धर्मग्रंथांनुसार एकदा महर्षी दुर्वास यांच्या शापामुळे स्वर्ग श्रीहीन (ऐश्वर्यहीन, धनहीन, वैभवहीन इत्यादी) झाला. तेव्हा सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूने त्यांना असुरांना सोबत घेऊन समुद्र मंथन करण्याचा उपाय सांगितला आणि सोबत हेही सांगितले की समुद्रमंथनातून अमृत निघेल जे पिऊन तुम्ही अमर व्हाल. ही गोष्ट जेव्हा देवतांनी असुरांचा राजा बली याला सांगितली तेव्हा तो देखील समुद्र मंथनासाठी तयार झाला. वासुकी नागाची नेती बनवण्यात आली आणि मंदराचल पर्वताच्या सहाय्याने समुद्र घुसळण्यात आला. समुद्र मंथनातून उच्चैश्रवा घोडा, ऐरावत हत्ती, लक्ष्मी, भगवान धन्वंतरी सहित 14 रत्न निघाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.