चिकन खरेदी

रविवार आला की आपल्याला आस लागते ती काही नॉन व्हेज खाण्याची, काहींचा बेत ऑलरेडी फिक्स असतो कोंबडी वडे, चिकन बिर्याणी, चिकन कोल्हापुरी, चिकन तंदुरी, चिकन टिक्का इत्यादी, सुटले की नाही तोंडाला पाणी? पण आज हा लेख ह्या पैकी कोणतीही डिश बद्दल माहिती देणारा नसून चिकन शॉप मध्ये जाऊन कोंबडी कशी निवडायची ह्या बाबत आहे..

भारतात कोंबड्यांचे खूप प्रकार आहेत शोभेचे, फाइटर, अंडी देणारे, मांस वापरासाठी इत्यादी त्यातील काही जाती भारतात पूर्वी पासून सापडत आलेल्या आहेत आणि काही इतर देशातून आलेल्या आहेत आणि काही संक्रमित केलेल्या आहेत.

ब्रॉयलर, इंग्लिश, गावठी, देसी, देसी मध्ये डुअल पर्पस, डुअल पर्पस क्रॉस, कावेरी, गिरीराज ह्या जाती शक्यतो चिकन शॉप मध्ये सापडतात.

डुअल पर्पस म्हणजे ती जात अंडी आणि मांस उत्पादन करण्यास वापरात आणतात.

आपन चिकन शॉप मध्ये शिरल्यानंतर सर्रास ब्रॉयलरला पसंदी देतो, तसेच हॉटेल, रेस्टोरेंट, आणि इतर फूडचैन ही ब्रॉयलर लाच पसंदी देतात. ब्रॉयलर ही अमेरीकन ब्रीड आहे यात नर आणि मादी दोन्ही सेम दिसतात फक्त एकाच वयाचा नर मादी पेक्षा मोठा असतो एवढाच नर आणि मादी मधील फरक. ब्रॉयलर ही जात फक्त मांस उत्पादनासाठी वापरली जाते. गुबगुबीत मांस आणि लगेच शिजनारे, पचायला सोपे आणि खिशाला परवडणारे असल्यामुळे ब्रॉयलरला मागणी आणि खप जास्त असतो.

इंग्लिश ही कोंबडीची जात फक्त अंडी देण्यासाठी वापरात असते, मोठे तुरे आलेल्या माद्या असतात, एक नजर पहिली तर नर दिसतो, अंडी देण्यास असमर्थ किंवा एका ठराविक वेळे नंतर या कोंबड्या चिकन शॉप मध्ये विक्रीस आणतात, यांना ओळखणे सोपे उंच तुरा, सफेद पिसे आणि सडपातळ असतात. मांस हे चविष्ट असते, मांस हे शिजवण्यास ब्रॉयलर पेक्षा थोडे कठीण आणि गावठी पेक्षा थोडे सोपे असते. ब्रॉयलर च्या तुलनेत इंग्लिश कोंबड्यांना मांस कमी असते. किंमत ही ब्रॉयलर च्या तुलनेनं थोडी जास्त असते.

गावठी आणि देसी कोंबडी, इथे ग्राहकाची फसवून केली जाऊ शकते. आपण वर देसी कोंबड्यांच्या जाती पाहिल्या. गावठी कोंबडी ही घरी पाळली जाते आणि देसी ही पोल्ट्री फार्म मध्ये, देसी मध्ये मांस जास्त असते तर गावठी मध्ये कमी, देसी कोंबडी चे वजन गावठी कोंबडीच्या तुलनेत खूप फास्ट वाढते. गावठी कोंबडीचे पाय हे खडबडीत असतात तर देसीचे पाय ब्रॉयलर सारखे असतात, गावठी कोंबडीची चोच एकदम टोकदार असते तर देसीच्या चोचीचा टोकरी भाग छाटलेला असतो, कारण एवढेच की त्या पोल्ट्री फार्म मध्ये वाढतात त्यामुळे एकमेकांची पिसे खेचून काढतात, आणि नवीन पिसे येण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे मार्केट रेट कमी होतो, ह्या शक्यतेच्या पोटी त्यांची चोच बोथट असते. देसी कोंबडी चिकन शॉप मध्ये जास्त दिवस जिवंत राहू शकते परंतु गावठी चिकन लगेच मान टाकते, बंदिस्त वातावरण त्यांना धोकादायक ठरते आणि देसी ह्या बंदिस्त वातावरणात वाढलेल्या असतात त्यामुळे त्या खूप काळ जिवंत राहू शकतात. देसी आणि गावठी रंगावरुन ओळखणे कठीण असतं. अशा प्रकारे तुम्ही तुमचे चिकन सिलेक्शन करू शकता आणि फसवणूक होण्या पासून वाचू शकता कारण गावठी चिकन देसी पेक्षा महाग असतं.

चिकनची किंमत ही त्या कोंबडीच्या प्रजातीच्या वजनाच्या वाढीवर आणि प्रजनन क्षमते वर अवलंबून असते जितकी जलद कोंबडी वजनदार होते तितकी ती स्वस्त असते, कडकनाथ बाबतीत पण हेच आहे, कडकनाथ जातीची वाढ ही खूप हळू होते त्यामुळे त्यातील मानव शरीराला उपयुक्त अशी सत्व मुबलक प्रमाणात मिळतात. ह्यामुळे चिकन शॉप वर कडकनाथ जातीचे चिकन खूपच महाग मिळते.

साधारण एक किलो ब्रॉयलर पक्षी घेतला की आपणास सहाशे पन्नास ते सातशे ग्राम पर्यंत मांस मिळतं. शक्यतो चिकन साफ़ आणि कट करुन झाले की वजन करून घ्यावे वजन कमी भरले तर कदाचित तुमची फसवणूक झाली असू शकते. गावठी चिकन स्किन सहित घ्यावे, चिकन च्या स्किन मध्ये मानवी शरीरास लागणारे खुप पौष्टिक घटक असतात.

आता जर येणार्‍या रविवारी कोंबडी रस्सा चा बेत असेल तर एक टीप देवुन निरोप घेतो. चिकन च्या मासांला चविष्ट बनविण्यासाठी आपण त्याला मॅरीनेट करून ठेवतो, त्याच बरोबर खूप महत्त्वाचे आहे चिकन च्या हाडाचा रस पूर्ण पणे चिकन रस्यामध्ये मुरला पाहिजे. ब्रॉयलर बाबत हे होत नाही कारण पटकन शिजतं, गावठी शिजायला वेळ जातो त्यामुळे हड्डीतील रस थोडाफार मुरला जातो. त्यामुळे चिकन गॅस वरुन उतरून लगेच वाढू नये. थोडा वेळ थांबुन वाढावे. जर तुम्ही केव्हा उरलेले चिकन दुसऱ्या दिवशी खाल्ले असाल तर ते अधिक चविष्ट लागते ते ह्या कारणामुळे.

माहिती संकलन आणि लेखन : सुर्या

माहिती स्त्रोत : श्री. विवेक चव्हाण (विवेक चिकन एंटरप्राइझ, मुलुंड, मुंबई)