लेखक - आतिश पवार

  • आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण
  • जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथे शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत ........
  • चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात......
  • जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही.....
  • वेळ बदलते, आयुष्य पुढे सरकल्यावर.....आयुष्य बदलते, प्रेम झाल्यावर, प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर.....पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर.......
  • "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".....
  • रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते......
  • ५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईलने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल, तर "नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल ".......
  • जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती, यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन....
  • मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.......
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel