असे म्हणतात की गंगा नदी, केदारनाथ, बद्रीनाथ सहित सर्व प्रमुख तीर्थ लुप्त होऊन जातील आणि भविष्यात 'भविष्यबद्री' नावाचे एक नवीनच तीर्थ असेल. बद्रीनाथाच्या कथेनुसार सतयुगात देवता, ऋषीमुनी आणि सामान्य मनुष्यालाही भगवान विष्णूंचे साक्षात दर्शन होत होते. त्यानंतर आले त्रेतायुग. या युगात भगवंत केवळ देवता आणि ऋषीमुनी यांनाच दर्शन देत असत, परंतु द्वापार युगात भगवंत पूर्ण रूपाने विलीनच होऊन गेले. त्यांच्या स्थानावरच एक विग्रह प्रकट झाला. ऋषीमुनी आणि सामान्य मनुष्यांना त्या विग्रहावरच संतुष्ट व्हावे लागले.
तस्यैव रूपं दृष्ट्वा च सर्वपापै: प्रमुच्यते।
जीवन्मक्तो भवेत् सोऽपि यो गतो बदरीबने।।
दृष्ट्वा रूपं नरस्यैव तथा नारायणस्य च।
केदारेश्वरनाम्नश्च मुक्तिभागी न संशय:।। -शिवपुराण
शास्त्रांनुसार सतयुगापासून द्वापार युगापर्यंत पापाचा स्तर वाढतच गेला आहे आणि भगवंताचे दर्शन दुर्लभ झाले आहे. द्वापार नंतर आले कलियुग, जे सध्याचे युग आहे.