गोस्वामी तुळशीदास रचित श्रीरामचरित मानस मध्ये असे वर्णन आहे की प्रभू श्रीरामांनी सीता स्वयंवरात शिव धनुष्य उचलले आणि त्याला प्रत्यंचा लावताना ते तुटले. धनुष्य तुटण्याचा आवाज ऐकून भगवान परशुराम देखील तिथे आले. आपल्या आराध्य दैवताचे धनुष्य तुटलेले पाहताच परशुराम प्रचंड क्रोधीत झाले आणि राम व लक्ष्मणाशी त्यांचा वाद देखील झाला. तर वाल्मिकी रामायणानुसार सीतेशी विवाहानंतर जेव्हा श्रीराम अयोध्येला परतत होते तेव्हा परशुराम तिथे आले आणि त्यांनी रामाला आपल्या धनुष्यावर बाण चढवण्यास सांगितले. श्रीरामाने धनुष्यावर बाण चढवून सोडला, ते पाहून परशुरामाला प्रभू श्रीरामांचे खरे स्वरूप लक्षात आले आणि ते तिथून निघून गेले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.