पारस मणीचा उल्लेख पौराणिक आणि लोककथांमध्ये भरपूर आढळून येतो. त्याचे हजारो किस्से आणि कहाण्या समाजात प्रचलित आहेत. कित्येक लोक असा दावा देखील करतात की आम्ही पारस मणी पहिला आहे. मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये जिथे हिऱ्याची खाण आहे, तिथून ७० किलोमीटर अंतरावर दनवारा गावात एका विहिरीत रात्रीच्या वेळी प्रकाश दिसतो. लोक असे मानतात की त्या विहिरीत पारस मणी आहे. पारस मणीची प्रसिद्धी आणि तो प्रत्यक्षात असण्यावर लोकांचा इतका विश्वास आहे की भारतात अनेक अशी ठिकाणे आहेत जी पारस या नावाने ओळखली जातात. काही लोकांची तर आज देखील नावे पारस ठेवण्यात येतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.