देवराज इंद्राच्या सभेत अनेक अप्सरा आहेत. सर्व एकापेक्षा एक सुंदर... त्यातच एक अप्सरा रंभा जिच्या सौदर्याला कोनिठी सीमा नाही... क्षणात कोणालाही तिचा मोह व्हावा इतकी सुंदर. रंभा एकदा नटून-सजून कुबेराचा पुत्र नलकुबेर याला भेटायला जात होती. वाटेत रावणाने तिला पाहिले आणि तो तिचे सौंदर्य पाहून तिच्याकडे आकृष्ट झाला. रावणाने तिला वाईट बुद्धीने थांबवले. त्यावर रंभाने रावणाला तिला सोडण्यासाठी प्रार्थना केली आणि सांगितले की आता मी तुमचा भाऊ कुबेर याचा पुत्र नलकुबेर याला भेटायला येण्याचे वचन दिले आहे, तेव्हा मी तुमच्या सुनेसामान (पुत्रवधु) आहे म्हणून मला सोडा. परंतु रावण दुराचारी होता, त्याने ऐकले नाही आणि रंभाला शीलभ्रष्ट केले.
ही गोष्ट जेव्हा कुबेराचा पुत्र नलकुबेर याला समजली तेव्हा तो रावणावर भयंकर चिडला. क्रोधात त्याने रावणाला शाप दिला की आज नंतर जर रावणाने कोणत्याही स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती केली किंवा तिला आपल्या राजमहालात ठेवले तर त्याच दिवशी रावण भस्म होऊंज जाईल. याच शापाच्या भीतीने रावणाने सीतेला महालात न ठेवता अशोक वाटिकेत ठेवले.