हळदीकुंकू

सध्या संक्रांतीचे हळदीकुंकू कार्यक्रम चालू आहेत रोज कोणत्या तरी एक दोन मैत्रिणीकडे हळदी कुंकवाला जाणे होते. आम्ही कॉलनीतील चार पाच जणी मिळून हळदीकुंकवाला जातो.

बर्‍याच जणींना कोणाच्या घरी कांही निमित्याने गेल की,तेथील पसारा पाहून,घर अस्ताव्यस्त पाहून नावे ठेवण्याची सवय असते

आपण बायका ना एकमेकींना समजूनच घेत नाही. प्रत्येकीला घर टापटीप ठेवण्याची आवड असतेच असे नाही. ती कदाचित दुसर्‍या एखाद्या क्षेत्रात हुशार असेल. पण आपण बायका समजून न घेता लगेचच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतो.

काय झाले परवा अचानक आम्ही रागिणी च्या घरी गेलो होतो. तिचे घर थोडे अस्वच्छ आणि अस्ताव्यस्त होते. लगेचच स्नेहा म्हणाली बाप रे ...किती हा पसारा....! दिवाण वर कपडे पडलेले....सोफ्यावर पेपर पसरलेले....ओट्यावर भांड्याचा पसारा....गॅस पुसलेला नाही.

त्यावर सुनीता म्हणाली मला नाही आवडत असे मला घर नीटनेटके...सर्व वस्तू जागच्या जागी ठेवायला आवडते.

तेथून आम्ही पुजा कडे निघालो.सर्व मैत्रिणी एन्जॉय करीत गप्पा मारीत चालत होतो.लगेचच चित्रा म्हणाली,आपल्या काँलनीत राहणारी स्नेहा दररोज सकाळी प्राणायाम, सुर्य नमस्कार,आणि योगासने करायला जाते. तिची तब्येत बेताचीच आहे. लहान मुलांना सोडून काही गरज आहे का तिला हे सर्व करण्याची.

सर्व मैत्रीणी गप्पा मारण्यात दंग झाल्या होत्या.तेवढ्यात पुजाचे घर आले. आम्ही तिच्या कडे हळदी कुंकू कार्यक्रमा साठी आलो होतो.

गेट समोर खुप सुंदर रांगोळी काढली होती. घरात प्रवेश केला तर घर खुप सुंदर सजवले होते. आणि पुजा तर महालक्ष्मीच दिसत होती. मला तर एकदम प्रसन्न वाटले. बायकांची बरीच गर्दी झाली होती.आम्ही थोडा वेळ थांबून लगेच निघालो.आता घरीच जायचे होते.

सर्वजणी पुजाचे कौतुक करीत होत्या.तेवढ्यात सुनिता म्हणाली,हे सर्व खर आहे ग पण तिच्या शेजारच्या बायका तिला खुप नावे ठेवतात.वय 50 वर्षे झाले आणि सकाळी उठून झुंबा करायला जाते.आता घरात मोठ मोठी दोन मुले आहेत हिला या वयात झुंबा करून काय करायचे.काही गरज आहे का या गोष्टीची....???

आपल वय काय....!!!

आपण करतो काय याचे जरा तरी भान असावे....!!!काही तरीच करतात बायका ....!!! मला तर अजिबात पटत नाही.

मंगल लगेच पुढे बोलायला लागली.पुजाचे जाऊ दे, दे सोडून निटनेटकी सुंदर रहाते.पण अगदी संक्रांतीच्या दिवशी, मोहीनीने किती साधी साडी घातली होती. आपण तर घरात पण अशी साडी नेसणार नाही.

कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकवून या असल्या कमेंट करत असतो आपण बायका.. वेळ-काळ, परिस्थिती, अर्धवट माहिती कशाचंही भान न ठेवता आपली ही दुसऱ्यांच्या बाबतीत नकारात्मक कमेंट सुरूच असते.

काय मिळतं आपल्याला असं दुसऱ्याला नावे ठेवून...??? आपण फार हुशार आहोत हे दाखवायचे असते की आपल्याला फार कळतं अस सांगायचे असते......??? नेमके कोणते समाधान मिळते.....???

तसे पाहिले तर,आपला त्या व्यक्तीसी कांही ही संबंध नसतो. वास्तविक संबंधित व्यक्तीची आवड निवड, वागण्याची-बोलण्याची- राहण्याची पद्धत ही खरं तर तिची खासगी बाब.. जोवर या बाबींचा आपल्याला किंवा सामाजिकदृष्ट्या इतर कुणाला त्रास नाही, तोवर आपण त्यात नाक खुपसण्याचं कारणच नाही. पण आपण किती सहजगत्या या गोष्टी सार्वजनिक करतो....!!! इतकंच नाही तर त्यावर आपलं मतही व्यक्त करून मोकळे होतो.

विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या खासगी गोष्टींबाबत, घरातील विषयांबाबत तिसर्‍या व्यक्तीकडे बोलून काहीच उपयोग नसतो. अगदीच जर काही सांगावसं-सुचवावंसं वाटलं तर त्या व्यक्तीकडेच योग्य त्या शब्दांत व्यक्त करायला हवं. पण आपल्या भावना पोचवणं आणि त्या व्यक्तीला नाराज न करणं, हा तोल सांभाळणं जरा अवघडच ना.. मग आपण सोपी वाट शोधून सरळ इतरांकडे चर्चा करण्याचा मार्ग निवडतो, ज्यातून काहीच साध्य होत नाही.

या बाबतीत खरोखर पुरूषांचं खूप कौतुक वाटतं. पुरूष मंडळी अगदी चार दिवस जरी कुणाच्या घरी राहिली ना तरी घरातल्या गोष्टीत नाक खुपसत नाहीत. कुणाच्या खाजगी गोष्टीत लक्षही देत नाहीत. आपण भलं-आपलं काम भलं, असे राहतात.पुरुष मंडळीचा हा गुण वाखाणण्याजोगा आहे.

पण आपण बायका मात्र जरा कुणाकडे 10-15 मिनिटं जरी गेलो तरी सगळं निरखून पाहतो आणि मग चार चौघीत आपली त्यावर कमेंट सुरू....!! ! खरे आहे का नाही...!!!

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपण आता दुसरी बाजू पाहू.

रागिणीचे घर अस्ताव्यस्त होते कारण तिन दिवसा पासून रागिणीला बरे वाटत नव्हते. तिची तब्येत ठिक नव्हती. म्हणून घराकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं.

स्नेहाला अँसिडिटीचा त्रास होता डाँक्टरच्या सल्याने योगासने करत होती.

पुजा झुंबा शिकत होती कारण तिला वजन कमी करण्यासाठी डॉक्टरने सांगितले होते. तिला न्रुत्याची आवड होती म्हणून ती या वयात झुंबा शिकत होती.

मोहीनीने खुप साधी साडी नेसली होती कारण आदल्या रात्रीच तिच्या नात्यातील एका व्यक्तीचं निधन झालं होतं. अगदी चौथ्या दिवशी संक्रांत असल्याने त्या दिवशी तिला नटावं वाटलंच नाही आणि साधेपणाने तीने संक्रांत साजरी केली.

अशा प्रकारे नाण्याची दुसरी बाजू माहित नसतांना आपण पटकन आपलं मत व्यक्त करतो. ज्यात जराही विवेक किंवा विचार नसतो. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपलं घर कसं ठेवावं, आपण कसे कपडे घालावेत, आपण काय करावं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. किंबहुना ते स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, हे आपणच समजून घ्यायला पाहिजे.

मैत्रिणींनो, अशा पद्धतीने कुणाच्या व्यक्तिगत गोष्टींवर चटकन रिअ‍ॅक्ट होणं आपण टाळू शकतो.नेहमी नकारात्मक प्रतिक्रिया देण्या पेक्षा सकारात्मक कमेंट करायला काहीच हरकत नाही....!!

कॉपी पेस्ट