गांवांत त्या घाणीत जाण्याचे आपणांस कांहीं एक कर्तव्य नाही. आपणास गांवाच्या बाहेरच जावयाचे आहे व तेथें तुम्हांला चांगली वनश्री पाहावयास मिळेल. टांग्याची गरज नाही. पायींच जाऊं. चला तर. __हेस्टिंग्स लेन' हा लोणावळे या शहराबाहेर एक रस्ता असन तोच रस्ता पुढे खंडाळ्यास जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस छोटे टुमदार बंगले असून, आजूबाजूचे सृष्टिसौंदर्य फारच रमणीय आहे. खंडाळ्याचा दूरपर्यंत दिसणारा घाट, त्याच्या अलीकडे दिसणारी, परंतु मनास भयद अशी खोल दरी, व या सर्व दरीतून पसरलेले लहानमोठे वृक्ष व रान, पलीकडे दिसणारा उंचच उंच असा 'ड्युक्स नोज' (Duke's Nose) या नांवचा डोंगराचा कडा, त्याखाली दिसणारे खोपोली खेडे व त्यालगतची हिरवींचार शेते व त्यांतच मधून मधून डोकावणाऱ्या गरीब परंतु अत्यंत सुखी अशा शेतकऱ्यांच्या झोपड्या; तसेच एका बाजूस दिसणारे पठार व त्यांतून असलेले व चाऱ्यांनी आच्छादिलेले असे उंचवटे, वगैरे देखावा पाहून दुःखित मनाला सुद्धा किंचित् काल विसावा मिळाल्याखेरीज राहावयाचा नाही, अशा त-हेची रमणीयता त्या जागी आहे. 

अशा ह्या 'हेस्टिंग्स लेन ' रस्त्यावरील एका छोट्या परंतु टुमदार अशा एका बंगल्यासमोरील फाटकाजवळ एके दिवशी सकाळी इन्स्पे क्टर सर्जेराव येऊन उभे राहिले. ते या वेळी आपल्या नेहमीच्या पोलिशी वेशांत नसून, घरच्या साध्या पोषाखांतच होते. त्यांची मद्रा किंचित गंभीर व विचारी अशी दिसत होती. फाटकाजवळ येताक्षणींच त्यांनी त्या बंगल्यावर व त्यासभोवताली असलेल्या छानदार बागेवर एकदा नजर फेकली. बंगला लहानच असन आजकालच्या पद्धती. प्रमाणे सीमेंटचा बांधलेला होता. त्याकडे पाहतांच हा आंतून सर्व प्रकारच्या सुखसोयींनी परिपूर्ण व सुव्यवस्थित असावा असें सहज अन. मान करता येई व त्यावरून त्या बंगल्यात राहणारा इसमही चैनीचा व आरामाचा भोक्ता असावा असे वाटत असे. सभोवतालचा बगीचाही चांगल्या त-हेनें रचलेला असून त्यांतली फुलझाडें व्यवस्थित लावलेली होती. या वेळी ती चांगली फुलून आलेली होती. बागेसभोंवतीं लांकडी फळ्यांचे छानदार कुंपण असून त्याला निळसर रंग दिलेला होता. त्या फळ्यांतच मध्येच एक लहानसें फाटक तयार केलेले होते. फाटकाजवळच्या एका खांबाला एक लहानच लांकडी फळी ठोकलेली असन त्यावर 'शांतिगृह' अशी अक्षरें रंगविलेली होती. बंगल्याच्या दरवाजावर तसेंच खिडक्यांवर पडदे सोडलेले होते. बंगल्याचा मुख्य दरवाजा लांकडी असन त्याला लागन बाहेरच्या बाजूला एक कांचेचा दरवाजा लावलेला होता. 

 

त्या दरवाजाच्या पितळी कड्याही (handles) अद्यापपर्यंत चकचकीत दिसत होत्या. 

त्या वेळी थंडगार वारा वाहत असून सर्जेराव त्या वाऱ्याचा मजेत आस्वाद घेत फाटकासमोर उभे राहिले होते. सूर्यनारायण क्षितीजा. वर थोडासा आलेला होता. सर्जेराव त्या जागी उभे राहून त्याच ठिकाणी, त्यांनी बोलाविलेल्या एका मनुष्याची वाट पाहत होते. त्या वेळी सात वाजून पांच मिनिटे झाली असून सर्जेरावांनी त्या माण साला नेमून दिलेली भेटण्याची वेळ टळून गेली होती. थोड्या वेळाने सर्जेराव किती वाजले हे पाहण्याकरता आपले घडयाळ काढून पाहा तात तोच तो मनुष्य तेथे येऊन थडकला. 'तो मनुष्य वृद्ध असन त्याच्या शरीरावर पडलेल्या सुरकुत्या त्याचे वयोमान दर्शवीत होत्या. त्याने अशा त-हेचा गचाळ पोषाख केला होता की, तो पाहतांच त्याला पोटभर खावयास मिळत नसावे अशीच एखाद्याची समजूत झाली असती. तो खोकत खोंकत मधून मधून खांकरत व आपल्या हातांतील जाड दंडुका जमिनीवर आपटीत आपटीत सर्जेरावाजवळ आला. सर्जे रावांजळ येतांच तो त्यांना प्रथम निरखून पाहूं लागला. आपणास भेटणारा हाच माणस असावा असें सर्जेरावांस वाटल्यामुळे त्यांनी त्याला प्रश्न केला, “आपलंच नांव श्रीकोटे का ?" । 

___" कदाचित असेलही.” सावधगिरी राखण्याच्या हेतूने त्या वृद्धानें उत्तर दिले, " पण मी ज्यांना एका स्थळी भेटायला बोलावलं होतं ते इन्स्पेक्टर सर्जेराव तुम्हीच का ?" । __ “होय,मीच तो. आपण, मिसेस किनखापे व सफेत दिवाणखाना या. संबंधानं लहिलेल्या पत्रावरून मी इथं आपणाला भेटायला आलो आहे." 

"मी तुम्हाला शोधाचा पाया दाखवून दिला तर तुम्ही मला काय बक्षिस द्याल ?" त्या वृद्ध गृहस्थाने कावेबाजपणाने विचारले. 

" तें कांहीं मला सांगता येत नाही. ज्यांच्या घरी त्या बाईचा खन झाला त्यांनी मला, मी जर खुनी इसमाला शोधून काढलं, तर आपण काही तरी बक्षिस देऊ असं कबूल केलं आहे; व माझी खात्री 

आहे की, तो गृहस्थ कमीत कमी दोन हजार रुपये तरी मला देईल.' ___ " मग प्राप्तीचा अर्धा बांटा मला मिळाला पाहिजे.” तो वृद्ध खोंकत खोंकत म्हणाला, “ नाही तर मी काही तुम्हांला आंत सोड. णार नाही." __ " तें तर तुमच्या हातून होणं शक्यच नाही.” सर्जेराव दटाव णीच्या स्वराने म्हणाले, “तुमच्या पत्राच्या जोरावर मी ह्या घराचा झाडा घेण्याबद्दल वारंट मिळवून आणलं असल्यामुळं मला कायद्यानं ह्या घरांत शिरतां येईल, समजला ? तुम्हांला जर बक्षिस पाहिजे होतं तर पत्र लिहिण्यापूर्वीच तसा वायदा करायचा होता." 

तो वृद्ध मनुष्य आपली काठी जमिनीवर जोराने आपटन म्हणाला, " पण माझ्या भाडयाचं काय ? " ___ " त्याबद्दल मी काही जबाबदार नाही. ती बाई तुझं देणं लागत होती का?" 

" नाहीं; तिनं आजपर्यंतचं सर्व भाडं चुकतं केलं आहे. पण वर्तमान पत्रांत प्रसिद्ध झाल्याप्रमाणं जर तिचा खून झाला असेल, तर मला ह्या घराला आतां कांहीं भाडोत्री मिळायचा नाही." ___ " पण मयत स्त्रीचं नांव किनखापे होतं याची आपल्याला अद्याप 

खात्री नाही." 

“ पण ज्या दिवशी त्या बाईचा खून झाला त्याच दिवसापासून ही बाई नाहींशी झालेली आहे.” त्या वृद्धाने उत्तर दिले, " व तिचं हे घर तुमच्यापुढं आहे." 

" व तेच मला आतां पाहायचं आहे. या घरांत रत्नमहालांतल्या प्रमाणंच सफेत दिवाणखाना आहे. खरोखर तसत्याच दिवाणखान्यांत पण दुसरीकडे तिचा खून न्हावा हे किती चमत्कारिक आहे ! हा काय घोटाळा असावा देव जाणे!" ___“जर मला तुम्ही काही तरी द्याल तर मी तुम्हाला ह्या बाबतीत माझ्या हातन होईल तितकी मदत करीन. मी किती गरीब आहे तें पाहा ! हे माझे कपडे पाहा; तसंच मला जेवायलासुद्धा पोटभर मिळत नाही. नुसत्या भाकरीवर मी कसे तरी दिवस काढीत आहे." __“ नाही. तें कांहीं मी सांगत नाही.” तो मनुष्य अत्यंत कद्रू असावा असे वाटून सर्जेराव म्हणाले, “ मला आतां घर दाखव." __" नशीब आमचं, " तो वृद्ध गृहस्थ निराशेचे चिन्ह दाखवून, फाटकाकडे वळन म्हणाला. 

परंतु तितक्यांत त्याची नजर त्याच वेळी तिकडे येणाऱ्या एका मुला कडे जाऊन त्याच्यावर काठी उगारून तो म्हणाला, "काय व्रात्य मुलगा आहे हा ! किती घाणेरडं बोलत आहे ते पाहा. तुम्ही त्याला असल्या अपमानकारक शब्दांबद्दल पकडून कां नेत नाही ?" ___“अहो साहेब," तो मुलगा सर्जेरावांकडे वळून म्हणाला, " हा म्हातारा अतिशय चिक्कू आहे. खूब चिक्कट आहे. नुसता मारवाडी आहे ! कायरे ए मारवाड्या ! साहेब, त्याचे कपडे तर पाहा. मी जर आतां तुम्हाला काही खायला घेऊन आलो तर हा तुम्हाला धड खाऊंसद्धा देणार नाही." 

" ह्या काठीनं थोबाड रंगवीन चांगलं !" तो वृद्ध रागाने उसळून म्हणाला, “ पाजी कुठचा !" __" जाऊं द्या हो.” सर्जेराव त्याला दूर सारून म्हणाले, " त्या पोराच्या नादी काय लागतां ? सांगून सवरून मुलं ती. चल, जा रे पोय, निघून जा इथन !" 

पण तो मुलगा कांहीं जाईना. त्याने सर्जेरावांच्या हातांत एक पाव देऊन म्हटले, “ हा ह्या घरांतल्या बाईला द्या, साहेब. पण सांभाळा हो! तो एकदम हिसकून घेईल. मी सांगतों तें अक्षरशः खरं आहे." 

" पशु कुठचा !” तो वृद्ध गृहस्थ बागेत शिरतां शिरतां म्हणाला. 

सर्जेरावांनी मागे राहून आपल्या खिशांतून एक रुपया काढून म्हटले, "बाळ, इकडे पाहा. तूं या घरांतील बाईला रोज पाव आणून देतोस का?" __ “ नाही.” तो मुलगा रुपया पाहून पुढे येऊन म्हणाला, “ एक दिवस आड आणतों." 

“मग हल्ली जो पाव तूं आणतोस तो नेहमी घेतला जातो काय ?" 

" नाही. आज एक आठवडा होऊन गेला. कदाचित् पंधरावडा सुद्धा असेल. मी नेहमीप्रमाणं पाव आणन स्वयंपाकखोलीमधल्या ठरलेल्या फडताळांत ठेवून देतो. पण कित्येक दिवसांचे पाव तसेच फडताळांत पडले आहेत. मला वाटतं, ते पाव खाण्यास ती बाई घरांतच नसावी.” 

" तूं तिला शेवटी केव्हां पाहिलंस ?" 

" पंधरा दिवस होऊन गेले असावे. " तो मुलगा बोटे मोजीत म्हणाला, " नक्की तारीख कांही मला सांगता येणार नाही; पण तो गुरुवारचा दिवस होता. तिनं नेहमीप्रमाणं पाव खाल्ला. नंतर शनिवारी तिला ताजा पाव मिळावा म्हणून मी तो थोडा उशिरानंच घेऊन आलों; परंतु ती घरीच नव्हती व त्या दिवसापासून ती घरी नसावी असं दिसतं. कारण मी काहीं त्यानंतर तिला पाहिली नाही; पण साहेब, ती कुठं आहे हे तुम्हाला माहित आहे का हो ? असलं तर तिचा पत्ता सांगा. कारण आमचा शेट तिच्याकडून सर्व पावाचे पैसे घेणार म्हणतो. कारण तिनं काही पाव बंद करायला आम्हाला सांगितलेलं नसून ती पाव खात नाही हा काही आमचा अपराध नव्हे." 

" पण आपल्यामागं तिनं नोकर कां ठेवू नये ?" 

" कारण तसं करायला ती अगदीच गरीब होती म्हणून. घरांतील सर्व काम ती स्वतःच करीत असे. पण साहेब, काही असो, ती बाई फारच चांगली होती हो! पण तिचं काही बरंवाईट तर झालं नाही ना?" 

" नाही. मी फक्त तिला भेटायला आलो होतो.” 

“पण ती घरी नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. कारण ती असल्याचं कोणतंच चिन्ह दिसत नाही. मला वाटतं, त्या बुट्टेबुवांनीच तिला पळवून नेलं असावं. कारण मी त्याला तिच्याकडे एकदोनदा डोळे मिचकावतांना पाहिलं होतं.” । 

" इतकी ती सुंदर आहे का ?" 

" होय, ती सुंदर व नाजुकही आहे. तिचे केस काळेभोर असून खूप लांब आहेत. ती वर्णानं गोरी व एकंदरीत दिसण्यांत सुंदर स्त्री प्रमाणं दिसत असे. तिचा नवरा कोणी व्यापारी असून तो मधूनमधून इकडे येत असतो. पण तो बहुतकरून बाहेरगांवींच असतो." 

" तूं त्याला कधी पाहिला होतास काय?" 

" एकदा काळोखांत त्याला मी पाहिलं होतं. तो दिसण्यांत उंच आहे. पण तो कसा काय दिसतो हे काही मला सांगतां यायचं नाही." __ “तूं फार हुषार मुलगा दिसतोस." आपल्या खिशांतून डायरी काढून व त्याला तो रुपाया देऊन सर्जेराव म्हणाले, “ मला आणखी काही माहिती तुझ्याकडून पाहिजे आहे.” । __ " माझं नांव कृष्णा असून मी त्या ‘गडाप्पा बेकरी'त नोकरीला असतो." आपल्या झालेल्या स्तुतीने खूष होऊन तो मुलगा म्हणाला. 

"होय, तें दुकान मला माहित आहे." सर्जेराव ती हकीकत आपल्या डायरीत लिहून घेत म्हणाले, “ मी एकदा इथं राहायला आलो होतो, तेव्हां त्याच दुकानांतून पाव घेत असें." 

“ आमचा शेट इतका कांही पैशाचा हपापलेला नाही. ही बाई त्याचे पैसे वेळच्या वेळी चुकते करते. इतकी ती सज्जन आहे." 

त्याचे आणखी काही वेळ असेंच संभाषण चाललें असते, परंतु तितक्यांत आंत गेलेला तो वृद्ध गृहस्थ ओरडत बाहेर आला. " अहो, पोलिस रावसाहेब," त्यांनी रागारागाने सर्जेरावांस हाक मारली, "तम्ही 

या कारटयाबरोबर बोलण्यासाठी इथं आला आहां काय ?" 

त्याच्या तोंडचे पोलिस रावसाहेब' हे शब्द ऐकतांच कृष्णा दच कला व दोन पावले मागे सरून म्हणाला, “आपण पोलिसखात्यांतले आहां काय ? साहेब, या बाईला काही अपघात तर झाला नाहीं ना ?" ... " नाही.' अशा रीतीने आपण कोण हे उघडकीस आलेले पाहून त्रासून सर्जेराव म्हणाले, “ पण आपलं आतां झालेलं संभाषण जर कोणाला कळवणार नाहीस तर मी तुला पुढं पुष्कळ बक्षिस देईन.” __" त्याबद्दल साहेब, मुळीच काळजी करू नका. ह्या अशा गोष्टी गुप्त राखण्याबद्दल आमचा शेट नेहमी माझी स्तुति करीत असतो.'' असें म्हणून तो पुढे येऊ लागला; परंतु सर्जेरावांनी त्याला ताबडतोब तेथून निघून जाण्यास सांगितले. व तोही त्या वृद्ध मनुष्याला वेडावीत पळत पळत तेथून निघून गेला. तो निघून गेल्यावर सर्जेराव आंत शिरला. 

" जर मिस्टर किनखापे या वेळी इथं आले तर मी त्यांना हे वारंट दाखवून मला ह्या घरांत शिरण्याचा काय हक्क आहे ते सांगेन." ते वारंट दाखवून सर्जेराव म्हणाले. 

“किनखापे ! कोणाला ? त्या बाईला वाटतं ?" " अंह; तिच्या नवऱ्याला." 

" मी तर त्याला कधीच पाहिलेला नाही.” तो वृद्ध स्वतःशीच परंतु साधारण मोठ्याने व सर्जेरावाला ऐकू येईल अशा त-हेने म्हणाला, “ एकदा त्या स्त्रीनं मात्र आपलं लग्न झालेलं आहे असं सांगितलं होतं. पण घराचं भाडं तीच देत असे व घरांतही एकटीच राहून सर्व कामकाज ती जातीनं पाहात असे. मी त्याला काही अजून पाहिलेलं नाही." 

"तो व्यापारी असून फिरतीवर असतो असं त्या मुलानं सांगितलं." 

" तो पोरगा पक्का बदमाष आहे.” त्या वृद्धाने उत्तर केलें, " एखाद्या नुसत्या व्यापारी माणसाबरोबर लग्न करणारी ती स्त्री नव्हती. माझ्याजवळ ती आपल्या नवऱ्याविषयी कधी कधी बोलत असे, पण तो कोणता उद्योगधंदा करतो हे तिनं मला कधीच सांगि. 

तलं नाही." 

" हे घर तिच्याच नांवावर आहे का ?" " होय, व मला वाटतं तिचं लग्नही झालं नसावं." “ घर भाडयानं घेते वेळी तिनं कुणाची ओळख दाखवली ?" 

“ एका मास्तराची ओळख दाखवून तिनं एकदम सहा महिन्यांचं भाडं आगाऊ दिलं होतं.'' 

" मास्तर ! काय त्याचं नांव ?" " दांडेकर मास्तर.” " कोणत्या विषयाचे मास्तर आहेत ते ?" 

" साहेब," तो वृद्ध म्हणाला, " हे मला कसं बरं कळणार ? कोणाही माणसाला आपली ओळख कोणालाही-विशेषतः परक्या इसमाला मास्तर या नात्यानं करून देता येते." 

मास्तराचें नांव ऐकतांच व तो विचार मनात येतांच सर्जेरावांना मागच्या एका प्रसंगाची आठवण झाली.नलिनीची चौकशी करीत असतां तिनें शस्त्रापासून सुरवात करण्यास सांगितले होते ते त्यांना आठ वले. शस्त्र इकडचे नसून बाहेरचे असावे असें नलिनी म्हणाली होती. तेव्हां त्यांनी ताबडतोब त्या वृद्ध माणसाला विचारले, 

" हे मास्तर ह्याच इलाख्यांतले आहेत का?" 

" बहुतकरून तो इकडचा नसावा, असं मला वाटतं.” त्या वृद्ध गृहस्थाने उत्तर दिले. 

" त्याला तुम्ही कधी पाहिलं होतं का ? '' सर्जेरावांनी पुन्हा विचार करून विचारले. 

___“ नाही. अशा माणसांच्या नसत्या चौकशा करायला मला वेळ कुठं आहे ? मला त्या बाईनं त्याचा पत्ता दिला होता, त्या पत्त्यावर एकदा मी त्याला पत्र मात्र लिहिलं होतं. ती तो आपला आतेभाऊ आहे असं म्हणत असे. मी त्याला पत्र धाडलं होतं. त्याचं उत्तर त्यानं 'ती स्त्री आपली मामेबहीण असून तिच्याविषयी कसलाच अंदेशा बाळगू नये,' असं लिहिलं होतं. व खरोखर ती तशी होतीही; पण तिचं लग्न झालं असेल असं मला काही वाटत नाही. जर तिचं लग्न झालं असतं तर तिचा पति इथं दिसला नसता का? व्यापारी म्हणे ! निव्वळ थाप. अशा गोष्टी मला तरी सांगू नका." 

" त्या मास्तरचा पत्ता काय होता?" 

" नं. २० डिलाइल रोड, माटुंगा असा होता. पण त्याचा आतां काही उपयोग होईल का ?" 

हा पत्ता ऐकताच सर्जेरावांच्या तोंडून एकदम अस्पष्ट आश्चर्योदार बाहेर पडला. ___ " हा रस्ता रत्नमहालापासून फार दूर नाही. एका हाकेच्या अंतरावर आहे." 

सर्जेरावांचे हे शब्द ऐकून वृद्ध गृहस्थाने पुढे विचारले, " त्यानं तर तिचा खून केला नसेल ना ? तुमचं काय मत आहे ?" __“ तुम्ही त्या गुंतलेल्या धाग्याचं एक टोंक सोडवून माझ्या हाती दिलं आहे असं मला वाटतं.” सर्जेराव त्या मास्तराचा पत्ता आपल्या डायरीत लिहून म्हणाले, “ याबद्दल तुम्ही कोणाजवळ काही बोलू नका बरं का? याबद्दल मी तुम्हाला काही तरी देईन.” 

" अर्धे माझे बरं का." तो कद्रू माणूस पुन्हा म्हणाला, “ फक्त हजारच मिळणार ! पण काही हरकत नाही. हजार तर हजार.वास्तविक पाहिलं तर त्यांनीं-काय हो त्यांचं नांव तें-गजाननराव हिवाळे-त्यांनी मलाच दोन हजार रुपये द्यावे; परंतु नाही तर नाही. मिळतील तेवढे तर ध्यावे." ___ " खरंच का !” सर्जेराव आपली डायरी खिशांत घालीत म्हणाले, “ आणि मी चौकशी करतो आहे ती कशाकरतां ? " 

" हे असे खटले शोधून काढण्यासाठी सरकार तुम्हांला पगार देतच आहे. मला काही तसा पगार मिळत नाही.” तो गृहस्थ दरवाजांत शिरून म्हणाला, " पण आतां तें राहूं द्या. आंत येऊन ही खोली पाहा. माझ्या वेळेला पुष्कळ मोल आहे. तुमच्याबरोबर सर्व दिवस बोलत बसायला मला फुरसत नाही. हं, हा पाहा दिवाणखाना. " 

तो दिवाणखाना पाहतांच सर्जेराव आश्चर्याने स्तंभितच. झाले. रत्नमहालांतील सफेत दिवाणखान्याप्रमाणेच, अगदी थेठ तसाच, तो तयार केलेला होता. मात्र त्यांतील सामान रत्नमहालांतील सामाना इतके मौल्यवान नव्हते. भिंती व छत ही तेलाच्या रंगाने पांढरी रंगविली होती; तसेच जमिनीवर पसरलेला गालिचा व इतर सर्व लांकूडसामान पांढऱ्या रंगाचे होते. एकंदरीत हा दिवाणखाणा अगदी रत्नमहालातील दिवाणखान्याप्रमाणेच होता. परंतु त्यांत जशा अत्यंत मौल्यवान व सुखसोईच्या वस्तु होत्या तशा यांत नव्हत्या. एरवी हे दोन्ही दिवाणखाने सारखेच होते. या घरांत राहणाऱ्या स्त्रीचा-किनखापे हिचा-तसल्याच एका दिवाणखान्यांत परंतु मुंबईसारख्या ठिकाणी खून व्हावा हा विलक्षण योगायोग दिसत होता. __ " तरी ज्या स्त्रीचा रत्नमहालांत खन झाला ती हीच आहे की काय हे आम्हाला अजूनही नक्की सांगता येणार नाही." सर्जेराव सभोवार पाहत म्हणाले. 

"अं! त्यांत तर आतां संशय उरला नाही." तो वृद्ध गृहस्थ एका वेताच्या खुर्चीवर बसून म्हणाला, “तो पाहा तिकडे तिचा फोटो आहे." 

दिवाणखान्यांतील एका मेजावर दुहेरी अशी फोटोची एक रुपेरी चौकट (silver frame) होती. त्या फ्रेमच्या डाव्या हाताकडील चौक टींत एका सुंदर स्त्रीचा फोटो होता. फोटो पाहताच तो त्या मयत स्त्रीचाच 

आहे हे सर्जेरावांनी ताबडतोब ओळखलें. __ " हा खात्रीनं तिचाच फोटो आहे.” त्या फोटोकडे बराच वेळ पाहत सर्जेराव म्हणाले, “बिचारीचा खन असल्याच जागी पण दुसऱ्या ठिकाणी कसा व्हावा हे काही मला कळत नाही. त्या खटल्याच्या बाबतींत जितकं खोलांत शिरावं तितकाच तो अधिकाधिक गूढ होत चालला आहे. पण दुसऱ्या चौकटीबद्दल काय ? " ते पुन्हा एकदा दिवाणखान्यासभोंवतीं पाहत म्हणाले. 

"मला वाटतं, त्यांत तिच्या नवऱ्याचा फोटो असावा.” 'पण तो इथून काढून टाकलेला आहे." सर्जेराव म्हणाले. .. 

“हणजे !'' असा एक आश्चर्योद्वार काढून त्या वृद्ध गृहस्थाने ती रौप्यचौकट नीट पाहण्याकरितां आपल्या हातात घेतली व त्यांत खरोखरच फोटो नाही असे पाहून तो म्हणाला, " खरोखरच फोटो काढून घेतलेला आहे; पण यांत निःसंशय त्याचाच फोटो होता; कारण एके दिवशी मी तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारलं असतां तिनं यांतील फोटो मला दाखवून तो त्याचाच असल्याचं मला सागितलं होतं." 

" त्या माणसाचा चेहरा कसा काय दिसत होता, हे तुम्हाला सांगता येईल का ? " सर्जेरावांनी त्या वृद्धाला विचारले. ___“नाहीं; कारण माझी नजर इतकी वाईट आहे की, दोन अक्षरं असली तरी तिथं मला एकच अक्षर दिसू लागतं; पण इतकं मात्र मी सांगू शकेन की, त्यानं दाढी राखलेली होती.” 

" टोकदार दाढी होती ?" आनंदित होत्साते सर्जेरावांनी विचारले. 

" ते काही मला सांगता येणार नाही; पण त्याला त्या फोटोत दाढी होती, एवढं बरीक खरं आहे. सरलाबाई मला सांगत असत की, उद्योगधंद्यामुळे आपल्या नवऱ्याला नेहमी दूरदेशी फिरावं लागतं. पण तो व्यापारी होता हे तर तिनं मला केव्हांच सांगितलं नाही." 

“सरला कधी बाहेर जात असे काय ?" 

“! ती कधीच सहसा बाहेर पडत नसे, हे मी तुम्हांला पूर्वीच सांगितलं आहे. एखाद्या एकलकोंडयाप्रमाणं ती सर्वकाळ घरांतच बसून असे. ती अगदी सज्जन व कुलीन होती, पण अशा प्रकारची एककल्ली स्वभावाची होती. तिला माणसांत मिळून मिसळून वागणं आवडत नसे व हा तिचा स्वभाव मला तर मळीच आवडत नव्हता. आज ती पांच वर्षांहून अधिक काल माझी भाडोत्री असून आपलं भाडंही वेळच्या वेळी चकतं करीत असे; पण ती कोणालाही ओळखत नव्हती व कोणी तिला भेटायला आलाच तर त्याची ती भेट घेत नसे. तिनं हा अशा प्रकारचा दिवाणखाना रचलेला आहे हे मला मी इथं भाडं घ्यायला येत असे म्हणन कळलं.” 

" ती आपलं भाडं वेळच्या वेळी चुकतं करीत असे का ?" : 

" होय. माझं भाडं मिळेल किंवा नाही ही शंका मला येत असल्या. मुळं मीच ते घेण्याकरतां इथं वेळच्या वेळी येत होतो. आणि ताही आपलं भाडं कुरकुर केल्याशिवाय वक्तशीर देत असे." 

 

"तिला गाण्याचा शोक होता का?

 

" ती कधीमधी नाटकाला जात असल्यामुळं मला वाटतं तो गाण्याची शोकीन असावी." 

"मग सांखळीचा दुवा जुळला तर!" गाण्याची आठवण होऊन सर्जेराव आनंदाने ओरडले, " ती स्वतः कधीं गात असे काय ? " 

" तिला गातांना मी तर केव्हांच ऐकलेलं नाही. आणि तिची मला असावी तितकी फारशी माहितीही नाहीं; कारण ती माझ्यापाशी विशेष असं कधीच बोलत नसे. तिनं पांच वर्षांपूर्वी इथं येऊन हे घर भाड्यानं घेतलं. त्यानंतर तिचा नवरा आला. हेसुद्धा तिनंच स्वतः मला सांगितलं. पण मी काही त्याला कधी पाहिलं नाही व ती या घराचं भाडं स्वतःच देत असल्यामुळं मला अधिक विचारताही येईना. एवढीच काय ती माहिती मला आहे." 

"तिचं लग्न झालं नव्हतं असं मघां तुम्ही म्हणाला, ते कशावरून ?' 

“ तसं मी कधीच म्हटलं नव्हतं; मी फक्त मला माहित नाही एव ढंच काय ते म्हणालो होतो. ती अगदीं सज्जन बाई असून जेवणा खाण्यांत व राहणींत अगदी साधी होती. कधी कधी ती घराला टाळं मारून एक आठवडापर्यंत बाहेरही राहत असे." 

" नेहमी एकच आठवडा राहत असे ?" 

" होय. त्याहून अधिक दिवस ती कधीच बाहेर राहिलेली नाही. मला वाटतं, ती व तिचा नवरा अशी दोघं कुठं तरी फिरायला जात. तशांत तिला मूलबाळही काहींच नव्हतं. पण ते असो. तुम्ही आतां बाकीचं घर पाहणार नाही का ?" 

" पाहणार तर !" असे म्हणून सर्जेरावांनी पुन्हा एकदा त्या दिवाणखान्याभोंवतीं नजर फेकली; त्या वेळी त्यांना दिवाणखान्याच्या मध्यभागी असलेल्या एका सफेत लाकडी वाटोळ्या मेजावर एक 'फोटो आल्बम" पडलेला दिसला. त्याचे वरील ' बाइंडिंग ' पांढऱ्या चामडयाचे होते. सर्जेरावांनी तो आल्बम घेऊन आंतील फोटो पाहिले. अर्धा अधिक आल्बम फोटोविरहितच होता व इतर जे फोटो होते ते सर्व स्त्रियांचेच होते. त्यांपैकी कित्येक सरलेच्या बालपणचे असन कांहीं ती नऊ-दहा वर्षांची असते वेळी घेतलेले होते, ती पंधरा सोळावर्षीची होती तेव्हांचे कांहीं होते व काहीं अलीकडील होते. त्या आल्बममधील काही फोटो काढून टाकलेले होते हे आल्बमच्या पानाच्या फाटलेल्या कोपऱ्यांवरून दिसून येत होते. सर्जेरावांनी हे सर्व पाहून ठेवले व त्यावर विचार करीत ते दिवाणखान्यांतून बाहेर पडले. घरांतील सर्व पुरुषांचे चेहरे मुद्दाम व काही तरी हेतूनेच काढून घेतले असले पाहिजेत अशी त्यांची खात्री होऊ लागली. घरांत शिरण्यापूर्वी, त्या घरांत कोणां ना कोणा पुरुषाचा फोटो दिसेल व त्यामुळे खुनी हुडकून काढण्यास आपणास बरीच मदत होईल अशी त्यांना आशा होती. परंतु वर दिल्याप्रमाणे त्यांना निराळाच अनुभव आला. दिवाण खान्याच्या दरवाजांतून बाहेर पडतांना त्यांची दृष्टि सहज खाली गेली व तेथे जमिनीवर पसरलेल्या सफेत गालीचावर त्यांना पावले उमटलेली दिसली. त्याबरोबर त्यांनी त्या गांवीं पाऊस पडत होता काय असा 

त्या वृद्धास प्रश्न केला. 

केलेला प्रश्न ऐकतांच बराच पुढे गेलेला तो म्हातारा माणूस मागे परतून त्या उमटलेल्या पावलांकडे न्याहाळन पाहूं लागला. गालिचावर उमटलेली पावले चिखलाचीच होती हे स्पष्ट दिसत होते. "आज आर वडाभर तर मुळीच पाऊस नाही," त्या वृद्ध गृहस्थाने उत्तर दिले, "व सरला तर इतकी स्वच्छ व नीटनेटकी होती की, तिला असला अमं गळपणा व गलिच्छपणा मुळीच खपत नसे व अशा प्रकारचा लहानसा डागसुद्धा तिनं इथं राहू दिला नसता." 

" सध्या तर चांगला उन्हाळाच आहे. " विचार करून सर्जेराव म्हणाले. 

"होयः पण आठ दिवसांपूर्वी मात्र इथं भयंकर वादळ झालं होतं." " पण त्यापूर्वीसुद्धा चांगलाच कडक उन्हाळा होता." " पण त्याचा इथं काय संबंध ? " 

“ मला वाटतं--'' सर्जेरावांचा पुढे काही बोलण्याचा इरादा होता. परंतु ते तेवढयावरच थांबून म्हणाले, “ आपण बाकीचं घर तपासून पाहूया.” __ सर्जेरावांच्या डोक्यात कोणते विचार चालू आहेत तें न समजल्या मुळे वृद्ध गृहस्थाने एकदा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले, परंतु त्यावरून त्याला कांहींच बोध न झाल्यामुळे तो तसाच काठी टेंकीत पुढे चालू लागला. दिवाणखान्यांतून निघून ते एका लहानशा स्वयंपाकखोलीत आले, तेथून ते निजावयाची व जेवणाची खोली पाहून घराच्या मागच्या बाजूला बाहेर पडले. त्या बाजूस एक लहानशी खोली उघडी असून तीत जिन्नस ठेवण्यासाठी फळ्या मारलेल्या होत्या व जशी पुढे तशीच घराच्या मागेंही एक छोटीशी छानदार बाग असून त्या बागेत सुवासिक फुलांचे ताटवे लावलेले होते. पुढच्या भागाप्रमाणे मागच्या भागासही लांकडी फळ्यांचे कुंपण असून त्यांना चांगला तेलाचा रंग दिलेला होता. घराच्या एकंदर रचनेवरून व पुढेमागे तयार केलेल्या बागेवरून सरला ही नीटनेटकी व बागेची शोकीन स्त्री असावी असें सहज अनुमान करता येण्यासारखे होते. असो. 

स्वयंपाकगृहांत व जेवणाच्या खोलीत अगदी साधे सामान नीट व्यवस्थेनें रचून ठेवलेले होते. भितींतच असलेल्या फडताळांत त्या मुलाने आणून टाकलेले पाव पडलेले होते व इतर रोजच्या उप योगास लागणाऱ्या कांहीं वस्तु धुरळा पडून खराब झालेल्या होत्या. त्या खोलीचे अवलोकन करतांच, पुढच्या बागेतून एकदम स्वयंपाकगृहांत येण्यासाठी एक स्वतंत्र मार्ग आहे असें सर्जेरावांस आढळन आलें. त्यासंबंध में पूर्ण खात्री केल्यानंतर ते पुन्हा घरांत आले व झोंपावयाची 

खोली तपसू लागले. 

" कदाचित् तिचं लग्न झालं नसावं, " तो वृद्ध गृहस्थ सर्जेरावांस उत्तरादाखल म्हणाला. “ तो तिच्या हितचिंतकांपैकी, ओळखीपैकी अगर एखाद्या नातलगांपैकी कोणी तरी असून तिला भेटण्यासाठी म्हणून मधून मधून इथं येत असावा; कारण तो इथं राहत नसे." 

" तो इथं कधी कधी राहत असे असं तो मुलगा सांगत होता. " " अं! तो पोरगा बदमाष आहे." वृद्ध गृहस्थ रागाने म्हणाला. " ते काही मला माहित नाही पण मला एक विचार सुचतो आहे." " कोणता तो?" 

“मी तुम्हांला तो मग सांगेन." असे म्हणून सर्जेरावांनी खोलींतील मेजाचे सर्व खण उघडून पाहिले. त्यामध्ये रुमाल, फिती वगैरे पुष्कळ उपयोगी वस्तु होत्या. परंतु त्या सर्व स्त्रियांच्याच उपयोगाच्या असून त्यांपैकी पुरुषाला लागणारी एकही वस्तु नव्हती. 

"तिची लिहिण्याची जागा कुटं आहे ? " सर्जेरावांनी उतावीळपणे विचारले. 

" सफेत दिवाणखान्यांत तिचं लिहिण्याचं मेज आहे, मी मघांशी बसलो होतो तिथं." 

सर्जेरावांनी त्या खोलीत काही कागदपत्र मिळतात की काय हे पाहण्याकरितां पुन्हा एकदा ती खोली बारकाईने तपासली. परंतु त्यांचा प्रयत्न व्यर्थ झाला. तेथे काहीच मिळत नाही असे पाहून ते पुन्हा सफेत दिवाणखान्यांत आले. त्या दिवाणखान्यांत तिचें लिहि. ण्याचें मेज एका खिडकीजवळ असन ते उघडेच होते. सर्जेरावांनी त्याचें झांकण जरा वर उचलतांच ते साफ उघडले. “हें मेज टाळं फोड़न कुणी तरी उघडलेलं आहे असं दिसतं," असे म्हणन त्यांनी तें झांकण साफ उघडले. मेजांतील खणांत कोणी तरी ढवळाढवळ केलेली दिसत होती. 

मेजाचें झांकण उघडतांच त्या वृद्ध गृहस्थाने आंत डोकावून पाहिले. आंत कांही बिलें, नोटपेपर, लिहिण्याचे कोरे कागद, कोई पाकिटें व दोनतीन लाखेचे तुकडे अस्ताव्यस्त रीतीने पडलेले होते. परंतु 

ज्याच्या योगाने सरलेबद्दल अगर तिच्या पतीबद्दल काही बातमी मिळेल असें त्यांत कांहींच नव्हते, आणि खुनाचा शोध तिच्या गत चरित्रावरूनच लागण्यासारखा होता. सर्जेरावांनी त्या मेजाकडे, कुलपाकडे, खणांत, जमिनीवर वगैरे ठिकाणी बारकाईने पाहिले व इतकाच शोध लावला की, आठ दिवसांपूर्वी येथे कोणी तरी येऊन त्याने सरलेच्या मागच्या चरित्राचा, तसेंच तिच्या पतीचा पत्ता लागू नये या हेतूने सर्व प्रकारचा पुरावा, कागदपत्रे, फोटो वगैरे-नाहींसा करून टाकलेला आहे. 

" हे तुम्हाला कसं समजलं ? " वृद्ध माणसाने विचारले. 

सर्जेरावांनी जाजमावरील उमटलेली चिखलाची पावले त्याला दाखवून म्हटले, " इथं हल्ली एक आठवडा तर अगदी कडक ऊन पडत असतं असं तुम्ही म्हणतां. आठ दिवसांपूर्वी काय ते वादळ झालं होतं तेवढंच व अशा पावसाच्याच दिवसांत रस्त्यावर चिखल असा यचा; अर्थात त्याच वेळी कोणी तरी येऊन इथं ढवळाढवळ करून गेलं असावं आणि---" ___ पण तें वादळ रात्री झालं होतं. " मध्येच तो वृद्ध म्हणाला, 

" मग तर त्याला चांगलंच सोयीचं झालं. तो आला त्या वेळी त्याच्या बुटाला चिखल लागला असला पाहिजे व त्याचंच पाऊल द्या जाजमावर उमटलं. त्यानं सरलेच्या नवऱ्याची कोणतीच खूण इथं राहूं दिली नाही म्हणून 

" काय ? " त्या वृद्ध गृहस्थाने मध्येच विचारले. 

" मला वाटतं, की तो येणारा माणूस स्वतः सरलेचा नवरा असून त्यानंच आपल्या पत्नीचा रत्नमहालांत खन केला असला पाहिजे."

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel