.स्यमंतक मणी इंद्रदेव धारण करतात. असे म्हणतात की प्राचीन काळी कोहीनुरलाच स्यमंतक मणी म्हटले जात असे. अनेक स्त्रोतांच्या नुसार कोहिनूर हिरा जवळ जवळ ५००० वर्षांपूर्वी मिळाला होता आणि प्राचीन संस्कृत इतिहासात लिहिल्याप्रमाणे तो स्यमंतक मणी नावाने प्रसिद्ध झाला होता. विश्वातील सर्व हिऱ्यांचा राजा आहे कोहिनूर हिरा. हा बराच काळ भारतीय क्षत्रिय शासकांच्या ताब्यात राहिला आणि नंतर मोघलांच्या हाती सापडला. त्यानंतर इंग्रजांनी तो मिळवला आणि आता तो ब्रिटन येथील एका म्युजियम मध्ये ठेवलेला आहे. अर्थात या गोष्टीत किती तथ्य आहे की कोहिनूर हिरा हाच स्यमंतक मणी आहे? हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. हा एक चमत्कारी मणी आहे. भगवान श्रीकृष्णाला या मणीसाठी युद्ध करावे लागले होते. त्यांना मणीसाठी नव्हे तर स्वतःवर लागलेल्या मणीच्या चोरीच्या आरोपाचे खंडन करण्यासाठी जांबवंत सोबत युद्ध करावे लागले होते. प्रत्यक्षात हा मणी भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिचे पिता सत्यजित यांच्याकडे होता आणि त्यांना तो भगवान सूर्याने दिला होता.