गरुड पुराणात २७९ अध्याय आणि १८००० श्लोक आहेत.या ग्रंथात मृत्युनंतरच्या घटना, प्रेत लोक, यम लोक, नरक आणि ८४ लक्ष योनींचे नरक स्वरूपी जीवन इत्यादी बाबतीत विस्ताराने सांगण्यात आलेले आहे. या पुराणात अनेक सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजांचे वर्णन देखील आहे. सर्वसामान्य लोक शक्यतो हा ग्रंथ वाचायला बघत नाहीत कारण कोण्या आप्ताच्या मृत्यू नंतरच हा ग्रंथ वाचण्याची प्रथा आहे. वास्तवात या पुराणात मृत्यू पश्चात पुनर्जन्म झाल्यावर गर्भात स्थित भृणाची वैज्ञानिक अवस्था सांकेतिक स्वरुपात सांगण्यात आलेली आहे ज्याला वैतरणा नदी इत्यादींची संज्ञा देण्यात आलेली आहे. संपूर्ण युरोपात त्य वेळेपर्यंत गर्भाच्या (भृणाच्या) विकासाच्या बाबतीत कोणतीही वैज्ञानिक माहिती उपलब्ध नव्हती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.