महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी आपल्या सेनेचा तळ कुरुक्षेत्राच्या पश्चिम क्षेत्रात सरस्वती नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या समंत्र पंचक तीर्थाच्या जवळ हिरण्यवती नदीच्या किनाऱ्यावर ठोकला. कौरवांनी कुरुक्षेत्राच्या पूर्व भागात तिथून काही योजने दूर एका सपाट मैदानावर आपला तळ ठोकला.
दोन्ही शिबिरात सैनिकांचे भोजन आणि जखमी सैनिकांच्या इलाजाची उत्तव व्यवस्था करण्यात आली होती. हत्ती, घोडे आणि रथांची वेगळी व्यवस्था होती. हजारो शिबिरांपैकी प्रत्येक शिबिरात मुबलक प्रमाणात खाद्य सामग्री, अस्त्र-शस्त्र, यंत्र आणि अनेक वैद्य आणि शिल्पी वेतन देऊन ठेवण्यात आले होते.

दोन्ही सैन्यात युद्धासाठी ५ योजने ४० किलोमीटरचा घेरा मोकळा ठेवण्यात आला होता.

कौरवांचे सहयोगी प्रांत होते - गांधार, मद्र, सिन्ध, काम्बोज, कलिंग, सिंहल, दरद, अभीषह, मागध, पिशाच, कोसल, प्रतीच्य, बाह्लिक, उदीच्य, अंश, पल्लव, सौराष्ट्र, अवन्ति, निषाद, शूरसेन, शिबि, वसति, पौरव, तुषार, चूचुपदेश, अशवक, पाण्डय, पुलिन्द, पारद, क्षुद्रक, प्राग्ज्योतिषपुर, मेकल, कुरुविन्द, त्रिपुरा, शल, अम्बष्ठ, कैतव, यवन, त्रिगर्त, सौविर आणि प्राच्य.

कौरवांकडून हे योद्धे लढले होते - भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, मद्रनरेश शल्य, भूरिश्र्वा, अलम्बुष, कृतवर्मा, कलिंगराज, श्रुतायुध, शकुनि, भगदत्त, जयद्रथ, विन्द-अनुविन्द, काम्बोजराज, सुदक्षिण, बृहद्वल, दुर्योधन आणि त्याच्या ९९ भावांसहित अन्य हजारो योद्धे.

पांडवांचे सहयोगी प्रांत होते - पांचाल, चेदि, काशी, करुष, मत्स्य, केकय, सृंजय, दक्षार्ण, सोमक, कुन्ति, आनप्त, दाशेरक, प्रभद्रक, अनूपक, किरात, पटच्चर, तित्तिर, चोल, पाण्ड्य, अग्निवेश्य, हुण्ड, दानभारि, शबर, उद्भस, वत्स, पौण्ड्र, पिशाच, पुण्ड्र, कुण्डीविष, मारुत, धेनुक, तगंण आणि परतगंण.

पांडवांकडून हे योद्धे लढले होते - भीम, नकुल, सहदेव, अर्जुन, युधिष्टर, द्रौपदीचे पाचही पुत्र, सात्यकि, उत्तमौजा, विराट, द्रुपद, धृष्टद्युम्न, अभिमन्यु, पाण्ड्यराज, घटोत्कच, शिखण्डी, युयुत्सु, कुन्तिभोज, उत्तमौजा, शैब्य आणि अनूपराज नील.

तटस्थ प्रांत - विदर्भ, शाल्व, चीन, लौहित्य, शोणित, नेपा, कोकण, कर्नाटक, केरळ, आन्ध्र, द्रविड इत्यादींनी या युद्धात भाग घेतला नव्हता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel