मूर्ख आहे का हा माझच चुकल नको तितके मागे लागत राहते. त्याला काही पडली नसते माझी मीच विचार करायचा बस्स. चारु रागात बोलत होती डोळ्यात पाणी जमा झाल होत. चारु नको ना इतका त्रास करून घेऊस मानसी म्हणाली. त्रास होतय ग मला त्याच्या वागन्याचा . जरा सुद्धा सॉफ्ट कॉर्नर नाही त्याला. पण चारु आदित्य ख़ुप प्रेम करतो ग तुझ्यावर. त्याला काळजी असते तुझी म्हणून बोलतो तो तुला. असली काळजी नुसत आपल चिडन आणि ओरडन याला काळजी म्हणतात.चारु बास ना आता शान्त हो. तसे ही तुम्ही दोघे ही मूर्ख आहात. भांडता काय आणि परत एकत्र येता काय . मनू मार खाशील आता. मार आदी चा राग माझ्या वर काढ चालेल. चारु चा फोन वाजतो. आला बघ तुझ्या बोक्याचा कॉल मानसी बोलली. चारु ने पाहिले कॉल मिलिंद चा होता. हॅलो बोल काय मॅडम आज प्रॅक्टिस आहे, आहे ना लक्षात . हो रे आहे लक्षात येते मी वेळेवर. काय ग असा लो आवाज का येतोय तुझा? काही नाही मिल्या . मिल्या आज परत वाजल आहे दोघांच मध्येच मानसी चारु जवळ येऊन बोलली. हम्मम चारु किती भांडता ग तुम्ही. मिल्या बस्स आता तू नको सुरू होऊस. ओके ये वेळेत बाय. 

चारु मानसी एकत्र फ्लॅट रेंट ने घेऊन राहत होत्या. जॉब करत होत्या चारुचा आवाज छान होता त्यामुळे तिच्या कॉलेज मेट्स नी एक म्युझिकल बँड काढला होता त्यात ती गाणं गायची. छोटे मोठे प्रोग्राम त्यांना मिळायचे बँड मिलिंद ने सुरू केला होता त्यात अमोघ,विशाल मिलिंद शर्वरी चारु असे जॉईन होते. प्रत्येक जण कशा न कशात परफेक्ट होता. एक प्रोग्राम त्यांना मिळाला होता सो त्याची रिहर्सल आज पासून होती. आदित्य ही चारु चा क्लास मेट दोघे कॉलेज पासून प्रेमात होते. आदी एकदम चार्मिंग आणि हॅंडसम असा आणि चारु ही नाजूक सुंदर आणि गोड गळयाची अशी. आदी चा स्वभाव एकदम रागीट,शॉर्ट टेम्पर्ड असा. त्याच्या मना सारख नाही झाले की चिडणार. पण त्या चिडण्या मागे काळजीच जास्त असायची. चिडला की एकदम जमदग्नी चा अवतार. लवकर शान्त न होणारा. चारु समंजस शांत अगदी त्याच्या उलट स्वभाव तिचा. खूप हळवी आणि खूप जीव लावणारी आदित्य तिचा जीव की प्राण पण खटके कायम उडायचे त्यांच्यात हम्मम यालाच तर प्रेम म्हणतात! काल तिचा फोन चुकून गाडी च्या डिकीत राहिला मग आदी ने कॉल केला पण बराच वेळ चारु ने कॉल रिसिव्ह नाही केला कारण ती फोन गाडीत आहे हेच विसरली होती मग काय आदी ला इतकं कारण पुरेसे होते चिडायला. कळत नाही तुला कुठे ही फोन विसरतात का? माझ्या मनात काय काय विचार येऊन गेले अस बरच काही बोलला. आणि ऐकून घेईल शान्त पणे तो आदी कसला! रात्री पर्यंत तर त्याने चारु ला कॉल नवहता केला. सकाळी तिनेच गुड मॉर्निंग चा मेसेज केला पण  मेसेज बघून पण आदी ने रिप्लाय नाही केला. मग चारु ही आवरून ऑफिस ला गेली. तिने ठरवले त्याला आता अजिबात मेसेज किंवा कॉल नाही करायचा. 

इकडे आदी ही अस्वस्थ होता तिने सॉरी म्हणावं आपल्याला मनवाव अस त्याला वाटत होते जे ती दरवेळी करायची मग हा खुश व्हायचा. पण आज तिने अजिबात त्याला कॉन्टॅक्ट नाही केला. तो कधी ही माघार नाही घ्यायचा मी म्हणेन तसच झाल पाहिजे हा त्याचा अँटीट्युड असायचा. असेच चार पाच दिवस निघून गेले . दोघे ही शान्त होते. चारु ची गाण्याची रिहर्सल सुरू होती. अमोघ ला चारु खूप आवडायची त्याच प्रेम होतं तिच्या वर पण ती आदित्य सोबत आहे हे त्याला खटकत असे. बरयाच वेळा तो चारु ला म्हणायचा काय तो आदी त्याला ना दुसऱ्याच्या फिलिंग्ज कधी समजतच नाहीत . खूप डॉ मिनेट टाईप आहे तेव्हा चारु ने त्याला चांगले सुनावले होते त्यामुळे हा कायम चारु ला ही पाण्यात बघायचा. पण एकत्र बँड मधये होते सो मिलिंद त्यांना समजून सांगायचा. तसे ही अमोघ ला चारु सोबत वेळ घालवायला मिळायचा तेच त्याला हवे असायचे . आदी ला जेलस फील करण्यासाठी. मग रिहर्सल चे फोटोज काढ आणि एफ बी ,इंस्टा वर पोस्ट कर यात चांगला तो माहीर होता. चारु सोबत ड्यूट गाताना चा व्हिडिओ पोस्ट कर अस त्याच आदी ला जेलस करणं सुरू असायचं. पण आदी चारु ला ओळखून होता. ती त्याच्यावर किती प्रेम करते हे जाणून होता. 

क्रमश..

©® sangieta devkar 2017

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel