https://i.ytimg.com/vi/tSJtxAhXi2M/hqdefault.jpg

अभ्यासकांमध्ये या भाषेच्या उगम आणि प्राचीनतेबद्दल एकमत नाही. इसवीसन पूर्व ७३९ शतकात विजयादित्य यांच्या ताम्रपटावर या भाषेचा पहिला लेखी पुरावा सापडतो. इसवीसन पूर्व ९८३ शतकातील श्रवणबेळगोळा गोमतेश्वर- चौन्दाराजेन /चवूनदाराजेन करवीयालेन (चवंदाराजा यांनी बांधलेला) याच्या पायथ्याशी असलेला शिलालेख सगळ्यात प्राचीन मानला जातो. आठव्या शतकातील जैन संन्यासी उद्योतन सुरीच्या कुवालयमालेतील  एका मनोरंजक काव्यात एका बाजाराचा उल्लेख येतो ज्यात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भाषेत बोलतात, सामान विकताना मऱ्हाटे दिन्नाले,गाहील्ले (दिलेले ,घेतलेले) असं बोलतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel