१५ ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता दिवस. या दिवसासाठी १५ दिवसापूर्वीच आमची संगीताची तयारी चालली होती. कॉलेजचा संगीताचा ग्रुप ज्यात मी ही होती त्या ग्रुपला 'SSGMCE Official Band-C# Band' म्हणून ओळखल्या जातं. या दिवशी आम्ही आमच्या सुरांनी देशभक्ती गीत गाऊन सगळ्यांना मनमोहित केलं आणि आपल्या साठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्यांना शत-शत प्रणाम केला. याच दिवसांचा सगळा आनंद मी माझ्या कवितेच्या रुपात स्पष्ट करत आहे. 

मनातील शब्दांची फुलपाखरं हळूच कागदावर उतरली आणि बघता बघता एक कविता जन्मास आली..

कालचा चंद्र आला आम्हा झोपवण्यासाठी,
चांदणी आली अंगाई गाण्यासाठी,
नि आम्ही गेलो अंथरुणावर निजण्यासाठी,
चंद्र म्हणाला उदयाला पाठवेल मी सूर्याला तुम्हा उठवण्यासाठी..

उद्या करायचे आहे स्वतंत्र वीरांना शत-शत प्रणाम,
ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच आपला भारत बनला महान,
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण,
करायचे आहे भारत देशास असंख्य प्रणाम..

सकाळ उजळून आली सूर्याच्या कोवळ्या किरणांनी, 
तयारीने पटांगणात आले सगळे मिळूनी,
सलामी देत झेंडा फडकुनी,
देशासाठी बलिदान दिले ज्या शहिदांनी, 
नमन केले आज त्यांना मनापासूनी..

नयनी रुजून बसला तीन रंगांचा तिरंगा,
तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा,
आतून रंगला तो न जाणे किती रक्ताने,
तरी फडफडतो दरवर्षी नव्या उत्साहाने..

राष्ट्रगीत, नारे, नृत्य, भाषणे झाली, 
सगळे मोहित झाले आमच्या सामूहिक देशभक्ती गीताच्या मंजुळ सुरांनी,
प्रशांसाची लाट कोसळली C# वरती,
जश्या उसळतात लाटा सागराच्या किनाऱ्यावरती..

ज्याप्रमाणे आपल्या भारतात आहे विविधता
पण सगळ्यांचा धर्म मात्र मानवता,
त्याचप्रमाणे C# मध्ये सगळ्यांच्या गुणात होती अनेकता,जुळवून झाली एकता..

रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात,
तसेच सगळ्यांचे वेगळे रंगीत गुण असूनही, 
C# मध्ये रंग स्वतःचा बहरुनी एकीचे महत्व सांगतात..!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel