श्री चैतन्यकृपा अलोकिक |
संतोषोनी वैकुंठनायक |
वर दिधला अलोकिक |
जेणे सुख सकळांसी || १०१ ||

हा ग्रंथ लिहिता गोविंद |
या वचनी न धरावा भेद |
हृदयी वसे परमानंद |
अनुभवसिद्ध सकळांसी || १०२ ||

या ग्रंथीचा इतिहास |
भावे बोलिला विष्णुदास |
आणिक न लागती सायास |
पठणमात्रे कार्यसिद्धी || १०३ ||

पार्वतीस उपदेशी कैलासनायक |
पूर्णानंद प्रेमसुख |
त्याचा पार न जाणती ब्रम्हादिक |
मुनि सुरवर विस्मित || १०४ ||

प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी |
त्रैलोक्य भजत त्रिकाळी |
ध्याती योगी आणि चंद्रमौळी |
शेषाद्रीपर्वती उभा असे || १०५ ||

देवीदास विनवी श्रोतया चतुरा |
प्रार्थनाशतक पठण करा |
जावया मोक्षाचिया मंदिरा |
काही न लागती सायास || १०६ ||

एकाग्रचित्ते एकांती |
अनुष्ठान कीजे मध्यराती |
बैसोनिया स्वस्थचित्ती |
प्रत्यक्ष मूर्ति प्रकटेल || १०७ ||

तेथें देहभावासी नुरे ठाव |
अवघा चतुर्भुज देव |
त्याचे चरणी ठेवोनि भाव |
वरप्रसाद मागावा || १०८ ||

इति श्री देवी दास विरचितं श्री व्यंकटेश स्तोत्रं संपूर्णम |
श्री व्यंकटेशार्पणमस्तु ||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel