देवांनी आपली वाहने खूप वैशिष्ट्याने निवडली. त्यांचे वाहन त्यांच्या चरित्राचे विशेष देखील सांगतात. गणपतीचे वाहन आहे उंदीर म्हणजेच मूषक. मूषक शब्द संस्कृत मूष पासून बनला आहे ज्याचा अर्थ आहे लुटणे किंवा चोरणे.
सांकेतिक रूपाने मनुष्याचा मेंदू मूषक, चोरणारा म्हणजेच उंदरासारखा असतो. त्याच्या मनात स्वार्थ भाव भरलेला असतो. गणपतीचे उंदरावर बसणे या गोष्टीचे प्रतिक आहे की त्यांनी स्वार्थावर विजय मिळवला आहे आणि जनकल्याणाचा भाव आपल्या अंतरात जागृत केला आहे.
वैज्ञानिक मानतात की मनुष्य आणि उंदीर यांच्या मेंदूचा आकार एकसारखा आहे. उंदराचा मनुष्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध नक्कीच आहे. त्याच प्रकारे जसा हत्ती आणि उंदराचा आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.