ही  कथा सत्य घटणेवर आधारीत आहे

बाबु गावकडे जान्यासाठी मुंबई च्या छत्रपती टर्मिनल रेल्वे स्टेशन वर आला मुंबई सोडताना त्याचे पावले जड झाली होती सगळे प्रवासी धावपळ करीत होते मात्र बाबु एक , एक पाऊल टाकत टिकीट खिडकी वर पोचला व गावा कडचे तिकीट घेऊन प्लॉट फार्म वर आला.

काही मिनटातच रेल्वे प्लॉटफार्म वर आली सर्व प्रवासी आप आपली सिट पकडण्या साठी पळा , पळ करीत होते मात्र बाबु आपल्या प्रेमाला निरोप देऊन गावा कडे निघाल्याने त्याचे अंतकरण भरून आले होते. पावले जड झाली होती कारण तो मुंबई कायमची सोडून चालला होता जड अंतकरणाने त्याने रेल्वेत पाऊल ठेऊन प्रवेश केला व खीडकी जवळ सिटवर बसला .

गाडी सुटायला थोडा वेळ होता बाबु खिडकीतुन माया नगरी कडे पहात होता मनात  , दुःखाचे ढग डाटून आले होते रात्री १० वाजता  रेल्वे सुटली  आणी बाबुचे ह्रदय धडधड करू लागले मन अस्वस्थ झाले डोळ्यात आश्रृच्या धारा लागल्या कारण ईच्छा नसताना आज आपण केवळ ना विलाजाने मुळे प्रेमाला अखेरचा निरोप देऊन शोभा पासुन कायमचे लांब जात अहोत .
शोभाची पुन्हा कधीच भेट होणार नाही ही वेळ बाबु साठी खुप वेदना दायी होती.

रेल्वेने मुंबई सोडली होती बाबु चे मन उदास  होऊन खिडकी बाहेर बघत होता काही वेळातच मुंबईचा लखलखनारा प्रकाष संपला बाहेर कीर्र अंधार पसरला होता बाबु चे आयूष्य अंधारात बदलले होते मन अस्वस्थ झाले .

बाबु मराठवाडयातील गरीब कुटूंबातील मुलगा साधा राहणीमान शिक्षण अर्धवट सोडून मुंबई ला गेला तिथे एका कंपणीत दोन वर्ष काम केल्यावर त्याच्यात बऱ्या पैकी बदल झाला मुंबई ची चांगली ओळख झाली होती राहणी मानात खुप सुधारणा झाली होती . चणाक्ष असल्याने कंपणीने दिलेली जबाबदारी यशस्वी पणे पार पाडत होता .
या मुळे तो कंपणीतल्या मॅनेजर व स्टाफ मध्ये सर्वाचा लाडका झाला होता.
या मुळे त्याच्यावर छोटया , मोठया जबाबदारी ची कामे सोपविली जात असे कंपणीतल्या कामगारा कडून काम करून घेणे ही सुपरवाईजर ची जबाबदारी त्याच्यावर सोपविली गेली होती .

मुलगा कामाला लागला म्हणुन आई , वडिलांनी बाबु च्या लग्नाची तयारी केली होती मुलगी बघतली व मुलगी पहायला ये म्हणुन कळवीले आज ना उदया लग्न करायचे आहे म्हणुन विचार न करता बाबु गावाकडे मुलगी बघण्या साठी सुट्टी घेऊन गेला मुलगी पसंत पडली व काही दिवसातच साखर पुडा केला साखरपुडा केल्यावर बाबु पुन्हा मुंबई ला आला होता .

कंपणीत  कामगाराची  गरज असल्याने  कामगार भरती साठी कंपणी च्या गेटवर बोर्ड लावण्यात आला होता  नेहमी प्रमाणे कंपणीतले काम काज पाहत असताना एक मुलगी आली आणी म्हणाली मी शोभा कामाच्या शोधात होते बाहेर गेटवर कामगार भरतीचा बोर्ड पाहिला आहे. मला काम करण्याची ईच्छा आहे मी माझी जबाबदारी प्रमाणीक पणे पार पाडीन असे सांगीतल्याने बाबुने  तीला मॅनेजर मॅडम ची भेट घालुन  दिली .

शोभाची तोंडी परिक्षे नंतर तिला दुसऱ्याच दिवसा पासुन कामावर यायचे सांगीतले ति जाताना आनंदात दिसत होती दुसऱ्या दिवशी ती  कंपणीत  कामासाठी वेळेत पोहचली शोभा नवीन असल्याने तीला तिचे काम समजुन सांगण्याची जबाबदारी बाबु वर सोपविली होती.
बाबुने तिला तिचे काम समजाऊन सांगुन काम दिले तसेच काही कळले नाहीतर घाबरू नकोस मला सांग तुला मदत करीन असे सांगुन बाबू दुसऱ्या कामाला लागला बाबुचा शांत व सहकार्याची भावना असणारा स्वभाव पाहुन शोभाला बरे वाटले .

काही दिवसांनी शोभा धीट झाली जुन्या कामगारा प्रमाणे सर्वा बरोबर हसून खेळून कामात रमू लागली हळू हळू ती बाबु ला मित्र मानू लागली आणी काही दिवसातच बाबु वर प्रेम करू लागली मात्र मनातील प्रेम व्यक्त  करू  शकली नाही या साठी योग्य वेळ ची वाट पहात होती .

बाबु कधीही कामा शिवाय काय बोलतच नाही या मुळे एके दिवशी  शोभानेच ठरवले आपणच बोलायला सुरुवात करायची असे ठरवले  दुपारी लंच वेळात थोडा वेळ मिळाला होता .

शोभा , बाबुला म्हणाली तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलत नाही तुमचे लग्न झाले का ?

बाबु , नाही
बाबुचे उत्तर ऐकुन शोभा गालात हसली  पण तिचे ह्रदय धडधड करू लागले पुढे काय बोलावे सुचेना म्हणुन ती परत कामात गुंतली .

बाबु , कश्या मुळे विचारले शोभा .
शोभा , काही नाही सहजच विचारले लग्न झाले का नाही

बाबु , ठीक आहे असे म्हणत आपल्या कामाला लागला शोभाच्या मनात काय आहे बाबुच्या लक्षात आले नाही काही दिवस गेले शोभाच्या मनात बाबु विषयी प्रेम वाढत गेले पण ते  प्रेम व्यक्त करू शकत न्हवती   एके दिवसी कंपनीतल्या पाच , सहा महिला कामगारांनी  ठरवीले उदया सोमवारी कंपनीला सुट्टी आहे सिनेमा पहायला जाऊया प्रस्ताव बाबु समोर मांडला बाबु ने पण होकार दिला मग अंडव्हांन्स तिकीट काढण्याचे बाबु ने जबाबदारी घेतली संध्याकाळी सुट्टी झाल्यावर सगळयांनी सिनेमा पहायचा ठरलेला कार्यक्रम पुढे बघू म्हणुन टाळला  असल्याने बाबु ने शोभाला सांगीतले सिनेमा पहायचा कोणीच येणार नाही.

यावर शोभा म्हणाली मी येणार आपण दोघे जाऊ  कारण शोभाला आपले प्रेम व्यक्त करण्याची चांगली संधी मिळणार असल्याने  तीने   होकार  दिला होता .

यावर बाबुने शोभा ची तयारी बघुन होकार दिला ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी शोभा गोरेगावच्या रेल्वे स्टेशनवर येऊन बाबुची वाट पाहत थांबली होती . बाबु ला यायला उशीर झाल्याने बाबु ची अतुरतेने वाट पहात होती आज मनातील प्रेम बाबु समोर व्यक्त करण्याची चांगली संधी आहे असे तिला वाटत होते . काही वेळात बाबु समोर दिसला शोभा ला आनंद झाला मात्र उशीरा आल्या मुळे थोडी नाराज झाली होती .

शोभा , का उशीर केला ? तास झाला मी वाट पहात थांबले आहे ,
बाबु , अजुन खुप वेळ आहे एवढया लवकर कश्याला आलीस,
शोभा , आज दिवसभर सुट्टीच आहे म्हणल लवकर गेल्यावर थोड बोलू बसू म्हणुन लवकर आले, तुम्हाला राग आला का ?
बाबु - नाही तसे नाही ग चल चहा घेऊ असे म्हणत दोघे बाजूच्या कॅन्टीन मध्ये गेले , चहा मागवीला दोघांनी चहा घेत गप्पा मारताना शोभाने तिची परिस्थीती सांगायला सुरुवात केली आई , वडील वारलेत बहीनी कडेच राहते मला कोणाचा अधार नाही. असे म्हणत तीच्या डोळ्यात आश्रृ आले बाबुच्या खांदयावर डोके ठेऊन खुप रडली  . शोभाचे ऐकुन बाबुला ही वाईट वाटले शेवटी नसीबाच्या पुढे सर्व हतबल असतात .

आपल्या मनातील प्रेम बाबुला सांगायची वेळ आली होती शोभा च्या ह्रदय चे ठोके वाढले होते थोडे शांत होत डोळे पुसत शोभा म्हणाली बाबु तुम्ही मला अधार देणार का ? असे म्हणत पुन्हा  रडू लागली शोभाचे शब्द ऐकून बाबुला काहीच सुचेले नाही .
बाबु वेगळ्याच विचारात होता बाबु चे लग्न जमल होत व साखर पुडा देखील झाला होता. दोन तीन महिन्यात लग्न करण्याचे ठरले होते शोभा आपल्यावर एवढे प्रेम करते हे बाबुला कळाले पण न्हवते. पण आज बाबूला काय करावे सुचत न्हवते   बाबु चे  मन अस्वस्थ झाले पाहिल्याच वेळी आपल्यावर कोणीतरी एवढे  प्रेम करीत आहे  याची जाणीव झाली होती बाबु द्विधा मनस्थीतीत होता  दोघे दुःखी झाले होते या मुळे सिनेमा पहायचा रद्द झाला दोघांच्या डोळ्यात आश्रृ होते .

बाबु देखील शोभाचे प्रेम बघुन घयाळ झाला होता खूप उशीरा नंतर दोघं आप आपल्या घरी गेले रात्रभर बाबुला झोप आली नाही आयूष्यात प्रेम काय असते पाहिल्यांदा पाहिले होते मात्र हे प्रेम नियतीला मान्य नाही असे वाटत होते. या मुळे मन अस्वस्थ झाले होते . दुसऱ्या दिवशी दोघे कामावर आले दोघांची नजरा नजर .झाली आणी दोघांच्या डोळ्यात आश्रृ आले कसेबसे सावरून कामाला सुरुवात केली मात्र कामात मन लागत न्हवते काही दिवस एक मेका समोर गेली मात्र बाबुच्या लग्नाची तारीख ठरल्याचा गावा कडून निरोप आला व बाबु ला क्षणभर काहीच कळाले नाही आनंद होण्या पेक्षा बाबू खूप दुःखी झाला त्याला शोभाचे प्रेम समोर दिसत होते तर दुसरी कडे आई वडीलांचा आनंद बाबु लवकर ये लग्नाची जुळवा जुळव केली आहे ,

बाबु = हे परमेश्वर मला कसल्या कोड्यात घातले रे तु एकीकडे माझे आई , वडीलाचे प्रेम तर दुसरी कडे अभागी शोभाचे प्रेम सांगना मी काय करू लग्न मोडल्यास आई , वडीलांचे मन मोडेल ते खुप दुःखी होतील तर दुसरी कडे शोभा चे मन , नियतीला मान्य नसलेले प्रेम मला का दिलेस तु असे म्हणत बाबु च्या डोळ्यात आश्रृ आले बाबु खुप दुःखी झाला .व ठरविले हे मुंबई शहर कायमचे सोडून जायचे इथे राहुन मी शोभाचा सामना करू शकणार नाही मात्र शोभा माझ्या आठवणीत कायम राहील ,

बाबु ने जाता जाता शोभा ची शेवटची  भेट घेतली शोभाला  मिठी मारली  दोघे  खुप रडले आणी जड अंतकरणाने बाबुने शोभाच्या हतात  एक पत्र  देऊन निरोप घेतला .

प्रिय
शोभा तु माझे पाहिले प्रेम आहे. तुझे माझ्यावर असलेले प्रेम मी जिवानाच्या शेवटच्या श्वासा पर्यंत विसरू शकणार नाही आई , बाबांनी माझे लग्न जमविले आहे तुझे प्रेम मिळाल्यावर ईच्छा नसताना देखील लग्न करण्याची वेळ माझ्यावर आली आहे आपले प्रेम नियतीला मान्य नाही असेच दिसत आहे , मी तुझ्या शिवाय मुंबईत राहु शकणार नाही म्हणुन आज मी कायमचा गावी जात आहे मला क्षमा कर या जन्मी आपण नाही भेटू शकलो  पुढच्या जन्मी तु माझीच असणार आणी मी तुझाच असणार शोभा मी तुझ्या शिवाय या मुंबईत जगू शकणार नाही म्हणुन मुंबई कायमची सोडत आहे
तुझा दुर्देवी  बाबु

.............................. .
रात्रभर प्रवास केल्यावर सकाळी रेल्वे सोलापुर स्टेशन वर थांबली व बाबु एस .टी ने गावाकडे शोभाची आठवण घेऊन आला .एस .टी गावात पोचली होती त्याच्या मनातुन शोभा ची आठवण जात नव्हती एस .टी. तुन उतरून गावा कडे नजर फिरवीली गजबजलेल्या शहरातून आल्याने गावात त्याला भयान शांतता वाटत होती.
एक एक पाऊल टाकीत बाबु घराच्या  दिशेने निघाला लांबुनच घरा समोरील लग्नाचे मंडप नजरेस पडले मंडपात लहान मुले खेळत होती व स्पीकर वरील , हम बे वफा ना तुम बे वफा मगर क्या करे अपनी राहे जुदा है, हे गाणे काणावर पडले.

खरेच दोघा पैकी कोणीच बेवफा नव्हते  तरी पण त्यांना प्रेमाचा त्याग करावा लागला होता . शोभाचे प्रेम आपल्या नशीबात नव्हते  म्हणुन बाबू ला रडू आले . अनेक वर्ष लोटले पण बाबु शोभाला विसरू शकला नाही पाहिले प्रेम कधीच विसरता येत नाही .

II समाप्त ll

लेखक - निसार मुजावर
mo. no - 9423343108
email - Pujyanagri@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel