जातपात गुणकर्मे आली जनतेची एका ।
उच्चनीचता जन्माने हा धरुं नका हे का ॥
सर्वांना सारखे गणा
नका म्हणू अस्पृश्य कुणा
हिंदू तितुका एक ! बंधने भेदाची फेका ।
उच्चनीचंता जन्माने हा धरु नका हेका ॥१॥
एकचि आपुला देव नि देश्
कामापुरते विभिन्न वेश्
देशावरची निष्ठा वेशे विचलीत होते का ?
उच्चनीचता जन्माने हा धरु नका हेका ॥२॥
हिंदुत्वाची विशालता
जात्युच्छेदे स्थिर होतां
होऊ आम्ही बलाढय जगती नसो कुणा शंका ।
उच्चनीचता जन्माने हा धरु नका हेका ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel