कपिल मुनींच्या आश्रमात ज्या दिवशी गंगा मातेचे पदार्पण झाले होते, तो मकर संक्रांतीचा दिवस होता. पावन गंगाजलाच्या केवळ स्पर्शाने राजा भगीरथ याच्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्ती झाली होती. कपिल मुनींनी वरदान देताना म्हटले होते, 'माता गंगा त्रीकालापर्यंत लोकांचे पापहरण करेल आणि भक्तजनांच्या सात पिढ्या मुक्त करून त्यांना मोक्ष प्रद्फान करेल. गंगा जलाचे दर्शन, स्पर्श, प्रश्न आणि स्नान सर्व पुण्यदायक फळ प्रदान करेल.'
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.