चौथें दर्शन

वसंता : वेदपुरुषा! आतां हे अदृश्य स्वरूप पुरें झाले. आपण लोकांजवळ बोलूं, बसूं; त्यांच्याजवळ चर्चा करूं.

वेदपुरुष : एकाच स्थितीचा मनुष्याला कंटाळा येतो. तूं म्हणशील तसें. हें घे तुझें पहिलें रूप.

वसंता : मी आतां कसा दिसतो !

वेदपुरुष : फार गोड दिसतोस ?

वसंता : आपण आगगाडींतून कोठें तरी जाऊं या.

वेदपुरुष : चांगली कल्पना! आगगाडींत पायांखाली तुडवले जाणारे किती तरी सोन्यामारुती असतात !

वसंता : परंतु तिकीट कोणत्या गांवाचें काढायचे ?

वेदपुरुष : काढ झालें कोठलें तरी !

एक झकपाक पोषाख केलेला गृहस्थ तिकीटमास्तराच्या ऑफीसांत ऐटीनें शिरला व त्यानें तिकीट मागितलें. तिकीटमास्तरानें त्याला दिलें. तो पहा एक शेतकरी खिडकीजवळ गर्दी आहे म्हणून ऑफिसांत हळूंच शिरत आहे. वसकन् तिकीटमास्तर त्याच्या अंगावर आला! ''बाहेर जाव. खिडकीपाशीं जा.''

शेतकरी : तेथें गर्दी आहे रावसाहेब. मी म्हातारा आहें.

स्टेशनमास्तर : माझा बाप कीं काय तूं ? गर्र्दी आहे म्हणे. सर्वांना मिळेल, त्या वेळेस तुला मिळेल. जा बाहेर.

वसंता : खरें म्हटलें तर त्या लखलखीत पोषाख घातलेल्या झब्बूला बाहेर हांकललें पाहिजे होतें. उन्हातान्हांत कष्ट करणार्‍या त्या म्हातार्‍या शेतकर्‍याला आंत अदबीनें बोलाविलें पाहिजे होतें.

वेदपुरुष : तुमच्या समाजांत कर्मशून्यांना मान आहे. जे स्वत: संपत्ति निर्माण न करतां, निर्मिलेली खिशांत भरतात, अशांना तुमच्या समाजांत पूजिलें जातें. खिडकीजवळ उभे राहणारे हे बहुतेक शेतकरी कामकरी असतात,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel