तुमच्या शॉवरच्या निचऱ्यातून तुम्ही एखादी वस्तू बाहेर काढल्यावर ती जशी दिसेल तशी वुडू झोंबी बाहुली न्यू ऑर्लिन्समध्ये बनवण्यात आली आणि गॅल्वेस्टन , टेक्सस येथील एका स्त्रीला ‘ईबे’ मार्फत विकण्यात आली. ईबेच्या सूचीमधल्या नियमांत ही बाहुली खरेदी केल्यावर पाळायचे काही नियम दिले होते. ज्यात चांदीच्या संरक्षक आच्छादनातून ही बाहुली बाहेर न काढण्याचा नियमही होता, ती बाहुली आल्याआल्या नेमका हाच नियम त्या स्त्रीने मोडला. तिला तिच्या ह्या निर्णयाचा खूप पश्चाताप झाला.
त्या स्त्रीने सांगितल्यानुसार ती बाहुली तिच्या स्वप्नात येऊन तिच्यावर कायम हल्ले करायची. तिने ईबेवर पुन्हापुन्हा त्या बाहुलीला विकण्यासाठी जाहिरात दिली आणि शेवटी त्यात सफल झाली, मात्र त्या नवीन ग्राहकाला फक्त रिकामा खोका मिळाला आणि ती बाहुली त्या स्त्रीच्या पायऱ्यांवर सतत दिसू लागली.
झपाटलेली असेल किंवा नसेल पण ती बाहुली सुतळ आणि कापडापासून बनलेली असून, खेळण्यासारखी न दिसता ओव्हन स्वच्छ करण्यासाठी जे वापरतात तशी दिसते. अलीकडच्या वर्षांत त्या बाहुलीचं रहस्य उलगडवून दाखवण्याची आशा करणाऱ्या आणि स्वतःला भूतांचा मांत्रिक/ शिकारी म्हणवून घेणाऱ्या एका माणसाकडे ती बाहुली आहे,