सर्व निगामाचें सार । ब्रह्म सत्य जग निःसार ॥१॥

मनोभावें गुण गावें । रुप देवाचें तें ध्यावें ॥२॥

परकार्यीं देह जावा । लाभ अनंत हा घ्यावा ॥३॥

जगीं मरुन उरावें । कीर्तिरुपें अमर व्हावें ॥४॥

ब्रह्मीं एकरस व्हावें । ’रंग’ अरंग तें पहावें ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel